Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 17 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

वराळेत जुन्या भांडणाच्या रागातून तरुणावर हल्ला, कोयत्याने सपासप वार करुन संपवलं; आठ जणांवर गुन्हा दाखल

मावळ तालुक्यातील वराळे येथे जुन्या भांडणाच्या रागातून तरुणावर कोयत्याने वार करून तसेच दगडाने मारहाण केल्याची धक्कादायक घटना रविवारी (दि. 30) पहाटेच्या सुमारास घडली आहे. या हल्ल्यात प्रशांत शिंगाडे याचा मृत्यू झाल्याची माहिती पोलिसांनी दिली.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Aug 31, 2026 | 12:15 PM
वराळेत जुन्या भांडणाच्या रागातून तरुणावर हल्ला, कोयत्याने सपासप वार करुन संपवलं; आठ जणांवर गुन्हा दाखल

वराळेत जुन्या भांडणाच्या रागातून तरुणावर हल्ला, कोयत्याने सपासप वार करुन संपवलं; आठ जणांवर गुन्हा दाखल

Follow Us
Follow Us:
  • वराळेत जुन्या भांडणाच्या रागातून तरुणावर हल्ला
  • कोयत्याने सपासप वार करुन संपवलं
  • आठ जणांवर गुन्हा दाखल
वडगाव मावळ : राज्यासह देशभरात गुन्हेगारी वाढली असून, दररोज वेगवेगळ्या भागात गुन्हेगारीच्या गंभीर घटना घडत आहेत. अशातच आता एक मोठी बातमी समोर आली आहे. मावळ तालुक्यातील वराळे येथे जुन्या भांडणाच्या रागातून तरुणावर कोयत्याने वार करून तसेच दगडाने मारहाण केल्याची धक्कादायक घटना रविवारी (दि. 30) पहाटेच्या सुमारास घडली आहे. या हल्ल्यात प्रशांत शिंगाडे याचा मृत्यू झाल्याची माहिती पोलिसांनी दिली. या प्रकरणी आठ जणांविरुद्ध तळेगाव एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रशांत शिंगाडे हा मित्रासोबत चहा पिण्यासाठी शिक्षक कॉलनी, वराळे येथील एस. डी. फोटो स्टुडिओजवळ थांबला होता. त्यावेळी साहिल समुखराव (वय 18) सुनील समुखराव, (वय 24) यश लोखंडे, (वय 19) प्रतीक तातळे, (28) हेमराज सोनवणे (वय 28) रोहन सावंत (वय 19) रुद्र कांबळे (वय17) व रोशन साव (वय 17. सर्व राहणार समता कॉलनी. वराळे. ता. मावळ) यांनी सार्वजनिक ठिकाणी दहशत निर्माण केल्याचा आरोप आहे. जुन्या भांडणाच्या कारणातून प्रशांतच्या डोक्यावर, हातावर, छातीवर व पाठीवर धारदार कोयत्याने वार करण्यात आल्याचे तक्रारीत नमूद आहे. तसेच डोक्यात दगड मारल्याचेही पोलिसांकडे दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे.

हे सुद्धा वाचा  : जुना वादातून मामेभावाच्या डोक्यात हातोडा घालून खून, सोबतच्या मित्रालाही मारहाण; संभाजीनगरमधील घटनेनं खळबळ

घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली आहे. गुन्ह्यात फॉर्च्यूनर वाहनाचा (MH14HM 4060) वापर झाल्याचे नमूद असून, धारदार कोयता हे हत्यार वापरल्याचे पोलिसांनी सांगितले. या प्रकरणी गुन्हा रजि. नं. 248/2026 नुसार भारतीय न्याय संहिता तसेच आर्म्स अॅक्ट, महाराष्ट्र पोलिस अधिनियम आणि क्रिमिनल लॉ अमेंडमेंट अॅक्टच्या संबंधित कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस उपनिरीक्षक जगदाळे यांनी गुन्हा दाखल केला असून, तपास पीएसआय प्रशांत रेळेकर. सहाय्यक पोलीस निरीक्षक  मोहिते करीत आहेत.

‘भावेश मोरेशी वाद का घालतो ?’ म्हणत तरुणावर हल्ला

वैमनस्यातून टोळक्याने तरुणाला मारहाण करुन तीक्ष्ण शस्त्राने वार केल्याची घटना पुण्यातील बिबवेवाडीत घडली आहे. याप्रकरणी टोळक्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. साक्षर महेश अडागळे (वय २५, रा. मीनाताई ठाकरे वसाहत, गुलटेकडी) असे गंभीर जखमी झालेल्याचे नाव आहे. याप्रकरणी साई शिंदे, राहुल ख्याडगी, मोहन जीवन विद्यासागर (तिघे रा. शिवतेजनगर, बिबवेवाडी) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, साक्षर अडागळे (दि. २७ ऑगस्ट) हा बिबवेवाडी येथील समर्थनगर परिसरातून निघाला होता. त्यावेळी आरोपींनी त्याला अडवले. ‘भावेश मोरेशी वाद का घालतो ?’, अशी विचारणा करुन आरोपींनी त्याला मारहाण केली.

Web Title: A man was murdered in maval taluka due to a grudge stemming from an old dispute

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 31, 2026 | 12:14 PM

Topics:  

  • Arrested News
  • maval news
  • Murder Case

संबंधित बातम्या

भंगार चोरण्यासाठी निघाले अन् बंगल्यातील सोन्यावर मारला डल्ला! तळवडेतील चोरीप्रकरणी तिघांना अटक
1

भंगार चोरण्यासाठी निघाले अन् बंगल्यातील सोन्यावर मारला डल्ला! तळवडेतील चोरीप्रकरणी तिघांना अटक

हिंजवडीत एमडी ड्रग्जचा मोठा साठा जप्त; राजस्थानच्या तरुणासह दोघांना ठोकल्या बेड्या
2

हिंजवडीत एमडी ड्रग्जचा मोठा साठा जप्त; राजस्थानच्या तरुणासह दोघांना ठोकल्या बेड्या

किरकोळ वादातून रक्तरंजित थरार! २१ वर्षीय तरुणाचा खून; वाघोलीतील घटनेनं खळबळ
3

किरकोळ वादातून रक्तरंजित थरार! २१ वर्षीय तरुणाचा खून; वाघोलीतील घटनेनं खळबळ

अर्धापूरमधील शेतशिवारात रक्तरंजित थरार! २५ वर्षीय शेतकऱ्याची धारदार शस्त्राने हत्या
4

अर्धापूरमधील शेतशिवारात रक्तरंजित थरार! २५ वर्षीय शेतकऱ्याची धारदार शस्त्राने हत्या

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.