कर्नाटकच्या सिरसीमधून एक धक्कदायक घटना समोर आली आहे. एका सात वर्षाच्या मुलाने चुकून आपल्या नऊ वर्षांच्या भावाची हत्या केली आहे. मृतक बालकाचे नाव करियप्पा असे आहे. करियप्पा हा (9) सोमनल्ली गावातील एका घरात काम करणाऱ्या बसप्पा उंडियारचा मुलगा होता. घटनेच्या वेळी तो आपल्या सात वर्षांच्या भावासोबत खेळत होता.
Haryana Crime: नवऱ्याने पत्नीला शिकवण्यासाठी आपली लायब्ररी विकली, ती पोलीस झाली आणि तिने…
ट्रिगर दाबलं आणि गोळी…
समोर आलेल्या माहितीनुसार, सात वर्षांच्या मुलाच्या हातात एक एअर गन होती. माकडांना पळवण्यासाठी माळ्याने ती आपल्याकडे ठेवली होती. करियप्पा आणि माळ्या खेळात असतांना लहान भावाने चुकून ट्रिगर दाबलं आणि गोळी करियप्पाच्या छातीत लागली. यांनतर त्याचा जागेवरच मृत्यू झाला आहे.
या घटनेचा एक सीसीटीव्ही फुटेज समोर आला आहे. पोलिसही त्याचा तपास करत आहेत. अतिरिक्त पोलीस अधीक्षक जगदीश, पोलीस उपाधीक्षक गीता पाटील आणि सीपीआय शशिकांत वर्माने घटनास्थळावर तपासणी केली. मृतदेहाच्या पोस्टमार्टमसाठी सिरसी रुग्णालयात पाठवणियात आला आहे. सिरसी ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे आणि पुढील तपास सुरू आहे.
पत्नी माहेरी जाताना दाम्पत्यामध्ये वाद; नंतर मृतदेहच आढळल्याने नातेवाईकांना धक्का
पतीसोबतच्या रोजच्या भांडणांना कंटाळून माहेरी निघून गेलेल्या एका विवाहित महिलेचा मृतदेह आढळून आला. हा प्रकार हत्येच्या संदर्भात असल्याने मृत महिलेच्या आईच्या तक्रारीवरून महिलेच्या पतीस संशियत आरोपी म्हणून कोटगूल पोलिसांनी अटक केली आहे.
पुरुषोत्तम गजराज कचलम (वय ३७, रा. सोनपूर) असे अटकेतील संशयित आरोपी पतीचे नाव असून, तामिनाबाई पुरुषोत्तम काचलम (वय ३४) असे हत्या झालेल्या त्याच्या पत्नीचे नाव आहे. तहसीलच्या कोटगुल पोलिस ठाण्यात दाखल केलेल्या तक्रारीत, मृत महिलेची आई चामरीबाई बोगा यांनी तिच्या मुलीचे लग्न सोनपूर येथील पुरुषोत्तम कचलम यांच्याशी समाजातील रीतिरिवाजांनुसार ठरवले होते. आणि या जोडप्याला दोन मुले देखील आहेत. दारूचे व्यसन असलेला पुरुषोत्तम हा तामिनाबाई यांच्या चारित्र्यावर संशय घेऊ लागला.
यातच पती-पत्नीमध्ये नेहमीच भांडण होत होते. या भांडणामुळेच सोमवारी (दि. १) तामिनाबाई पतीसोबत माहेरी निघाली होती. जंगल मार्गे येत असताना पुन्हा पती-पत्नीमध्ये भांडण झाले. याच रागाच्या भरात पुरुषोत्तमने मुलीचा गळा दाबून हत्या केल्याचा संशय मृत महिलेच्या आईने केला आहे.
दरम्यान, घटनेच्या तीन दिवसांनंतर कोमेली वनक्षेत्रात तामिनबाईचा मृतदेह संशयास्पद स्थितीत आढळून आला. पुरुषोत्तम यानेच मुलीची हत्या करून तिचा मृतदेह जंगलात टाकून दिल्याचा आरोप मृत महिलेच्या आईने केला असून, कोटगूल पोलिस ठाण्यात तक्रार केली. या तक्रारीच्या अनुषंगाने पोलिसांनी संशयित म्हणून पुरुषोत्तम यास शुक्रवारी (दि. ५) अटक केली.
Uttar Pradesh: ‘हात खाली कर’ असे ओरडत विद्यार्थ्याला मारहाण, कॉलेज कॅम्पसमधील व्हिडीओ वायरल