शिरुरमध्ये झोपलेल्या कुटुंबाला सत्तूरच्या धाकाने लुटले (File Photo : Crime)
चांदूर रेल्वे : जमिनीच्या वादातून 78 वर्षीय व्यक्तीने 50 वर्षीय महिलेवर कुऱ्हाडीने वार करून हत्या केली. ही घटना बुधवारी (दि.12) सकाळी साडेदहाच्या सुमारास घडली. या घटनेनंतर पोलिसांनी आरोपी श्रावण अभिमान खर्गे (वय 78, रा. चांदूर रेल्वे) याला अटक केली. शीला ज्ञानेश्वर टेंबे (वय 50, रा. चांदूर रेल्वे) असे मृत महिलेचे नाव आहे.
चांदूर रेल्वे येथील शीला टेंबे आणि आरोपी श्रावण खर्गे यांच्यात अनेक महिन्यांपासून जमिनीचा वाद सुरू होता. दोघांमध्ये दररोज वाद होत होते. अशातच 12 फेब्रुवारी रोजी सकाळी साडेदहा वाजता श्रावण आणि शीला जुन्या जागेवरून वाद झाला. वाद इतका वाढला की, श्रवण खर्गे याने घरातून कुऱ्हाड आणून शीला यांच्यावर हल्ला केला. या हल्ल्यात महिला रक्तबंबाळ अवस्थेत खाली पडली. दरम्यान, कुटुंबीयांनी शीला यांना तातडीने उपजिल्हा रुग्णालयात नेले. परंतु, तेथे डॉक्टरांनी शीला टेंबे यांना मृत घोषित केले. या घटनेची माहिती तत्काळ चांदूर रेल्वे पोलिसांना देण्यात आली. पोलिसांच्या पथकाने घटनास्थळी पोहोचून पंचनामा केला.
दरम्यान, या प्रकरणात वैशाली प्रकाश टेंबे (वय 44, रा. चांदूर रेल्वे) यांच्या फिर्यादीवरून चांदूर रेल्वे पोलिसांनी आरोपी श्रावण अभिमान खडगे याच्याविरुद्ध कलम 103 (1) अन्वये गुन्हा दाखल करून त्याला अटक केली. चांदूर रेल्वे पोलिस पुढील तपास आणून शीला यांच्यावर हल्ला केला. यात महिला करत आहेत.
तरुणाला बेदम मारहाण
इन्स्टाग्रामवर ओळख होऊन आंतरजातीय प्रेम विवाह केलेल्या तरुणास भुयेवाडी तालुका करवीर येथून अपहरण करून सांगली येथे एका फ्लॅटमध्ये डांबून ठेवले होते. त्या तरुणाची कोल्हापूर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी कौशल्याने तपास करून सुटका केली. विशाल मोहन अडसूळ (वय २६, रा. निगवे दुमाला, तालुका करवीर) असे अपहरण झालेल्या तरुणाचे नाव आहे.
तरुणाची निर्घृण हत्या
शिरपूर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील चांडस येथे प्रेमप्रकरणातून एका तरुणाची निर्घृण हत्या करण्यात आल्याने एकच खळबळ उडाली. महेश रुपराव हाडे (वय 35, रा. गोहगाव हाडे) असे तरुणाचे नाव असून, ही घटना रविवारी (दि. 9) घडली. याप्रकरणी शिरपूर पोलिसांनी 8 जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, यापैकी 5 जणांना पोलिसांनी अटक केली आहे.