Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 26 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • Raksha Bandhan |
  • amravati |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

सातारा परिसरात गुंडांचा हैदोस, तरुणावर कोयत्याने प्राणघातक हल्ला; नेमकं काय घडलं?

छत्रपती संभाजीनगर शहरालगतच्या सातारा परिसरात गँगवारचा प्रकार घडला आहे. परिसरात कोयते, चाकू आणि पिस्तूल घेऊन फिरणाऱ्या तरुणांनी म्हाडा कॉलनी परिसरात एका तरुणावर प्राणघातक हल्ला केला आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Jun 21, 2026 | 11:03 AM
सातारा परिसरात गुंडांचा हैदोस, तरुणावर कोयत्याने प्राणघातक हल्ला; नेमकं काय घडलं?

सातारा परिसरात गुंडांचा हैदोस, तरुणावर कोयत्याने प्राणघातक हल्ला; नेमकं काय घडलं?

Follow Us
Follow Us:

छत्रपती संभाजीनगर : राज्यात गुन्हेगारी वाढली असून, वाढत्या गुन्हेगारीमुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. अशातच आता छत्रपती संभाजीनगर शहरालगतच्या सातारा परिसरात गँगवारचा प्रकार घडला आहे. परिसरात कोयते, चाकू आणि पिस्तूल घेऊन फिरणाऱ्या तरुणांनी म्हाडा कॉलनी परिसरात एका तरुणावर प्राणघातक हल्ला केला आहे. जुन्या वादातून झालेल्या या हल्ल्यात एका तरुणाच्या हाताला गंभीर दुखापत झाली आहे. या प्रकरणी संघपाल वाटोडे आणि हर्षवर्धन प्रमोद इंगोले यांना अटक करण्यात आली असून, न्यायालयाने त्यांना २४ जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. तर एका अल्पवयीन आरोपीची बालसुधारगृहात रवानगी करण्यात आली आहे.

 

या प्रकरणात सुमित प्रदीप घोडके (१९, रा. म्हाडा कॉलनी) हा शुक्रवारी दुपारी मित्र बालाजी जाधव व अक्षय राजगुरू यांच्यासह दुचाकीवरुन जात असताना सातारा पोलिस ठाण्याजवळील हायकोर्ट कॉलनी परिसरात आरोपींनी त्यांना अडविले. शिवजयंती उत्सवादरम्यान झालेल्या जुन्या वादातून आरोपी आणि त्यांच्या साथीदारांनी सुमित व त्याच्या मित्रांना शिवीगाळ करत धमकावण्यास सुरुवात केली. त्यांच्या हातातील शस्त्रे पाहून तिघांनी पळ काढला.

ठाण्यासमोरूनच सुरू झाला पाठलाग

आरोपींनी सातारा पोलिस ठाण्याच्या समोरूनच तरुणांचा पाठलाग सुरू केला. दुचाकीवरुन होळकर चौक आणि म्हाडा कॉलनीपर्यंत हा थरारक पाठलाग सुरू होता. यावेळी सुमितने चालत्या दुचाकीवरुन आपल्या भावाला फोन करून वाटोडे व त्याचे साथीदार शस्त्रांसह पाठलाग करत असल्याची माहिती दिली होती.

मोठ्या भावावर कोयत्याने वार

सुमित आणि त्याचे मित्र म्हाडा कॉलनीत पोहोचताच आरोपी तेथेही आले. यावेळी अल्पवयीन आरोपीने सुमितचा मोठा भाऊ प्रशांत घोडके याच्यावर कोयत्याने वार केला. प्रशांतने प्रसंगावधान राखत हात आडवा केल्याने त्याचा जीव वाचला. मात्र वार हातावर बसल्याने पंजाला गंभीर दुखापत झाली. जखमी प्रशांतवर उपचार करण्यात आले असून त्याची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात आले.

लोड करताना पिस्तूल खाली पडले

हल्ल्यानंतर मुख्य आरोपी संघपाल वाटोडे याने सुमितला मारण्यासाठी पिस्तूल काढले. मात्र गोंधळात त्याच्या हातातून पिस्तूल खाली पडले. ही संधी साधत सुमितच्या मित्रांनी आरोपीला पकडण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी त्याने कमरेतील चाकू बाहेर काढला. त्यानंतर सर्व आरोपी तेथून पसार झाले. जाताना संबंधितांना जीवे मारण्याच्या धमक्याही देण्यात आल्याचे फिर्यादीत नमूद आहे.

हे सुद्धा वाचा : माझ्या टोकाच्या पाऊलाला तेच जबाबदार…; वरिष्ठांच्या मानसिक त्रासाचा आरोप करत 57 वर्षीय अधिकाऱ्याची आत्महत्या

आरोपींची पोलिस कोठडीत रवानगी

घटनेनंतर सातारा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. तपासादरम्यान संघपाल वाटोडे आणि हर्षवर्धन प्रमोद इंगोले यांना अटक करण्यात आली. न्यायालयाने दोघांनाही २४ जूनपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणातील अल्पवयीन आरोपीला बालसुधारगृहात पाठविण्यात आले असून उर्वरित साथीदारांचा शोध सुरू आहे.

Web Title: A shocking incident involving an attack on a young man has occurred in the satara area

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 21, 2026 | 11:03 AM

Topics:  

  • Arrested News
  • CM Devedra Fadnavis
  • crime news

संबंधित बातम्या

Eye Health : शालेय विद्यार्थ्यांच्या डोळ्यांना मोफत चष्म्याचे कवच; फडणवीस-शिंदेंच्या उपस्थितीत त्रिपक्षीय करार
1

Eye Health : शालेय विद्यार्थ्यांच्या डोळ्यांना मोफत चष्म्याचे कवच; फडणवीस-शिंदेंच्या उपस्थितीत त्रिपक्षीय करार

Pune Crime: पैशांमुळे दुरावलेली मैत्री १० वर्षांनी पुन्हा जुळली; ४.८५ लाखांच्या वादावर अडीच लाखांत तडजोड
2

Pune Crime: पैशांमुळे दुरावलेली मैत्री १० वर्षांनी पुन्हा जुळली; ४.८५ लाखांच्या वादावर अडीच लाखांत तडजोड

COEP राडाप्रकरणी महत्त्वाची अपडेट; काँग्रेस-एनएसयूआय कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल, मीडियाविरोधातही तक्रार
3

COEP राडाप्रकरणी महत्त्वाची अपडेट; काँग्रेस-एनएसयूआय कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल, मीडियाविरोधातही तक्रार

जन्माला घातलं, पण सांभाळलं नाही! आई-वडिलांनीच केला ५४.५० लाखांत पोटच्या बाळाचा सौदा!
4

जन्माला घातलं, पण सांभाळलं नाही! आई-वडिलांनीच केला ५४.५० लाखांत पोटच्या बाळाचा सौदा!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.