Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 17 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Pune Crime : पुण्यात महिला पोलिस अधिकाऱ्याच्या खुनाचा प्रयत्न; पतीने डोळ्यात राख फेकली अन्…

कौटुंबिक वादातून महिला पोलिस अधिकाऱ्याचा ओढणीने गळा आवळून खुनाचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणी पोलिसांनी पतीला अटक केली आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: May 30, 2026 | 11:42 AM
पुण्यात महिला पोलिस अधिकाऱ्याच्या खुनाचा प्रयत्न; पतीने डोळ्यात राख फेकली अन्...

पुण्यात महिला पोलिस अधिकाऱ्याच्या खुनाचा प्रयत्न; पतीने डोळ्यात राख फेकली अन्...

Follow Us
Follow Us:

पुणे : राज्यासह देशभरात गुन्हेगारीच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली असून, पुण्यातून आणखी एक मोठी बातमी समोर आली आहे. कौटुंबिक वादातून महिला पोलिस अधिकाऱ्याचा ओढणीने गळा आवळून खुनाचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणी पोलिसांनी पतीला अटक केली असून, खडकी बाजार पोलिस वसाहतीत ही धक्कादायक घटना घडली आहे. याप्रकरणी योगेश माधव बेरी (वय ३८, रा. तळेगाव दाभाडे) याला अटक करण्यात आली आहे. याबाबत सहायक पोलिस निरीक्षक महिलेने खडकी पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे.

 

पोलिसांच्या माहितीनुसार, तक्रारदार सहायक पोलिस निरीक्षक महिला पुणे पोलिसांच्या विशेष शाखेत (स्पेशल ब्रॅँच) नियुक्तीस आहेत. आरोपी बेरी हा खासगी कंपनीत नोकरी करत आहे. विवाहानंतर त्यांना दोन मुले झाली. गेल्या काही महिन्यांपासून आराेपी पती महिला अधिकाऱ्याच्या चारित्र्यावर संशय घेऊन छळ करत होता. त्याच्या छळामुळे महिला अधिकाऱ्याने घटस्फोटाचा दावा शिवाजीनगर येथील कौटुंबिक न्यायालयात दाखल केला होता.

महिला अधिकारी खडकी बाजार पोलिस वसाहतीतील अधिकारी निवासस्थानात राहायला आहेत. गेल्या काही दिवसांपासून आरोपी पती वेगळा राहत होता. त्याच्याकडे वसाहतीतील घराची चावी होती. एक चावी महिला अधिकाऱ्याकडे होती. २७ मे रोजी रात्री साडेनऊच्या सुमारास महिला पोलीस अधिकारी घरी परतल्या. आरोपी पती घरात लपून बसला होता. तेव्हा आरोपीने महिला अधिकाऱ्याच्या डोळ्यात राख फेकली. ओढणीने त्यांचा गळा आवळला. महिला पोलीस अधिकाऱ्याने आरडाओरडा केला. तेव्हा वसाहतीतील रहिवाशांनी तेथे धाव घेतली. रहिवाशांनी मध्यस्थी करुन पतीला पकडले. त्यानंतर पोलिस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली. खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी आरोपी पतीला अटक करण्यात आली असून, पोलीस उपनिरीक्षक रेणुका गालफाडे तपास करत आहेत.

हे सुद्धा वाचा : हुंड्याची मागणी, फोनवर अश्लील भाषा… लग्नाआधीच होणाऱ्या नवऱ्याला कंटाळली अन् तरुणीने ॲसिड पिऊन आयुष्य संपवलं

शिवसेनेच्या नेत्यावर चाकूने हल्ला

शिवसेनेच्या (शिंदे गट) उपजिल्हाप्रमुखावर सराईत गुन्हेगाराने जीवघेणा चाकूहल्ला केल्याने छत्रपती संभाजीनगर शहरात खळबळ उडाली आहे. आण्णा, मी मजाक करत होतो… असे म्हणत गळाभेट घेतल्यानंतर आरोपीने अचानक कमरेतील चाकू काढून गळ्यावर सपासप वार केले. गंभीर जखमी अवस्थेत रक्ताच्या थारोळ्यात कोसळलेल्या पदाधिकाऱ्याला त्यांच्या पुतण्याने प्रसंगावधान राखत तातडीने रुग्णालयात दाखल केल्याने मोठा अनर्थ टळला. राम शेषराव बोडखे असे चाकूहल्ला करणाऱ्या सराईताचे नाव आहे. त्याच्याविरोधात क्रांतीचौक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेत तो देखील जखमी असून, त्याच्यावर उपचार सुरु असल्याची माहिती क्रांतीचौक पोलिस ठाण्याचे निरीक्षक सुनिल माने यांनी दिली.

Web Title: A shocking incident of attempted murder of a female police officer has taken place in pune

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 30, 2026 | 11:41 AM

Topics:  

  • crime news
  • Pune Crime
  • Pune Police Action

संबंधित बातम्या

भंगार चोरण्यासाठी निघाले अन् बंगल्यातील सोन्यावर मारला डल्ला! तळवडेतील चोरीप्रकरणी तिघांना अटक
1

भंगार चोरण्यासाठी निघाले अन् बंगल्यातील सोन्यावर मारला डल्ला! तळवडेतील चोरीप्रकरणी तिघांना अटक

हिंजवडीत एमडी ड्रग्जचा मोठा साठा जप्त; राजस्थानच्या तरुणासह दोघांना ठोकल्या बेड्या
2

हिंजवडीत एमडी ड्रग्जचा मोठा साठा जप्त; राजस्थानच्या तरुणासह दोघांना ठोकल्या बेड्या

किरकोळ वादातून रक्तरंजित थरार! २१ वर्षीय तरुणाचा खून; वाघोलीतील घटनेनं खळबळ
3

किरकोळ वादातून रक्तरंजित थरार! २१ वर्षीय तरुणाचा खून; वाघोलीतील घटनेनं खळबळ

अर्धापूरमधील शेतशिवारात रक्तरंजित थरार! २५ वर्षीय शेतकऱ्याची धारदार शस्त्राने हत्या
4

अर्धापूरमधील शेतशिवारात रक्तरंजित थरार! २५ वर्षीय शेतकऱ्याची धारदार शस्त्राने हत्या

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.