संग्रहित फोटो
आळेफाटा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दुर्गाकुमार हा मैत्रिणीला भेटून कांदळी येथील खोलीकडे पायी जात होता. पिंपळवंडी येथील एचपी पेट्रोल पंपासमोरील कुकडी नदीच्या पुलावर दुचाकीवरून आलेल्या दोघांनी त्याला अडवून विचारपूस केली. यावेळी झालेल्या वादातून त्याच्या कानशिलात मारण्यात आल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.
मारहाणीनंतर घाबरलेला दुर्गाकुमार रस्त्याच्या पलीकडे जाण्यासाठी पळत असताना पुलावरून खाली पडला. या घटनेत गंभीर दुखापत झाल्याने त्याचा मृत्यू झाला आहे. घटनेची माहिती मिळताच आळेफाटा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला. परिसरातील सीसीटीव्ही फुटेज, साक्षीदारांचे जबाब आणि गोपनीय माहितीच्या आधारे संशयितांचा शोध घेण्यात आला.
या प्रकरणी सोहम दत्तात्रेय कुऱ्हाडे (वय २१, रा. लवणवाडी, आळे) आणि एका १६ वर्षीय विधिसंघर्षग्रस्त बालकाविरुद्ध गुन्हा दाखल करून कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे. किरकोळ वादातून घडलेल्या या घटनेत तरुणाचा मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. या प्रकरणाचा पुढील तपास आळेफाटा पोलीस ठाण्याचे निरीक्षक विश्वास जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली ऋषिकेश तिटमे करीत आहेत.
१८ वर्षीय तरुणावर चाकूने सपासप वार
पार्टी देण्यासाठी पैसे नसल्याचे सांगितल्याचा राग मनात धरून मित्रानेच १८ वर्षीय तरुणाच्या छातीत चाकू खुपसल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. त्यानंतर उपचारासाठी घाटीत नेण्याचा बहाणा करून त्याला हमालवाड्यातील मोकळ्या मैदानात नेले. तेथे त्याच्या डोळ्यात चाकू खुपसत पाठ व शरीरावर वार करुन गंभीर जखमी केले आहे. रक्तबंबाळ अवस्थेत तरुणाने दुचाकीस्वाराकडून लिफ्ट घेवून घाटी रुग्णालय गाठले. ही घटना १० ऑक्टोबर रोजी सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास घडली आहे. याप्रकरणी अल्पवयीन यश हिवराळे आणि त्याच्या तीन साथीदारांविरुद्ध हर्सल पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रकरणात सय्यद इम्रान सय्यद गफूर (३७, रा. जहांगीर कॉलनी, हसुल) यांनी फिर्याद दिली आहे.






