Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 22 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Cockroach Janta Party |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Nashik News: धक्कादायक! मुले-मुली बेपत्ता होण्याच्या संख्येत वाढ, आकडेवारी काय सांगते?

सटाणा पोलीस ठाण्यात अल्पवयीन ५४ मुलामुली बेपत्ता झाल्याच्या तक्रारी दाखल झाल्या असून त्यापैकी ५२ जणांचा शोध लावण्यात पोलिसांना यश आले आहे. अद्याप ३४ प्रौढ व २ अल्पवयीन व्यक्ती बेपत्ता आहेत.

  • By श्वेता झगडे
Updated On: Mar 04, 2026 | 05:19 PM
धक्कादायक! मुले-मुली बेपत्ता होण्याच्या संख्येत वाढ, आकडेवारी काय सांगते?

धक्कादायक! मुले-मुली बेपत्ता होण्याच्या संख्येत वाढ, आकडेवारी काय सांगते?

Follow Us
Follow Us:

देवेंद्र वाघ, सटाणा: शहरात घर सोडून पळून जाण्याच्या घटनांमध्ये चिंताजनक वाह होत असल्याचे समोर आले आहे. गेल्या वर्षभरात सटाणा पोलीस ठाण्यात अल्पवयीन ५४ मुलामुली बेपत्ता झाल्याच्या तक्रारी दाखल झाल्या असून त्यापैकी ५२ जणांचा शोध लावण्यात पोलिसांना यश आले आहे. तसेच १५९ प्रौढ स्त्री-पुरुषांनी घर सोडल्याच्या तक्रारी नोंद झाल्या असून १२५ जणांना शोधण्यात यश आले आहे. अद्याप ३४ प्रौढ व २ अल्पवयीन व्यक्ती बेपत्ता आहेत. या घटनांमुळे पालकांच्या डोक्यावर चिंतेचे ढग दाटतांना दिसत आहेत.

मुलांच्या लग्नाबाबत पालक अनेक अपेक्षा आणि स्वप्ने रंगवत असतात. चांगले कुटुंब, सुसंस्कृत जोडीदार आणि स्थिर आयुष्य यासाठी ते आयुष्यभर कष्ट करतात. मात्र लग्नाच्या उंबरठ्यावर असलेली मुलगी किंवा मुलगा अचानक घर सोडून परिचित व्यक्तीसोबत निघून गेल्याची घटना घडली की कुटुंबीयांना मोठा मानसिक धक्का बसतो. आजच्या डिजिटल युगात मोबाईल फोन, सोशल मिडिया आणि विविध चॅटिंग अॅप्समुळे ओळखी सहज जुळतात. अनेकदा या ओळखी आकर्षणातून भावनिक गुंतवणुकीत बदलतात आणि शेवटी घर सोडण्याचा निर्णय घेतला जातो. दिखाऊ जीवनशैलीचे आकर्षण, आर्थिक स्वावलंबनाची अपुरी समज, पालकांशी संवादाचा अभाव आणि भावनिक असुरक्षितता ही कारणे तरुणांना भरकटवतात. काही प्रकरणांमध्ये फसवणूक, ब्लॅकमेलिंग किंवा मानवी तस्करीसारख्या गंभीर गुन्ह्यांचा धोका देखील वाढतो.

 वडाळ्यात होळीनंतर किरकोळ वादातून 22 वर्षीय तरुणाला मारहाण; चौघांना अटक

घर सोडून जाण्याच्या निर्णयामागे प्रेम किंवा स्वातंत्र्याची भावना असली तरी वास्तव वेगळे असते. आर्थिक अडचणी, सामाजिक बहिष्कार, कायदेशीर गुंतागुंत आणि कुटुंबीयांपासून तुटलेले संबंध या समस्या उभ्या राहतात. काही तरुण-तरुणींना परत येताना मानसिक ताण आणि कौटुंबिक तणावाचा सामना करावा लागतो. अल्पवयीनांच्या प्रकरणात कायदेशीर गुन्हे दाखल होण्याची शक्यता असते, ज्यामुळे संबंधितांवर गंभीर परिणाम होतो.

