
रेल्वे प्रवाशांवर चोरट्यांचा 'डल्ला'! नांदेड स्टेशन गुन्हेगारीत अव्वल (Photo Credit - AI)
नांदेड, भुसावळ, संभाजीनगर ‘चोरट्यांचे टार्गेट’
संपूर्ण लोहमार्ग पोलीस विभागात सर्वाधिक चोरीचे गुन्हे खालीलप्रमाणे नोंदवले गेले आहेत:
ही तिन्ही स्थानके सतत वर्दळीची असल्याने चोरट्यांचे प्रमुख टार्गेट ठरत असल्याचे लोहमार्ग पोलिसांनी स्पष्ट केले आहे. गर्दीच्या वेळी जनरल कोचपासून प्लॅटफॉर्मपर्यंत सर्वत्र चोरटे सक्रिय असल्याचे पोलीस सांगतात.
हे देखील वाचा: पुण्यात बनावट गुटख्याच्या कारखान्यावर पोलिसांचा छापा; एक कोटींचा मुद्देमाल जप्त
चोरी कशाची होते?
पोलिसांच्या माहितीनुसार, चोरीच्या घटनांमध्ये मोबाईल चोरीचे प्रमाण सर्वाधिक आहे. यानंतर दागदागिने आणि रोख रकमेचा क्रम लागतो. अनेक प्रवाशांना तर गाडी स्टेशन सोडल्यानंतर काही मिनिटांनीच चोरी झाल्याचे कळते. रेल्वेत चढताना-उतरताना होणारी घाई, ढकलाढकली आणि गोंधळ हे चोरट्यांसाठी ‘सुरक्षित कवच’ ठरते. लोकांच्या पाठीवरची बॅग, हातातील मोबाईल किंवा खांद्यावर अडकवलेली
‘ट्रॅव्हलिंग चोरटे’ सक्रिय
काही विशिष्ट टोळ्या विशिष्ट गाड्यांमध्ये लक्ष ठेवून ट्रॅव्हलिंग चोरटे म्हणून सक्रिय असतात. ते एकटा प्रवास करणाऱ्या व्यक्तीचा मोबाईल, पर्स किंवा चेन ओढतात. दाराजवळ उभ्या असलेल्या प्रवाशांना लक्ष्य करतात. गर्दीत मुद्दाम धक्का देऊन वस्तू हिसकावतात आणि गाडी सुटताच दुसऱ्या डब्यात किंवा प्लॅटफॉर्मवरील गर्दीत लगेच गायब होतात.
पोलिसांसमोर मोठे आव्हान आणि उपाययोजना
नांदेड, मनमाड, भुसावळ, इगतपुरी मार्गावरील गाड्यांची संख्या गेल्या काही वर्षांत मोठ्या प्रमाणात वाढल्याने प्रवाशांची वर्दळही वाढली आहे. त्यामुळे लोहमार्ग पोलिसांसमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे.
पोलिसांकडून राबवले जाणारे उपाय:
टॉप टेन रेल्वे स्टेशनमध्ये नोंद झालेले गुन्हे (जानेवारी-ऑक्टोबर):
| रेल्वे स्टेशन | चोरीचे गुन्हे (नोंदी) |
| नांदेड | ५२६ |
| भुसावळ | ५०६ |
| छत्रपती संभाजीनगर | ३०३ |
| नाशिक रोड | २१० |
| परळी | ७९ |
| शेवगाव | १६३ |
| नंदुरबार | १२९ |
| इगतपुरी | ९३ |
| चाळीसगाव | १०६ |