Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 9 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

पुण्यात कोयत्याने वार करुन तरुणाच्या खुनाचा प्रयत्न; नेमकं काय घडलं?

पुर्ववैमनस्यातून तरुणावर कोयत्याने वार करुन त्याच्या खुनाचा प्रयत्न केल्याची घटना घडली आहे. हा प्रकार खडकीतील रेंजहिल्स भागात घडला.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Mar 07, 2025 | 04:06 PM
पुण्यात कोयत्याने वार करुन तरुणाच्या खुनाचा प्रयत्न; नेमकं काय घडलं?

पुण्यात कोयत्याने वार करुन तरुणाच्या खुनाचा प्रयत्न; नेमकं काय घडलं?

Follow Us
Follow Us:

पुणे : राज्यात गुन्हेगारीचे प्रमाण वाढले आहे. राज्यातील वेगवेगळ्या भागातून गुन्हेगारीच्या घटना उघडकीस येत असतात. अशातचं आता पुणे जिल्ह्यातून एक मोठी बातमी समोर आली आहे. पुर्ववैमनस्यातून तरुणावर कोयत्याने वार करुन त्याच्या खुनाचा प्रयत्न केल्याची घटना घडली आहे. हा प्रकार खडकीतील रेंजहिल्स भागात घडला. याप्रकरणी पोलिसांनी एकाला अटक केली असून, साथीदार पसार झाले आहेत.

रेहान मोहम्मद शेख (वय २२, रा. खडकी) असे गंभीर जखमी झालेल्याचे नाव आहे. याप्रकरणी अनिकेत काळे (रा. रेंजहिल्स झोपडपट्टी, खडकी) याला अटक करण्यात आली असून, त्याचाबरोबर असलेला साथीदार आकाश काळे याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत रेहान शेख याने खडकी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, शेख आणि काळे यांच्यात काही महिन्यांपूर्वी वाद झाला होता. मंगळवारी (५ मार्च) रात्री अकराच्या सुमारास शेख रेंजहिल्स परिसरातून निघाला होता. त्यावेळी आरोपींनी त्याला अडवून शिवीगाळ केली. त्याच्यावर कोयत्याने वार करुन आरोपी पसार झाले. गंभीर जखमी झालेल्या शेख याला रुग्णालयात दाखल करण्यात आले. पोलिसांनी आरोपी अनिकेतला अटक केली असून, त्याच्याबारेबर असलेल्या साथीदाराचा शाेध धेण्यात येत आहे. पोलीस उपनिरीक्षक अर्जुन बेंदगुडे अधिक तपास करत आहेत.

पुतण्याने केला चुलत्याचा खून

आर्थिक वादविवादातून पुतण्याने चुलत्यावर लोखंडी हत्याराने वार करून त्यांचा खून केल्याची घटना गेल्या काही दिवसाखाली पाषाण येथे घडली आहे. याप्रकरणी चतुःशृंगी पोलिसांनी तत्काळ गुन्हा दाखल केला असून तिघांना ताब्यात घेतले आहे. महेश जयसिंगराव तुपे (वय.५६,रा. पाषाण) असे खून झालेल्याचे नाव आहे. याप्रकरणी महेश यांचा मुलगा वरद तुपे (वय १९) याने तक्रार दिली आहे. त्यावरून शुभम महेंद्र तुपे (वय २८), रोहन सूर्यवंशी (वय २०) आणि ओम बाळासाहेब निम्हण (वय २०, रा. सर्व पाषाण) यांना अटक केली आहे.

तरुणाला जिवे मारण्याची धमकी

धानोरीत वाद विवादातून तरुणाला तीक्ष्ण शस्त्राचा धाक दाखवून जिवे मारण्याची धमकी दिल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी पाच जणांवर गु्न्हा दाखल करण्यात आला. याप्रकरणी विकी लक्ष्मण जाधव (वय ३०, रा. गोकुळनगर, धानोरी) यांनी विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. याप्रकरणी ओंकारसिंग भोंड, गुरुदीपसिंग भोंड, जयदीपसिंग भोंड, गुरुबचन भोंड यांच्यावर गु्न्हा दाखल करण्यात आला. आरोपी वराह पालनाचा व्यवसाय करतात. जाधव यांच्या घरासमोरील मोकळ्या जागेत त्यांनी वराह पालन व्यवासाय सुरू केला. जाधव यांनी आरोपींना मनाई केली. त्यानंतर आरोपींनी जाधव यांना तीक्ष्ण शस्त्राचा धाक धाक दाखवून जिवे मारण्याची धमकी दिली. पोलीस उपनिरीक्षक सुडके तपास करत आहेत.

Web Title: A case of attempted murder of a young man by stabbing him with a coyote has been revealed in pune nrdm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 07, 2025 | 04:00 PM

Topics:  

  • cmomaharashtra
  • crime news
  • maharashtra
  • Police News
  • Pune Crime
  • Pune Police

संबंधित बातम्या

Devendra Fadnavis: ऊस उत्पादकांसाठी मोठी बातमी! 15 ऑक्टोबरपासून राज्यात गाळप हंगामाला सुरुवात
1

Devendra Fadnavis: ऊस उत्पादकांसाठी मोठी बातमी! 15 ऑक्टोबरपासून राज्यात गाळप हंगामाला सुरुवात

Dharashiv News: धाराशिव शासकीय वैद्यकीय महाविद्यालय परिसरात विनापरवानगी वृक्षतोड? जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार
2

Dharashiv News: धाराशिव शासकीय वैद्यकीय महाविद्यालय परिसरात विनापरवानगी वृक्षतोड? जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार

Pratap Sarnaik: ॲप टॅक्सी चालकांसाठी मोठी बातमी! कंपन्यांना 3 महिन्यांत द्यावी लागणार चालकांची संपूर्ण माहिती
3

Pratap Sarnaik: ॲप टॅक्सी चालकांसाठी मोठी बातमी! कंपन्यांना 3 महिन्यांत द्यावी लागणार चालकांची संपूर्ण माहिती

Gondiya News: रोजगाराचा शोध काळाने रस्त्यावरच संपवला!  गोंदियामध्ये ट्रकच्या धडकेत मध्य प्रदेशातील ६ मजुरांचा मृत्यू
4

Gondiya News: रोजगाराचा शोध काळाने रस्त्यावरच संपवला!  गोंदियामध्ये ट्रकच्या धडकेत मध्य प्रदेशातील ६ मजुरांचा मृत्यू

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.