Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 21 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

खळबळजनक ! पुण्यात आयटी मॅनेजरवर भोंदूबाबाचा लैंगिक अत्याचार; 25 वर्षांपासून प्रकार होता सुरु, व्हिडिओ-फोटो काढले अन्…

हरियाणातील हिसारची असेलली तक्रारदार महिला पुण्यातील नामांकित आयटी कंपनीत असोसिएट मॅनेजर आहे. तिचे वडील डॉक्टर होते. या कुटुंबाची २००० मध्ये स्वामी केवल नयनशी ओळख झाली.

  • By कृपादान आवळे
Updated On: Jun 18, 2026 | 09:20 AM
खळबळजनक ! पुण्यात आयटी मॅनेजरवर भोंदूबाबाचा लैंगिक अत्याचार; 25 वर्षांपासून प्रकार होता सुरु, व्हिडिओ-फोटो काढले अन्...

खळबळजनक ! पुण्यात आयटी मॅनेजरवर भोंदूबाबाचा लैंगिक अत्याचार; 25 वर्षांपासून प्रकार होता सुरु, व्हिडिओ-फोटो काढले अन्...

Follow Us
Follow Us:

पुणे : गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारीच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत असल्याचे दिसून येत आहे. किरकोळ कारणावरून खून, खुनाचा प्रयत्न यांसारखे गुन्हे घडत आहेत. महिलांवरील अत्याचाराच्या घटनाही लक्षणीय आहेत. असे असताना स्वतःला ‘ईश्वराचा अवतार’ व आध्यात्मिक गुरु भासवत आयटी कंपनीत व्यवस्थापक असलेल्या उच्चशिक्षित महिलेवर २५ वर्षे लैंगिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार पुण्यात उघडकीस आला आहे.

याप्रकरणी मुख्य आरोपी राधामोहन मिश्रा याच्यासह साथीदारांविरुद्ध खराडी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मूळची हरियाणातील हिसारची असेलली तक्रारदार महिला पुण्यातील नामांकित आयटी कंपनीत असोसिएट मॅनेजर आहे. तिचे वडील डॉक्टर होते. या कुटुंबाची २००० मध्ये स्वामी केवल नयनशी ओळख झाली. घरात वाईट शक्तींचा वावर असल्याचे सांगून त्याने कुटुंबाचा विश्वास संपादन केला.

तक्रारीनुसार, मिश्राने स्वतःला ईश्वराचा अवतार सांगत कुटुंबावर मानसिक वर्चस्व निर्माण केले. मला गुरु मानले नाही, तर मोठे नुकसान होईल, अशी भीती दाखवून सर्वांना प्रभावाखाली घेतले.

Hariyana Crime : माहेरी आलेल्या मुलीला खोलीत नेलं अन्… सावत्र बापाच्या कृत्याने खळबळ

दरम्यान, शिक्षण घेणाऱ्या पीडितेला कॉम्प्युटर शिकवण्याच्या बहाण्याने खोलीत बोलावून तिच्यावर त्याने लैंगिक अत्याचार केले. याप्रकरणी राधामोहन मिश्रा, श्वेता मिश्रा, स्वामी केवल नयन, गोविंद ब्रह्मचारी, नारायण साई, श्वेता पांडेसह इतर साथीदारांविरुद्ध अंधश्रद्धा जादूटोणा विरोधी कायद्याखाली गुन्हा दाखल झाला असून, पुढील तपास सुरू आहे.

व्हिडिओ काढून ब्लॅकमेल, मारहाण

पुढे २०१० मध्ये कुटुंब पुण्यात स्थलांतरित झाले. वडगावशेरी आणि नंतर वाघोली भागात राहताना आरोपीने पीडितेवर वारंवार अत्याचार केल्याचा आरोप आहे. तसेच अश्लील व्हिडिओ काढून ब्लॅकमेलिंग, मारहाण आणि मानसिक छळही केल्याचे तक्रारीत नमूद आहे.

घरच्यांनी पीडितेवरच अविश्वास दाखवला

नंतर राधामोहन मिश्रा याच्याशी त्यांची ओळख करून दिली. विशेष म्हणजे, पीडितेने २०१६ मध्ये आई-वडिलांना अत्याचाराबाबत माहिती दिली होती. मात्र, आरोपीच्या प्रभावाखाली असलेल्या कुटुंबीयांनी तिच्यावरच अविश्वास दाखवल्याचा आरोप आहे. अखेर दीर्घकाळ चाललेल्या छळापायी तरुणीने पोलिसांकडे धाव घेतली.

Uttarakhand News : 12 वीची टॉपर, पण नैराश्याशी हरली; सुसाईड नोटमध्ये लिहिलं ‘आय लव्ह यू मम्मी-पप्पा’

Web Title: A man sexually assaults it manager in pune

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 18, 2026 | 08:30 AM

Topics:  

  • Abused Case
  • Crime in Pune
  • crime news

संबंधित बातम्या

सासवडमध्ये कायदा-सुव्यवस्थेचे धिंडवडे, कार आडवी लावून वकिलासह पत्नीला बेदम मारहाण; शहरात संताप
1

सासवडमध्ये कायदा-सुव्यवस्थेचे धिंडवडे, कार आडवी लावून वकिलासह पत्नीला बेदम मारहाण; शहरात संताप

शाहूनगर डोरेमॉन खून प्रकरणी मोठी अपडेट; पोलिसांनी आरोपींना तेलंगणातून घेतले ताब्यात
2

शाहूनगर डोरेमॉन खून प्रकरणी मोठी अपडेट; पोलिसांनी आरोपींना तेलंगणातून घेतले ताब्यात

आयटी इंजिनिअरने आधी पत्नीला संपवलं, नंतर स्वत:वरही वार केले अन्…; देहूगावातील घटनेनं खळबळ
3

आयटी इंजिनिअरने आधी पत्नीला संपवलं, नंतर स्वत:वरही वार केले अन्…; देहूगावातील घटनेनं खळबळ

माळेगावात घरासमोरील कंपाउंड पाडल्याने वाद चिघळला; पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल, आरोपींना अटक
4

माळेगावात घरासमोरील कंपाउंड पाडल्याने वाद चिघळला; पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल, आरोपींना अटक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.