Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 1 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

शिवसेना शिंदे गटाच्या नेत्यावर जिवघेणा हल्ला, कोयत्याने सपासप वार; नेमकं काय घडलं?

परळी वैद्यनाथ येथील मोंढा मार्केट परिसरातील 'रिद्धी-सिद्धी' हॉटेलमध्ये किरकोळ कारणावरून शिवसेना शिंदे गटाचे ज्येष्ठ नेते शिवाजी शिंदे यांच्यावर कोयत्याने (कत्तीने) जीवघेणा हल्ला झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: May 30, 2026 | 12:54 PM
शिवसेना शिंदे गटाच्या नेत्यावर जिवघेणा हल्ला, कोयत्याने सपासप वार; नेमकं काय घडलं?

शिवसेना शिंदे गटाच्या नेत्यावर जिवघेणा हल्ला, कोयत्याने सपासप वार; नेमकं काय घडलं?

Follow Us
Follow Us:

परळी वैद्यनाथ : राज्यासह देशभरात गुन्हेगारी वाढली असून, परळीतून एक मोठी बातमी समोर आली आहे. परळी वैद्यनाथ येथील मोंढा मार्केट परिसरातील ‘रिद्धी-सिद्धी’ हॉटेलमध्ये किरकोळ कारणावरून शिवसेना शिंदे गटाचे ज्येष्ठ नेते शिवाजी शिंदे यांच्यावर कोयत्याने (कत्तीने) जीवघेणा हल्ला झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या हल्ल्यात शिवाजी शिंदे गंभीर जखमी झाले असून, याप्रकरणी संभाजीनगर पोलीस ठाण्यात एका महिलेसह दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी शिवाजी शंकरराव शिंदे (वय ५०, रा. वडगाव दादाहरी, ता. परळी) यांचे मोंढा मार्केट येथे ‘रिद्धी-सिद्धी’ हॉटेल आहे. त्यांच्या मुलाचे आरोपी गजानन सुरवसे याच्यासोबत पूर्वी भांडण झाले होते. त्याचाच राग मनात धरून आरोपींनी हा हल्ला केल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. दिनांक २६ मे २०२६ रोजी दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास आरोपी गजानन सुरवसे आणि त्याची आई हॉटेलवर आले. यावेळी गजानन सुरवसे याने सोबत आणलेल्या तीक्ष्ण कोयत्याने शिवाजी शिंदे यांच्यावर सपासप वार केले. या हल्ल्यात शिंदे यांच्या उजव्या हाताच्या बोटाला, डाव्या पायाच्या मांडीला तसेच डाव्या हाताच्या दंडाला गंभीर दुखापत झाली आहे.

दरम्यान, गजानन सुरवसे यांच्या आईने शिंदे यांच्या पत्नीचे केस पकडून त्यांना खाली पाडले व लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. तसेच शिवीगाळ करून परिसरात दहशत निर्माण केल्याचेही फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. घटनेनंतर गंभीर जखमी झालेल्या शिवाजी शिंदे यांना तातडीने उपचारासाठी अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले. तेथे उपचार सुरू असताना त्यांनी पोलिसांना जबाब दिल्यानंतर गुन्हा नोंदविण्यात आला. या प्रकरणी संभाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक १३३/२०२६ नुसार भारतीय न्याय संहिता (बीएनएस) कलम ११८ (२), ११५(२), ३५२ आणि ३(५) अंतर्गत आरोपी गजानन सुरवसे व त्याच्या आईविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक चव्हाण करीत आहेत.

हे सुद्धा वाचा : सातबारावर नाव चढवण्यासाठी 20 हजारांची लाच; ग्राम महसूल अधिकारी एसीबीच्या जाळ्यात

आरोपींविरुद्ध गंभीर कलमांखाली गुन्हा दाखल

शिवाजी शिंदे यांच्या फिर्यादीवरून आरोपी गजानन सुरवसे आणि त्याच्या आईविरुद्ध भारतीय न्याय संहितेतील गंभीर कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.

हल्ल्यामुळे परिसरात माजली खळबळ

मोंढा मार्केटसारख्या गजबजलेल्या भागात भरदिवसा झालेल्या या जीवघेण्या हल्ल्यामुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. घटनेनंतर नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.

Web Title: A shocking incident of attack on the leader of the shiv sena shinde faction has taken place in parli

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 30, 2026 | 12:54 PM

Topics:  

  • crime news
  • Eknath Shinde
  • parali

संबंधित बातम्या

धक्कादायक ! बहिणीशी बोलत नसल्याने पतीने केली पत्नीची हत्या; आरडाओरड करणाऱ्या स्वत:च्या मुलाला…
1

धक्कादायक ! बहिणीशी बोलत नसल्याने पतीने केली पत्नीची हत्या; आरडाओरड करणाऱ्या स्वत:च्या मुलाला…

Pune Crime : तंबाखू न दिल्याचा राग अनावर; तरुणाला लाथाबुक्क्यांनी अन् लोखंडी रॉडने मारहाण
2

Pune Crime : तंबाखू न दिल्याचा राग अनावर; तरुणाला लाथाबुक्क्यांनी अन् लोखंडी रॉडने मारहाण

कौटुंबिक वादातून पत्नीचा गळा आवळून खून, मुलावरही चाकूने वार; खेड शहरातील घटनेनं खळबळ
3

कौटुंबिक वादातून पत्नीचा गळा आवळून खून, मुलावरही चाकूने वार; खेड शहरातील घटनेनं खळबळ

Nepal Flood News: नेपाळमध्ये अडकलेल्या महाराष्ट्रातील ४८ पर्यटकांना सुखरूप मायदेशी आणले; संजय निरुपम यांची माहिती
4

Nepal Flood News: नेपाळमध्ये अडकलेल्या महाराष्ट्रातील ४८ पर्यटकांना सुखरूप मायदेशी आणले; संजय निरुपम यांची माहिती

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.