Photo Credit- Social Media टेकड्यांवर लुटमार करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश; डेक्कन पोलिसांची मोठी कारवाई
पुणे: शहरात टेकड्यांवर फिरण्यासाठी गेलेल्यांवर नागरिकांच्या लटुमारीच्या घटनां गेल्या काही दिवसांपासून सातत्याने वाढल्या होत्या. टेकड्यांवर फिरायला जाणाऱ्या नागरिकांनी अनेकदा तक्रारीही केल्या होत्या. अखेर नागरिकांची लुटमार लुटमार करणाऱ्य टोळीचा पर्दाफाश डेक्कन पोलिसांना यशस्वीपणे केला आहे. या टोळीकडून चार गुन्ह्यांची उकल करण्यात आली असून, विशेष म्हणजे, कोयता घेऊन लुटमारी करणाऱ्याला पोलिसांनी रंगेहाथ पकडले आहे.
स्वप्नील शिवाजी डोंबे (वय ३२, जनता वसाहत) आणि अनिकेत अनिल स्वामी (वय २५) असून, त्यातल्या एका आरोपी मोंटी उर्फ तेजस खराडे (वय २५) ला पोलिसांनी गस्तीदरम्यान ताब्यात घेतले आहे. हे तिघेही सराईत गुन्हेगार असून, आणखी गुन्हे करण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. याबाबत तपास सुरू आहे, अशी माहिती परिमंडळ एकचे उपायुक्त संदिपसिंह गिल्ल यांनी पत्रकार परिषदेत दिली.
विद्यार्थिनींचा पाठलाग करून फोटो काढणाऱ्या ‘त्या’ दोघांना अटक; पोलिसांची चौकशी सुरु
मिळालेल्या माहितीनुसार, पोलीस उपनिरीक्षक महेश भोसले, अजय भोसले, दत्तात्रय सावंत, राजेंद्र मारणे, धनश्री सुपेकर, सागर घाडगे आणि त्यांच्या पथकाने ही कारवाई केली. शहरातील टेकड्यांवर सायंकाळी आणि मॉर्निंग वॉकसाठी नागरिक, तसेच महाविद्यालयीन तरुण-तरुणी मोठ्या प्रमाणावर जातात. मात्र, हीच संधी साधून या ठिकाणी हे तिघे नागरिकांची लुटमारी करत होते, दोन दिवसांपूर्वी हनुमान टेकडीवर 17 वर्षांच्या महाविद्यालयीन मुलीला आणि तिच्या मित्राला लुटले होते. त्यानंतर या कारवाईला वेग आला.
गुन्ह्याचा तपास वरिष्ठ निरीक्षक गिरीषा निंबाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू होता. यावेळी पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक विश्लेषण केले. त्यानुसार आरोपींची दुचाकी तपासल्या गेली आणि स्वप्नील डोंबे व अनिकेत स्वामी यांचा संशयीत संपर्क समोर आला. त्यांनी गुन्हा केल्याची कबुली दिली. पुढील तपासात हेही समोर आले की, त्यांच्यावर गेल्या वर्षी हनुमान टेकडीवरील आणखी एक लुटमारी करण्याचा आरोप आहे. डेक्कन पोलिसांकडून दोन्ही आरोपींच्या ताब्यातून दोन लाखांहून अधिक रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे. यासोबतच त्यांच्याविरुद्ध विविध गुन्हे दाखल आहेत.
Pune Crime: पत्नी, सासूच्या त्रासाला कंटाळून युवकाने उचलले टोकाचे पाऊल
दुसरीकडे कोल्हापूरमधून धक्कादायक बातमी आहे. भाचीने पळून जाऊन विवाह केल्याने संतापलेल्या मामाने भाचीच्या रिसेप्शनच्या जेवणात विष कालवल्याचा धक्कादायक प्रकार कोल्हापूर जिल्ह्यातील पन्हाळा तालुक्यातील उत्रे या गावी घडला. दरम्यान, हा प्रकार जेवण करणाऱ्या आचाऱ्यासमोर घडल्याने मोठा अनर्थ टळला. पन्हाळा पोलीस ठाण्यामध्ये या संदर्भात गुन्हा दाखल झाला असून आरोपी मामाचा पोलिसांकडून शोध सुरू करण्यात आला आहे. महेश ज्योतीराम पाटील असं भाचीच्या रिसेप्शनच्या जेवणात विष कालवणाऱ्या मामाचं नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार महेश पाटीलच्या भाचीने एक आठवड्यापूर्वी गावातील एका मुलासोबत पळून जाऊन विवाह केला होता. त्यामुळे मर्जीविरोधात भाचीचा विवाह झाल्याने मामाचा पारा चांगलाच चढला होता. त्यामुळे भाचीने पळून जाऊन लग्न केल्याने आपली बदनामी झाली या रागातून मामाने थेट रिसेप्शनच्या जेवणामध्ये आचाऱ्यासमोर विष टाकले. जेवणात विषारी औषध टाकत असताना आचारी सुद्धा समोर होता. त्यामुळे हे विष टाकलेलं जेवण कोणाचे पोटात गेलं नाही. मात्र, जेवणामध्ये विषारी औषध टाकत असतानाच मामा आणि आचाऱ्याची चांगलीच झटापट झाल्याची चर्चा आहे. जेवणामध्ये विषारी औषध टाकून लोकांच्या जीवास धोका पोहोचवणारा प्रकार उघड झाल्याने मोठा अनर्थ टळला आहे.