लग्नासंदर्भात पालकांचा विश्वास आवश्यक

तज्ज्ञांच्या मते शाळा व महाविद्यालयांत समुपदेशन शिबिरे, कायदेशीर माहिती व जनजागृती कार्यक्रम, पालकासाठी मार्गदर्शन कार्यशाळा, डिजिटल साक्षरतेचे प्रशिक्षण, कौटुंबिक समुपदेशन केंद्रांची स्थापना यासारखे उपक्रम राबविले पाहिजेत. मुलांना आयुष्याचा जोडीदार निवडण्याचा अधिकार असला तरी निर्णय प्रक्रियेत पालकांचा विश्वास आणि मार्गदर्शन महत्वाचे ठरते. त्याचप्रमाणे पालकांनीही केवळ बंधने लादण्याऐवजी मुलांशी मैत्रीपूर्ण संवाद साधणे, त्यांच्या अपेक्षा जाणून घेणे आणि भावनिक आधार देणे गरजेचे आहे. धर सोडून जाण्याच्या वाढत्या घटना ही केवळ कायद्याची समस्या नसून सामाजिक आणि भावनिक आव्हान आहे. मुलांच्या स्वातंत्र्याचा आदर राखत, त्यांच्या स्वप्नांना योग्य दिशा देत आणि कुटुंबातील विश्वास टिकवून ठेवणे हीच काळाची गरज असल्याचे मत व्यक्त होत आहे.

पोलिसांनी घेतला बेपत्ता व्यक्तींचा शोध

सटाणा पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज, मोबाईल लोकेशन ट्रॅकिंग आणि तांत्रिक तपासाच्या माध्यमातून अनेक बेपत्ता व्यक्तींचा शोध घेतला आहे. मात्र केवळ पोलिसांवर अवलंबून न राहता समाज, कुटुंब आणि शैक्षणिक संस्था यांनीही जबाबदारी स्वीकारण्याची गरज व्यक्त केली जात आहे.

Accident News: मुंबई-गोवा महामार्गावर ट्रक अपघात चालक ठार

Web Title: 54 boys and girls missing from nashik complaints of 159 elderly missing in a year search for 125 people

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 04, 2026 | 04:53 PM

Topics:  

  • crime
  • Nashik
  • police

संबंधित बातम्या

Nashik News: त्र्यंबकरोडचे दळणवळण की नरकयातना? आयटीआय सिग्नलवर किलोमीटरभर रांगा, तासनतास कोंडी अन् वाहतुकीचा बोजवारा
1

Nashik News: त्र्यंबकरोडचे दळणवळण की नरकयातना? आयटीआय सिग्नलवर किलोमीटरभर रांगा, तासनतास कोंडी अन् वाहतुकीचा बोजवारा

Ambarnath Crime: थरकाप उडवणारी घटना! वरवंट्याने डोक्यावर वार, गुप्तांगावर…; 7 वर्षीय मुलाची आईच्या प्रियकराकडून हत्या
2

Ambarnath Crime: थरकाप उडवणारी घटना! वरवंट्याने डोक्यावर वार, गुप्तांगावर…; 7 वर्षीय मुलाची आईच्या प्रियकराकडून हत्या

Mumbai Crime: पंचर काढताना चोराने मारला डल्ला; 111 लाख 55 हजार रुपये केले लंपास; अवघ्या २४ तासात आरोपी जेरबंद
3

Mumbai Crime: पंचर काढताना चोराने मारला डल्ला; 111 लाख 55 हजार रुपये केले लंपास; अवघ्या २४ तासात आरोपी जेरबंद

Bengaluru Crime : Gemini AI ला विचारून रचला तिहेरी हत्येचा कट; आधी आंधळं कसं….; लिव्ह-इन पार्टनरसह दोघे अटकेत
4

Bengaluru Crime : Gemini AI ला विचारून रचला तिहेरी हत्येचा कट; आधी आंधळं कसं….; लिव्ह-इन पार्टनरसह दोघे अटकेत

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.