शासकीय कामासाठी नागरिकांकडून लाच उकळणाऱ्या महसूल विभागातील एका अधिकाऱ्याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या ठाणे पथकाने शुक्रवारी रंगेहात पकडत मोठी कारवाई केली. ईश्वर बद्रीनाथ जाधव (वय ५६), ग्राम महसूल अधिकारी, द्वारली-ढोकळी, असे अटक करण्यात आलेल्या अधिकाऱ्याचे नाव आहे.
Pune Crime : पुण्यात महिला पोलिस अधिकाऱ्याच्या खुनाचा प्रयत्न; पतीने डोळ्यात राख फेकली अन्…
तक्रारदाराच्या वडिलांचे निधन झाल्यानंतर त्यांच्या सावत्र बहिणीचे नाव वारस म्हणून सातबारावर नोंदवून फेरफार काढण्यासाठी जाधव यांनी स्वतःसाठी १० हजार रुपये आणि मंडल अधिकाऱ्यासाठी १० हजार रुपये अशी एकूण २० हजार रुपयांची लाच मागितल्याचा आरोप आहे. याबाबत तक्रारदाराने २९ मे रोजी एसीबी ठाणे कार्यालयात तक्रार दाखल केली होती.
तक्रारीची पडताळणी केल्यानंतर लाचेची मागणी झाल्याचे स्पष्ट झाल्याने एसीबीने तत्काळ सापळा रचला. त्यानुसार शुक्रवारी दुपारी द्वारली येथील तलाठी कार्यालयात जाधव यांनी तक्रारदाराकडून २० हजार रुपयांची रक्कम स्वीकारताच एसीबीच्या पथकाने त्यांना दुपारी रंगेहात पकडले. आरोपीकडून लाचेची संपूर्ण रक्कम जप्त करण्यात आली असून त्यांचा मोबाईल फोनही तपासासाठी ताब्यात घेण्यात आला आहे.
या प्रकरणी उल्हासनगरच्या हिललाईन पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरू असून आरोपीच्या निवासस्थानी झडतीची कारवाईही सुरू आहे. पोलिस उपअधीक्षक अनिल जयकर यांच्या मार्गदर्शनाखाली विनोद जाधव, सुनील केदार, रेखा शिंदे या पथकाने ही यशस्वी कारवाई करण्यात आली.
10 हजारांच्या खंडणीसाठी दोन सख्या भावांचा बळी; कुटुंबाचा पोलिसांवर गंभीर आरोप
उल्हासनगरात गोळीबारात दोन सख्या भावाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. या गोळीबारातील आरोपीनी त्यांना आधी धमकी दिली होती. मात्र आता या प्रकरणात धक्कादायक खुलासा बाहेर येत आहे. मृत घरातील सदस्यांनी आता आरोप केला आहे, तो म्हणजे पोलिसांनी तक्रार दिल्यावर दुर्लक्ष केल होत. आधी खंडणी मागण्यात आली नंतर धमकी देण्यात आली. तरी पण आमच्या तक्रारी कडे दुर्लक्ष करण्यात आल. त्यामुळे या घटनेत उल्हासनगर पोलिसांवर एक प्रश्नचिन्ह निर्माण झाल आहे.
नसरापूर प्रकरणात मोठी अपडेट; सहा साक्षीदारांनी नोंदवली साक्ष, आता…
Ans: ईश्वर बद्रीनाथ जाधव (वय 56), ग्राम महसूल अधिकारी, द्वारली-ढोकळी.
Ans: स्वतःसाठी 10 हजार आणि मंडल अधिकाऱ्यासाठी 10 हजार, अशी एकूण 20 हजार रुपये.
Ans: लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी) ठाणे पथकाने सापळा रचून कारवाई केली.






