Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 1 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

संतापजनक! केजमध्ये 13 वर्षीय चिमुरडीवर अत्याचार; तोंड, हात रुमालाने बांधले अन्…

उन्हाळ्याच्या सुट्टीत आनंदाने मामाच्या गावी आलेल्या एका १३ वर्षीय चिमुरडीवर तिच्याच सख्ख्या चुलत मामेभावाने अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: May 30, 2026 | 01:25 PM
संतापजनक! केजमध्ये 13 वर्षीय चिमुरडीवर अत्याचार; तोंड, हात रुमालाने बांधले अन्...

संतापजनक! केजमध्ये 13 वर्षीय चिमुरडीवर अत्याचार; तोंड, हात रुमालाने बांधले अन्...

Follow Us
Follow Us:

केज : नात्याला काळीमा फासणारी आणि संपूर्ण बीड जिल्ह्याला सुन्न करून टाकणारी एक अत्यंत संतापजनक आणि संशयास्पद घटना समोर आली आहे. उन्हाळ्याच्या सुट्टीत आनंदाने मामाच्या गावी आलेल्या एका १३ वर्षीय चिमुरडीवर तिच्याच सख्ख्या चुलत मामेभावाने अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. नराधम भावाने या चिमुरडीचे हात आणि तोंड रुमालाने बांधून तिच्यावर घरातच बळजबरीने अत्याचार केला. या संतापजनक प्रकारानंतर केज पोलिसांनी तात्काळ पावले उचलत नराधम आरोपीला जेरबंद केले असून, न्यायालयाने त्याला तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

 

पोलीसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, पीडित अल्पवयीन मुलगी उन्हाळ्याच्या सुट्ट्या घालवण्यासाठी केज तालुक्यातील एका खेडेगावात आपल्या मामाच्या घरी आली होती. घटनेच्या दिवशी ती घरात एकटीच झोपलेली असताना, तिचा चुलत मामेभाऊ तिथे आला. त्याने आजी कुठे आहे? अशी विचारणा केली. निष्पाप मुलीने आजी शेतात सरपण (लाकडे) आणण्यासाठी गेली आहे, असे सांगताच आरोपीच्या मनातील वासना सुटली. त्याने तात्काळ मुलीवर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला. मुलीने प्रसंगावधान राखून विरोध केला आणि आरडाओरडा करण्याचा प्रयत्न केला. मात्र, नराधमाने तिचे तोंड एका हातरुमालाने घट्ट बांधले आणि घराची कडी आतून लावून घेतली. पीडिता जेव्हा कशीबशी सुटून दरवाजाची कडी उघडण्यासाठी धावली, तेव्हा आरोपीने तिला जमिनीवर पाडले आणि तिचे दोन्ही हात दोरीने बांधून तिच्यावर बळजबरीने अत्याचार केला.

पीडितेच्या धैर्यामुळे अत्याचार प्रकरण उघड

या भीषण प्रसंगानंतर पीडित मुलीने अत्यंत धैर्याने आपल्या कुटुंबाला घडलेला सर्व प्रकार सांगितला. कुटुंबाने तात्काळ केज पोलिस ठाणे गाठून फिर्याद दिली. पीडितेच्या तक्रारीवरून केज पोलिसांनी नराधम मामेभावाविरुद्ध बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायदा (POCSO) आणि इतर गंभीर कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे.

हे सुद्धा वाचा : शिवसेना शिंदे गटाच्या नेत्यावर जिवघेणा हल्ला, कोयत्याने सपासप वार; नेमकं काय घडलं?

‘पोक्सो’ अंतर्गत गुन्हा !

गुन्हा दाखल होताच पोलिसांनी तातडीने शोधमोहीम राबवून नराधम आरोपीला मुसक्या आवळून जेरबंद केले. बुधवारी (२७मे) सायंकाळी त्याला केज न्यायालयासमोर हजर करण्यात आले असता, न्यायालयाने आरोपीची गुन्हेगारी पार्श्वभूमी आणि तपासाचे गांभीर्य लक्षात घेऊन त्याला ३ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. केजचे पोलीस निरीक्षक स्वप्नील उनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक उमेश निकम या संपूर्ण प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

Web Title: A shocking incident of abusing a child has taken place in beed district

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 30, 2026 | 01:25 PM

Topics:  

  • Arrested News
  • CM Devedra Fadnavis
  • crime news

संबंधित बातम्या

धक्कादायक ! बहिणीशी बोलत नसल्याने पतीने केली पत्नीची हत्या; आरडाओरड करणाऱ्या स्वत:च्या मुलाला…
1

धक्कादायक ! बहिणीशी बोलत नसल्याने पतीने केली पत्नीची हत्या; आरडाओरड करणाऱ्या स्वत:च्या मुलाला…

Pune Crime : तंबाखू न दिल्याचा राग अनावर; तरुणाला लाथाबुक्क्यांनी अन् लोखंडी रॉडने मारहाण
2

Pune Crime : तंबाखू न दिल्याचा राग अनावर; तरुणाला लाथाबुक्क्यांनी अन् लोखंडी रॉडने मारहाण

कौटुंबिक वादातून पत्नीचा गळा आवळून खून, मुलावरही चाकूने वार; खेड शहरातील घटनेनं खळबळ
3

कौटुंबिक वादातून पत्नीचा गळा आवळून खून, मुलावरही चाकूने वार; खेड शहरातील घटनेनं खळबळ

वराळेत जुन्या भांडणाच्या रागातून तरुणावर हल्ला, कोयत्याने सपासप वार करुन संपवलं; आठ जणांवर गुन्हा दाखल
4

वराळेत जुन्या भांडणाच्या रागातून तरुणावर हल्ला, कोयत्याने सपासप वार करुन संपवलं; आठ जणांवर गुन्हा दाखल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.