Satara Drugs Case: एकनाथ शिंदेच्या भावाच्या रिसॉर्टमध्ये 145 कोटींचे ड्रग्ज जप्त....; सुषमा अंधारे यांचा खळबळजनक आरोप
सुषमा अंधारे यांनी पुण्यात पत्रकार परिषद घेत प्रकाश शिंदे आणि या प्रकरणी गंभीर आरोप केले आहेत. सुषमा अंधारे म्हणाल्या, ‘पोलिसांनी ड्रग्जसंबंधित ज्या तीन जणांची नावे एफआयआरमध्ये असायला हवी होती. ती त्यात नोंदवली नाहीत. एखाद्या प्रकरणात पोराचे नावं आले तर बापाचा राजीनामा मागितला जातो. मग आता ड्रग्ज प्रकरणात भावाचे नाव आल्यावर एकनाथ शिंदे यांचाही राजीनामा घेतला गेला पाहिजे. अशी मागणीही अंधारे यांनी केली.
या पत्रकार परिषदेनंतर मला जर काहीही झालं तर मी आज ज्यांची नावे घेतली आहेत. ते सर्व लोक जबाबदार असतील, हे प्रकरण उघडकीस आणल्यामुळए माझीही सुरक्षा धोक्यात आली आहे. असंही सुषमा अंधारे यांनी म्हटलं आहे. तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माझ्या सुरक्षेची हमी द्यावी, यापूर्वी अॅड. उके आणि त्यानंतर नबाव मलिक यांनीदेखील या प्रकरणचे काही मुद्दे समोर आणले होते. त्यानंतर त्यांच्यासोबत काय झालं हे सर्वांनी पाहिलं होतं. याकडेही सुषमा अंधारे यांनी लक्ष वेधलं.
शिवसेना (ठाकरे गट) नेत्या सुषमा अंधारे यांनी १३ डिसेंबर रोजी सातारा जिल्ह्यातील सावरी गावात झालेल्या ड्रग्स कारवाईबाबत धक्कादायक आरोप केले आहेत. सुरुवातीला मुकंद गावात झालेल्या कारवाईचे धागेदोरे पुण्याशी जोडले गेले. या प्रकरणात विशाल मोरेला ताब्यात घेऊन चौकशी करण्यात आली. मोरेच्या चौकशीतून सावरी गावाची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांचे पथक तेथे पोहोचले, असे अंधारे यांनी नमूद केले.
पाकिस्तानचा गेम ओव्हर! भारताचे मोठे यश; Pahalgam Terrorist Attack प्रकरणी एनआयएने थेट
सावरी गावातील कोयनेच्या बॅकवॉटर परिसरात स्विमिंग टँक, रिसॉर्ट आणि पत्र्याच्या शेडमध्ये कारवाई करण्यात आली. गाव किंवा वस्ती नसतानाही ७५ लाख रुपये खर्च करून रस्ता तयार करण्यात आल्याचा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. या रिसॉर्टमध्ये सात ते आठ खोल्या, विविध सुविधा आणि डस्टर गाडी असल्याचे त्यांनी सांगितले. पोलिसांच्या कारवाईत येथे ४५ किलो ड्रग्स सापडले असून त्याची अंदाजे किंमत १४५ कोटी रुपये असल्याचा दावा अंधारे यांनी केला. मात्र, ही बातमी फारशी चर्चेत आली नाही, असा आरोप त्यांनी केला.
हे रिसॉर्ट प्रकाश शिंदे यांच्या मालकीचे असून शेडचा मालक गोविंद सिंदकर असल्याचे सांगितले जाते. शेडची चावी ओंकार दिघे याने घेतल्याची माहिती देण्यात आली. मात्र, ओंकार दिघे याला ताब्यात घेऊन नंतर सोडण्यात आले; त्यामागचे कारण अद्याप स्पष्ट नसल्याचा सवाल अंधारे यांनी उपस्थित केला. मुंबई पोलीस तेथे का गेले, यावरही त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले.
‘ये पॉलिटिक्स है बाबू भैया’! Manikrao Kokate संकटात अन् मुंडे कमबॅक करणार? थेट मंत्री होऊनच…
अंधारे यांनी रणजीत शिंदे हे एकनाथ शिंदे गटाचे तालुका प्रमुख आणि सरपंच असल्याचे सांगत त्यांच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित केले. तसेच प्रकाश शिंदे हे एकनाथ शिंदे यांचे सख्खे भाऊ असून, २०१७ मध्ये त्यांनी नगरसेवकपदाची निवडणूक लढवली होती, अशी माहिती दिली. पोलिस रेकॉर्डनुसार, या ठिकाणी तीन जण राहत होते, ते आसाम किंवा बांगलादेशी असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या तिघांची नावे एफआयआरमध्ये का नाहीत, एफआयआर ऑनलाइन का दिसत नाही, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.
या रिसॉर्टचे नाव ‘हॉटेल तेजयश’ असून ते प्रकाश शिंदे यांच्या मुलांच्या नावावरून ठेवण्यात आल्याचा दावाही सुषमा अंधारे यांनी केला. संपूर्ण प्रकरणात माहिती लपवली जात असल्याचा आरोप करत त्यांनी सखोल आणि पारदर्शक चौकशीची मागणी केली आहे.






