धक्कादायक ! 21 वर्षीय विवाहितेची गळफास घेऊन आत्महत्या; 14 महिन्यांपू्र्वीच झाला होता विवाह (सौजन्य : iStock)
बुलडाणा : गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ होताना दिसत आहे. त्यात खून, खुनाचा प्रयत्न, दरोडा यांसह महिलांवरील अत्याचाराच्या घटनांमध्ये लक्षणीय वाढ होत आहे. त्यातच आता मुलीचे प्रेमसंबंध आहेत, अशी समाजात खोटी बदनामी करून तिला जीवे मारण्याची धमकी दिली. तिचा छळ सुद्धा केल्याने पीडितेने या जाचाला कंटाळून विषारी द्रव्य घेऊन आत्महत्या केली.
पीडित तरुणीने आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलल्याने खळबळ उडाली आहे. याप्रकरणी पीडितेस आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी तिघांविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. ही घटना मोताळा तालुक्यातील बोराखेडी पोलिस ठाण्यांतर्गत उघडकीस आली. बेबी राजू सोळंके (रा. दाताळा, ता. मलकापूर, जि. बुलढाणा, ह. मु. तालखेड, ता. मोताळा) यांनी आरोपी नातेवाईक विजू अशोक सोळंके, हिरामण सदाशिव पवार, प्रमिला हिरामण पवार (सर्व रा. परडा फाटा, ता. मोताळा) यांच्याविरुद्ध बोराखेडी पोलिस ठाण्यात तक्रार दिली.
या दिलेल्या तक्रारीत नमूद केले की, आरोपींनी त्यांचा मुलगा विश्वजित याच्यासोबत मृत मुलगी लता राजू सोळंके (वय 21) हिचे प्रेमसंबध असल्याची समाजात खोटी बदनामी केली व तिला जीवे मारण्याची धमकी दिली होती. त्यामुळे तिने आरोपींच्या जाचाला कंटाळून विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केली. या आरोपींनी मृताला आत्महत्येस प्रवृत्त केले आहे. याप्रकरणी पोलिसांनी आरोपी विजू, हिरामण, प्रमिला यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
कोल्हापुरातही तरुणाची आत्महत्या
दुसऱ्या एका घटनेत, सहकारी मित्राकडून होणाऱ्या त्रासाला कंटाळून एका तरुणाने आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. आकाश शांताराम बोराडे (वय २३, सध्या, रा. आर. के. नगर, कोल्हापूर, मूळ कतराबाद, परांदा, जि. धाराशिव) असे गळफास घेऊन आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. पोलिसांनी रुममधून चार पानाची सुसाईड नोट ताब्यात घेतली आहे.