Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 14 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

पत्नीच्या प्रियकराला चाकूने भोसकून संपवलं; पुणे-सातारा महामार्गावरील सारोळे गावातील थरार

पुणे -सातारा महामार्गालगत असलेल्या भोर तालुक्यातील सारोळे गावच्या हद्दीत (सारोळे ते वीर रस्ता) प्रेमप्रकरणाच्या संशयातून एका ३५ वर्षीय तरुणावर चाकूने प्राणघातक हल्ला करून त्याची हत्या करण्यात आल्याची थरारक घटना घडली आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Aug 29, 2026 | 04:28 PM
दारू पाजून तरुणाची हत्या

दारू पाजून तरुणाची हत्या

Follow Us
Follow Us:
  • पत्नीच्या प्रियकराला चाकूने भोसकून संपवलं
  • पुणे-सातारा महामार्गावरील सारोळे गावातील थरार
  • राजगड पोलिसांची घटनास्थळी धाव
भोर : राज्यासह देशभरात गुन्हेगारी वाढली असून, दररोज खून, खुनाचा प्रयत्न, मारहाण यासारख्या घटना घडत आहेत. वाढत्या गुन्हेगारीमुळे नागरिकांमध्ये भिती निर्माण होत आहे. अशातच आता एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. पुणे -सातारा महामार्गालगत असलेल्या भोर तालुक्यातील सारोळे गावच्या हद्दीत (सारोळे ते वीर रस्ता) प्रेमप्रकरणाच्या संशयातून एका ३५ वर्षीय तरुणावर चाकूने प्राणघातक हल्ला करून त्याची हत्या करण्यात आल्याची थरारक घटना घडली आहे. गुरुवार (दि. २७) रात्री साडेदहाच्या सुमारास हा प्रकार उघडकीस आला आहे.

अमर नंदू पवार (वय ३५, रा. नागेश्वर कॉलनी, शिंदेवाडी, ता. खंडाळा, जि. सातारा) असे खून झालेल्या दुर्दैवी तरुणाचे नाव आहे. या प्रकरणी राजगड पोलीस ठाण्यात दीपक मनोहर पाल (मूळ रा. उत्तर प्रदेश) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिसांनी त्याला तातडीने अटक केली आहे. मृत अमर पवार याचा चुलत भाऊ अमित जगन्नाथ पवार यांनी राजगड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत अमर पवार याचे आरोपी दीपक पाल याच्या पत्नीसोबत अनैतिक प्रेमसंबंध असल्याचा संशय दीपकला होता. याच पूर्वद्वेषातून आणि रोषातून दीपकने अमरचा काटा काढण्याचा कट रचला होता. गुरुवारी रात्रीच्या सुमारास सारोळे ते वीर रस्त्यावरून अमर पवार, आरोपीची पत्नी आणि तिची मुलगी असे तिघे जण पायी चालले होते. पूर्वयोजनाबद्ध कटानुसार दबा धरून बसलेल्या दीपक पाल याने पाठीमागून येऊन अमर पवार याच्यावर अचानक सुऱ्याने व चाकूने मान आणि गळ्यावर बेछूट वार केले. या अचानक झालेल्या हल्ल्यात अमर पवार रक्ताच्या थारोळ्यात खाली कोसळले. मानेवर आणि गळ्यावर खोल जखमा झाल्यामुळे त्यांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेमुळे सारोळे व शिंदेवाडी परिसरात मोठी दहशत व तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

हे सुद्धा वाचा : पापा जाधव हत्याकांड प्रकरणात मोठी अपडेट; पोलिसांच्या तपासातून धक्कादायक माहिती समोर

राजगड पोलिसांची घटनास्थळी धाव

माहिती मिळताच राजगड पोलिस ठाण्याचे वरिष्ठ अधिकारी व पथकाने तत्काळ घटनास्थळी धाव घेत आरोपी दीपक पाल याला रात्री उशिरा ताब्यात घेतले. न्यायालयाने त्याला पोलिस कोठडी सुनावली असून, राजगड पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक संतोष जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक राठोड व पथक पुढील अधिक तपास करीत आहे.

Web Title: A person has been murdered in sarole village on the pune satara highway

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 29, 2026 | 04:28 PM

Topics:  

  • CM Devedra Fadnavis
  • crime news
  • Murder Case

संबंधित बातम्या

Maharashtra Live Breaking News in Marathi: आशुतोष रांका, सौरव दास यांना पाच दिवसांची न्यायालयीन कोठडी
1

Maharashtra Live Breaking News in Marathi: आशुतोष रांका, सौरव दास यांना पाच दिवसांची न्यायालयीन कोठडी

राज्य सरकारी विभागांत मोठा घोटाळा; तब्बल 700 कोटींच्या गैरव्यवहारप्रकरणी चौघांना अटक, CBI ची कारवाई
2

राज्य सरकारी विभागांत मोठा घोटाळा; तब्बल 700 कोटींच्या गैरव्यवहारप्रकरणी चौघांना अटक, CBI ची कारवाई

पिंपळवंडीत पुलावर तरुणाला मारहाण, जीव वाचवण्याच्या प्रयत्नात मृत्यू; नेमकं काय घडलं?
3

पिंपळवंडीत पुलावर तरुणाला मारहाण, जीव वाचवण्याच्या प्रयत्नात मृत्यू; नेमकं काय घडलं?

Goa News : महाराष्ट्राच्या धर्तीवर गोव्यातही मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी कक्ष सुरू; मंगेश चिवटे यांच्या संकल्पनेला यश
4

Goa News : महाराष्ट्राच्या धर्तीवर गोव्यातही मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी कक्ष सुरू; मंगेश चिवटे यांच्या संकल्पनेला यश

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.