Photo Credit- Social Media ऋषिराजसोबत त्या दिवशी नेमकं काय घडलं
पुणे: राज्याचे माजी मंत्री आणि शिंदे गटाचे आमदार तानाजी सावंत यांच्या मुलाच्या अपहरणाची खोटी बातमी सोमवारी राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरली. मात्र, प्रत्यक्षात कोणतेही अपहरण झाले नव्हते. तानाजी सावंत यांचे पुत्र ऋषिराज सावंत मित्रांसह बँकॉकला गेले असल्याचे नंतर स्पष्ट झाले. त्यामुळे या ‘अपहरण’ प्रकरणावर पडदा पडला असला तरी, त्यासंबंधीचे तपशील सध्या राजकीय वर्तुळात चर्चेत आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी (10 फेब्रुवारी) संध्याकाळी साडेचारच्या सुमारास ऋषिराज सावंत स्विफ्ट कारने पुण्यातील लोहगाव विमानतळावर पोहोचले आणि तेथून मित्रांसोबत एका खासगी चार्टर्ड विमानाने बँकॉककडे रवाना झाले. या बँकॉक दौऱ्यासाठी ऋषिराज सावंत यांनी सुमारे 68 लाख रुपये खर्च केले होते. त्यांचे विमान अंदमान-निकोबार बेटांपर्यंत पोहोचले होते. मात्र, पुण्यातील गोंधळानंतर हवाई वाहतूक नियंत्रण कक्षाशी (ATC) संपर्क साधून हे चार्टर्ड विमान चेन्नई येथे उतरवण्यात आले. त्यानंतर इतर प्रवासी विमानातून बाहेर पडले आणि रात्री नऊच्या सुमारास हे विमान पुन्हा पुण्याच्या लोहगाव विमानतळावर परतले.
Incognito मोड काय आहे? इंकॉग्निटोवरील हिस्ट्री कशी डिलीट करावी? वेळीच जाणून
या संपूर्ण घटनेवर तानाजी सावंत यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. तानाजी सावंत म्हणाले की, ऋषिराज आणि त्यांच्यात कोणताही वाद नव्हता. “आम्ही रात्री निवांत गप्पा मारल्या. प्रदोष असल्यामुळे पहाटे ऋषिराजने रुद्राभिषेक केला आणि त्यानंतर आम्ही आपापल्या कामाला लागलो. आठ दिवसांपूर्वीच तो दुबईला गेला होता, त्यामुळे अचानक बँकॉकला जाण्याचा निर्णय त्याने कसा घेतला, हा प्रश्न मला पडला. दिवसभर आमचे अनेकदा फोनवर बोलणे झाले, मात्र तो अचानक विमानतळावर का गेला, हे समजत नव्हते, त्यामुळे आम्ही चिंतेत होतो,” असे त्यांनी सांगितले.
तानाजी सावंत म्हणाले, “त्याच्यासोबत त्याचे काही मित्र होते. पण ‘पप्पा रागावतील?’ या भीतीने त्याने मला काही सांगितले नसावे. त्याने काय विचार केला आणि हे कसे घडले, हे आता त्याच्या सांगण्यावर अवलंबून आहे.” त्यामुळे या प्रकरणात आणखी कोणते तपशील पुढे येतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
Navi Mumbai : पालिकेतील सफाई कर्मचाऱ्यांचा संप तुर्तास स्थगित
ऋषीराज तानाजी सावंत, प्रवीण प्रदीप उपाध्याय आणि संदीप श्रीपती वसेकर हे तिघेही बालपणीपासूनचे मित्र असून, त्यांनी एकाच महाविद्यालयात शिक्षण घेतले आहे. ऋषीराज हे माजी मंत्री तानाजी सावंत यांचे लहान चिरंजीव आहेत. काही दिवसांपूर्वीच या तिघांनी दुबईला प्रवास केला होता. त्यानंतर त्यांनी बँकॉकला जाण्याचा निर्णय घेतला.मात्र, कुटुंबीय या प्रवासाला परवानगी देणार नाहीत, याची जाणीव ऋषीराजला होती. त्यामुळे कोणालाही माहिती न देता त्यांनी स्वतःच पुणे-बँकॉक मार्गासाठी खासगी विमान बुक केले. यासाठी त्यांनी विमान कंपनीला लाखो रुपये आरटीजीएसद्वारे भरल्याचे समोर आले आहे. तीनही मित्रांनी 10 फेब्रुवारी रोजी संध्याकाळी साडेचारच्या सुमारास खासगी विमानाने बँकॉकच्या दिशेने उड्डाण केले.
DeepSeek बाबत मोठी अपडेट आली समोर, युजर्सची Identity धोक्यात! ‘या’ कंपनीने दिला
मात्र, मुलाने परस्पर खासगी विमान बुक करून लाखो रुपये खर्च केल्याची आणि मित्रांना सोबत नेल्याची माहिती मिळताच कुटुंबीय नाराज झाले. त्यामुळे तानाजी सावंत यांच्या संस्थेतील एका व्यक्तीने ऋषीराजचे नऱ्हे येथून अपहरण झाल्याची तक्रार सिंहगड पोलीस ठाण्यात दाखल केली. त्यानंतर तानाजी सावंत आणि त्यांचे मोठे चिरंजीव गिरीराज यांनी थेट पुणे पोलीस आयुक्तालयात जाऊन वरिष्ठ पोलीस अधिकारी तसेच एअर ट्रॅफिक कंट्रोल (ATC) यांच्याशी संपर्क साधला.
पोलिसांनी तत्काळ विमान कंपनी आणि एअर ट्रॅफिक कंट्रोलशी समन्वय साधला. विमानाचा कॅप्टन आणि वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांमध्ये चर्चा झाली. अखेर, विमान हिंदुस्थानच्या हद्दीतच थांबवण्याचे आदेश देण्यात आले आणि त्यानुसार रात्री 9 च्या सुमारास विमान पुणे विमानतळावर उतरवण्यात आले.