Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 4 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

फोटो व्हायरल करण्याची धमकी देत 12 वर्षीय मुलीवर अत्याचार; तळेगाव दाभाडेतील संतापजनक प्रकार

एका १२ वर्षीय मुलीचे नग्नावस्थेतील फोटो व्हायरल करून तिचा विनयभंग केला आहे. तसेच धमकावत तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार तळेगाव दाभाडे येथे घडला आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Jun 07, 2026 | 01:43 PM
फोटो व्हायरल करण्याची धमकी देत 12 वर्षीय मुलीवर अत्याचार; तळेगाव दाभाडेतील संतापजनक प्रकार

फोटो व्हायरल करण्याची धमकी देत 12 वर्षीय मुलीवर अत्याचार; तळेगाव दाभाडेतील संतापजनक प्रकार

Follow Us
Follow Us:

पिंपरी : राज्यासह देशभरात अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचे प्रमाण वाढले आहे. वाढत्या घटनांमुळे मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. अशातच आता एक संतापजक घटना घडली आहे. एका १२ वर्षीय मुलीचे नग्नावस्थेतील फोटो व्हायरल करून तिचा विनयभंग केला. तसेच धमकावत तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार तळेगाव दाभाडे येथे घडला आहे.

 

विपुल विश्वकर्मा (वय १९, रा. वराळे, ता. मावळ, जि. पुणे), कोझी कॅफेचे चालक यांच्यासह एका १७ वर्षीय मुलाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पीडित १२ वर्षीय मुलीच्या आईने याप्रकरणी ३ जून २०२६ रोजी तळेगाव दाभाडे पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संशयित १७ वर्षीय मुलाने पीडित १२ वर्षीय मुलीसाेबत मैत्री केली. त्यानंतर जानेवारी ते फेब्रुवारी २०२६ दरम्यान अल्पवयीन मुलाने विविध प्रकारे धमकावले. तुझी बदनामी करेल, तुला तोंड दाखवायला जागा ठेवणार नाही, अशी धमकी देऊन पीडितेकडून काही खासगी माहिती आणि फोटो सोशल मीडियावरून मिळवले. त्यानंतर हे फोटो समाजमाध्यमांवर प्रसारित करून पीडितेचा विनयभंग केला.

हे सुद्धा वाचा : नगरसेवक किशोर मासाळ राजीनामा द्या, अन्यथा…; बारामती राष्ट्रवादीच्या अध्यक्षांचा इशारा

दरम्यान, पीडित मुलीने अल्पवयीन मुलाला फोटो पाठवले होते. ते फोटो सर्वांना पाठवण्याची धमकी आरोपींनी दिली. त्याआधारे तिला धमकावत तिच्यावर १० आणि १४ मे रोजी जबरदस्ती करून लैंगिक अत्याचार केले. कॅफे चालकाने त्याच्या कॅफेमध्ये अशा प्रकारांसाठी जागा उपलब्ध करून दिल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे. त्यामुळे याप्रकरणी कॅफेचालक आणि इतर दोघांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे, असे तळेगाव दाभाडे पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक कन्हैया थोरात यांनी सांगितले.

हे सुद्धा वाचा : पिंपरी-चिंचवड पोलीस अ‍ॅक्शन मोडवर; तब्बल 45 गुन्हेगारांवर ‘मकोका’ अंतर्गत कारवाई

Web Title: A shocking incident of molestation of a minor girl has taken place in talegaon dabhade

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 07, 2026 | 01:43 PM

Topics:  

  • Arrested News
  • CM Devedra Fadnavis
  • crime news

संबंधित बातम्या

अमली पदार्थांच्या पैशातून उभारलेली 55 लाखांची मालमत्ता गोठवली; पुणे जिल्ह्यात 2026 मधील पहिलीच कारवाई
1

अमली पदार्थांच्या पैशातून उभारलेली 55 लाखांची मालमत्ता गोठवली; पुणे जिल्ह्यात 2026 मधील पहिलीच कारवाई

नसरापूरनंतर मावळ हादरलं! टाकवे बुद्रुकमध्ये अडीच वर्षांच्या चिमुकलीवर अत्याचार; 51 वर्षीय आरोपीला अटक
2

नसरापूरनंतर मावळ हादरलं! टाकवे बुद्रुकमध्ये अडीच वर्षांच्या चिमुकलीवर अत्याचार; 51 वर्षीय आरोपीला अटक

पीडितेला जबरदस्ती गाडीत बसवण्याचा प्रयत्न; आरडाओरडा करताच लोकांनी घेतली धाव, रस्त्यातच आरोपीची केली धुलाई; Video Viral
3

पीडितेला जबरदस्ती गाडीत बसवण्याचा प्रयत्न; आरडाओरडा करताच लोकांनी घेतली धाव, रस्त्यातच आरोपीची केली धुलाई; Video Viral

कौटुंबिक वादातून पत्नीची हत्या; गळ्यावर व पोटावर बेदम मारहाण, मणक्याचे हाड तुटले…
4

कौटुंबिक वादातून पत्नीची हत्या; गळ्यावर व पोटावर बेदम मारहाण, मणक्याचे हाड तुटले…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.