Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 29 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Asian Para Games 2026 |
  • India Vs New Zealand |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

दारू पिण्यासाठी पैसे न दिल्याचा राग अनावर; दारूड्याकडून पत्नीची चाकूने भोसकून हत्या

दारू पिण्यासाठी पैसे देण्यास पत्नीने नकार दिल्याच्या कारणावरून संतापलेल्या पतीने पत्नीवर चाकूने जीवघेणा हल्ला करून तिची निघृण हत्या केल्याची धक्कादायक घटना रविवारी सकाळी भडगाव तालुक्यातील वसंतवाडी तांडा येथे घडली आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Jul 27, 2026 | 01:34 PM
दारू पिण्यासाठी पैसे न दिल्याचा राग अनावर; दारूड्याकडून पत्नीची चाकूने भोसकून हत्या

दारू पिण्यासाठी पैसे न दिल्याचा राग अनावर; दारूड्याकडून पत्नीची चाकूने भोसकून हत्या

Follow Us
Follow Us:

जळगाव : राज्यासह देशभरात गुन्हेगारी वाढली असून, अशातच आता दारू पिण्यासाठी पैसे देण्यास पत्नीने नकार दिल्याच्या कारणावरून संतापलेल्या पतीने पत्नीवर चाकूने जीवघेणा हल्ला करून तिची निघृण हत्या केल्याची धक्कादायक घटना रविवारी सकाळी भडगाव तालुक्यातील वसंतवाडी तांडा येथे घडली आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून कौटुंबिक हिंसाचाराच्या वाढत्या घटनांबाबत पुन्हा एकदा चिंता व्यक्त होत आहे.

 

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, रविवार (दि. २६) सकाळी सुमारे ८.३० वाजेच्या सुमारास भडगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील वसंतवाडी तांडा येथे आत्माराम पतीलाल राठोड (वय ४०) याने दारू पिण्यासाठी पत्नीकडे पैशांची मागणी केली. पत्नी ललिता आत्माराम राठोड (वय ३६) यांनी पैसे देण्यास नकार दिल्याने संतापलेल्या आत्मारामने घरातील चाकूने तिच्या पोटावर वार केले. या हल्ल्यात ललिता राठोड गंभीर जखमी झाल्या. त्यांना तात्काळ वैद्यकीय मदत मिळण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच भडगाव पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून पंचनामा व पुढील तपासाची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.

हे सुद्धा वाचा : गोळीबार प्रकरण चांगलेच भोवले! अधिकाऱ्यांची बदली; पोलीस आयुक्तांनी घेतला मोठा निर्णय

भडगाव तालुक्यातील वसंतवाडी तांडा हादरला

या प्रकरणी आरोपी पतीविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून पोलीस अधिक तपास करीत आहेत. दारूच्या व्यसनातून निर्माण होणारे कौटुंबिक वाद आणि त्यातून हिंसक घडणाऱ्या घटनांमुळे समाजासमोर गंभीर प्रश्न उभे राहत असल्याची भावना या घटनेनंतर व्यक्त होत आहे.

हे सुद्धा वाचा : पतीसोबत वाद झाला अन्…; 14 वर्षीय मुलीला घेऊन आईची रेल्वेसमोर उडी, दोघींचा दुर्दैवी मृत्यू

संभाजीनगरमधील धक्कादायक प्रकार

भक्त राहणाऱ्या पत्नीच्या खोलीवर मुलांना भेटण्यासाठी गेलेल्या पतीला पत्नी व तिच्या मित्राने मारहाण केली, त्यानंतर मित्राने चाकूने हल्ला करुन पतीला गंभीर जखमी केले आहे. ही घटना २४ जुलै रोजी रात्री १० वाजेच्या सुमारास बजाजनगर परिसरात घडली आहे. मारहाण करणाऱ्या पत्नीसह चाकू हल्ला करणाऱ्या चेतन पोळ याच्याविरोधात एमआयडीसी वाळूज पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात किरण भगवान बागूल (३२, रा. बजाजनगर) यांनी फिर्याद दिली आहे. फिर्यादी हे पेंटिंगचे काम करतात. त्यांची पत्नी काजल या पाच महिन्यांपासून त्याच परिसरात त्या मुलांसह स्वतंत्र खोली घेऊन राहत आहेत.

Web Title: A shocking incident has occurred in which a husband stabbed his wife to death

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 27, 2026 | 01:33 PM

Topics:  

  • Arrested News
  • crime news
  • Murder Case

संबंधित बातम्या

Pune Police News: वरिष्ठ निरीक्षकासह तिघे निलंबित, पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांचा दणका
1

Pune Police News: वरिष्ठ निरीक्षकासह तिघे निलंबित, पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांचा दणका

Ganja Farming Case: छत्रपती संभाजीनगरमध्ये गांजाची शेती; 52 लाखांचा मुद्देमाल जप्त, शेतकरी अटकेत
2

Ganja Farming Case: छत्रपती संभाजीनगरमध्ये गांजाची शेती; 52 लाखांचा मुद्देमाल जप्त, शेतकरी अटकेत

Sambhajinagar Crime: ‘शॉर्टकटने नेतो’ म्हणाला अन् निर्जन स्थळी नेले; ३० वर्षीय महिलेवर रिक्षाचालकाचा अत्याचार
3

Sambhajinagar Crime: ‘शॉर्टकटने नेतो’ म्हणाला अन् निर्जन स्थळी नेले; ३० वर्षीय महिलेवर रिक्षाचालकाचा अत्याचार

Maharashtra Today’s Live Breaking News in Marathi: मीनाक्षी शिंदे यांचा ठाणे जिल्हा महिला प्रमुखपदाचा राजीनामा
4

Maharashtra Today’s Live Breaking News in Marathi: मीनाक्षी शिंदे यांचा ठाणे जिल्हा महिला प्रमुखपदाचा राजीनामा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.