Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 2 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

अमरावतीत रक्तरंजित हत्याकांड, दिवसाढवळ्या तरुणावर कोयत्याने वार; आधी पंजा तोडला अनं नंतर…

अमरावतीमधून एक थरकाप उडवणारी आणि कायदा-सुव्यवस्थेचे वाभाडे काढणारी घटना समोर आली आहे. शहरात एका २४ वर्षीय तरुणाची भररस्त्यात कोयत्याने सपासप वार करून अत्यंत निघृण हत्या करण्यात आली.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Jul 16, 2026 | 12:09 PM
अमरावतीत रक्तरंजित हत्याकांड, दिवसाढवळ्या तरुणावर कोयत्याने वार; आधी पंजा तोडला अनं नंतर...

अमरावतीत रक्तरंजित हत्याकांड, दिवसाढवळ्या तरुणावर कोयत्याने वार; आधी पंजा तोडला अनं नंतर...

Follow Us
Follow Us:

अमरावती : अमरावतीमधून एक थरकाप उडवणारी आणि कायदा-सुव्यवस्थेचे वाभाडे काढणारी घटना समोर आली आहे. शहरात एका २४ वर्षीय तरुणाची भररस्त्यात कोयत्याने सपासप वार करून अत्यंत निघृण हत्या करण्यात आली. प्रेमप्रकरणाच्या वादातून अत्यंत क्रूरतेने घडवून आणलेल्या या हत्याकांडात हल्लेखोरांनी तरुणाचा हाताचा पंजाही शरीरापासून वेगळा केला. या अंगावर काटा आणणाऱ्या भीषण घटनेचा संपूर्ण थरार परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला असून, या डिजिटल पुराव्यामुळे शहरात एकच खळबळ उडाली आहे. मृताची ओळख पटली असून, शेख अफाक शेख अकिल (२४) असे मृत तरुणाचे नाव आहे. पोलिस तपासात समोर आलेल्या प्राथमिक माहितीनुसार, मयत शेख अफाक आणि आरोपींमध्ये गेल्या काही दिवसांपासून एका तरुणीवरून म्हणजेच प्रेमप्रकरणातून तीव्र वाद धुमसत होता.

 

घटना कशी घडली ?

एका तरुणीवरून सुरू असणारा हा जुना वाद आपापसात सामोपचाराने मिटवण्यासाठी आणि समझोता करण्यासाठी दोन्ही बाजूच्या लोकांना अमरावतीच्या राजेंद्र नगर परिसरात एकत्र बोलवण्यात आले होते. मात्र, चर्चा सुरू असतानाच दोन्ही बाजूंचे नियंत्रण सुटले. शाब्दिक चकमकीचे रूपांतर पाहता पाहता रक्तरंजित वादात झाले.

आधी पंजा तोडला

चर्चेदरम्यान आरोपींनी अचानक स्वतःसोबत आणलेले धारदार कोयते उपसले आणि अफाकवर हल्ला चढवला. हल्लेखोरांनी अफाकवर इतक्या अमानुषपणे आणि ताकदीने वार केले की, पहिल्या काही वारांमध्येच त्याचा हाताचा पंजा मनगटापासून कापला जाऊन थेट जमिनीवर पडला.

अतिरक्तस्त्रावामुळे जागीच तडफडून मृत्यू

या प्राणघातक हल्ल्यानंतर रक्ताच्या थारोळ्यात पडलेला अफाक स्वतःचा जीव वाचवण्यासाठी रस्त्यावरून पुढे पळू लागला. मात्र, हल्लेखोरांच्या डोक्यात जणू रक्त संचारले होते. निर्दयी हल्लेखोरांनी भररस्त्यात त्याचा पाठलाग केला. त्याला गाठून पुन्हा कोयत्याने सपासप वार केले. गंभीर जखमांमुळे आणि अतिरक्तस्त्रावामुळे अफाकचा घटनास्थळीच तडफडून जागीच मृत्यू झाला.

आरोपींच्या शोधासाठी पोलिसांची पथके रवाना

भरदिवसा आणि भररस्त्यात घडलेल्या या क्रूर हत्याकांडामुळे संपूर्ण अमरावती शहरात भीतीचे आणि तणावाचे वातावरण पसरले आहे. नागरिकांमधून या घटनेबाबत तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे मुख्य संशयितांची ओळख पटवली असून, फरार आरोपींना बेड्या ठोकण्यासाठी पोलिसांची विशेष पथके रवाना करण्यात आली आहेत. एमआयडीसी पोलीस या प्रकरणाचा पुढील सखोल तपास करत आहेत.

हे सुद्धा वाचा : शिरूर हादरलं! पोटच्या मुलानेच केला आईचा खून; बेदम मारहाण करुन जागेवरच संपवलं

चार आरोपी निष्पन्न; तीन जण अल्पवयीन

थरारक घटनेची माहिती मिळताच अमरावती पोलिसांनी तातडीने तपासाची चक्रे फिरवली. अमरावती शहराचे पोलिस उपायुक्त यशवंत सोळंके यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेत माहिती दिली. राजेंद्र नगर भागात एका २४ वर्षीय तरुणाची धारदार शस्त्राने वार करून हत्या करण्यात आली आहे. प्राथमिक तपासात हा वाद प्रेमप्रकरणातून झाल्याचे समोर आले आहे. पोलिसांना घटनास्थळावरून सीसीटीव्ही फुटेज मिळाले असून, या डिजिटल पुराव्याच्या आधारे तपास केला असता हत्याकांडात एकूण ४ आरोपींचा सहभाग असल्याचे निष्पन्न झाले आहे. अत्यंत धक्कादायक बाब म्हणजे, यातील ३ आरोपी हे अल्पवयीन आहेत.

Web Title: A shocking incident involving the murder of a young man has occurred in amravati

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 16, 2026 | 12:09 PM

Topics:  

  • Amravati crime
  • crime news
  • Murder Case

संबंधित बातम्या

बाह्यवळण मार्गावर कारचालकाला लुटले; वाद घालण्याचा बहाणा करून दीड लाखांचा ऐवज लंपास
1

बाह्यवळण मार्गावर कारचालकाला लुटले; वाद घालण्याचा बहाणा करून दीड लाखांचा ऐवज लंपास

मतदार यादीत दुरुस्तीच्या बतावणीने ज्येष्ठाची फसवणूक; तब्बल लाखो रुपयांना घातला गंडा
2

मतदार यादीत दुरुस्तीच्या बतावणीने ज्येष्ठाची फसवणूक; तब्बल लाखो रुपयांना घातला गंडा

मावळमध्ये खळबळ! पोलीस भरती प्रशिक्षणासाठी आलेल्या तरुणीवर अत्याचार; घरी नेले अन्…
3

मावळमध्ये खळबळ! पोलीस भरती प्रशिक्षणासाठी आलेल्या तरुणीवर अत्याचार; घरी नेले अन्…

मुलाकडून आईला कड्याने मारहाण; ओठाला पडले ८ टाके; गोकुळनगर परिसरातील धक्कादायक प्रकार
4

मुलाकडून आईला कड्याने मारहाण; ओठाला पडले ८ टाके; गोकुळनगर परिसरातील धक्कादायक प्रकार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.