Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Holi
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

पुण्यात रक्तरंजित थरार! अल्पवयीन मुलावर चाकूने सपासप वार; नेमकं काय घडलं?

चंदननगर भागातील राजमाता जिजाऊ ऑक्सिजन पार्क परिसरात शनिवारी सायंकाळी धक्कादायक एक घटना घडली आहे. पूर्ववैमनस्यातून एका अल्पवयीन मुलावर चाकूने वार करून त्याचा खून केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Dec 08, 2025 | 12:59 PM
पत्नीबाबत आक्षेपार्ह विधान केल्याने पतीने केली मित्राची हत्या

पत्नीबाबत आक्षेपार्ह विधान केल्याने पतीने केली मित्राची हत्या

Follow Us
Close
Follow Us:
  • पुण्यात रक्तरंजित थरार
  • अल्पवयीन मुलावर चाकूने सपासप वार
  • नेमकं काय घडलं?
पुणे : राज्यासह देशभरात गुन्हेगारी प्रचंड वाढली आहे. खून, हाणामाऱ्या, लुटमार, दरोडे यासारख्या घटनांमुळे नागरिक त्रस्त होत आहेत. वाढत्या गुन्हेगारीला पोलिसांनी आळा घालण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहेत. अशातच आता पुण्यातून एक मोठी घटना समोर आली आहे. चंदननगर भागातील राजमाता जिजाऊ ऑक्सिजन पार्क परिसरात शनिवारी सायंकाळी धक्कादायक एक घटना घडली आहे. पूर्ववैमनस्यातून एका अल्पवयीन मुलावर चाकूने वार करून त्याचा खून केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

 

दरम्यान याचवेळी हल्लेखोरांनी त्याच्यासोबत असलेल्या मित्रावर देखील वार केले. यात मित्र गंभीर जखमी झाला असून, त्याचा उपचार सुरू आहेत. घटनेनंतर चंदननगर परिसरात तणावाचे वातावरण पसरले आहे. खून झालेल्या अल्पवयीनाचे नाव लखन बाळू सकट (वय – १८, रा. डॉ. बाबासाहेब आंबेडकर वसाहत, चंदननगर) असून, टोळक्याने केलेल्या हल्ल्यात त्याचा मित्रही गंभीर जखमी झाला आहे. पसार झालेल्या हल्लेखोरांचा शोध सुरू असल्याची माहिती चंदननगर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सीमा ढाकणे यांनी दिली.

पोलिसांच्या माहितीनुसार, सकट आणि त्याचा मित्र शनिवारी सायंकाळी सातच्या सुमारास पार्कमध्ये थांबले होते. त्यावेळी हल्लेखोर आले, त्यांनी दोघांना शिवीगाळ केली व मारहाण केली. त्यानंतर सकटवर चाकूने वार करण्यात आले. घटनेची तातडीने माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक सीमा ढाकणे यांच्यासह पथक घटनास्थळी पोहोचले. गंभीर जखमी झालेल्या सकट आणि त्याच्या मित्राला खासगी रुग्णालयात दाखल केले. उपचारादरम्यान सकटचा मृत्यू झाला. पोलिसांनी प्राथमिक तपासात वैमनस्यातून खून झाल्याचा संशय व्यक्त केला असून, हल्लेखोरांचा शोध सुरू आहे.

हे सुद्धा वाचा : पोलिसांचा खबरी असल्याचा आरोप करत तरुणावर हल्ला, शस्त्राने सपासप वार; नेमकं काय घडलं?

उत्तमनगरमध्ये सराफी दुकान लुटण्याचा प्रयत्न

पुण्यातील उत्तमनगरमधील एनडीए रस्त्यावर शस्त्रधारी टोळक्याने ऐन वर्दळीच्या वेळी सराफी दुकानात घुसून लुटमार करण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. सतत रहदारी असलेल्या रस्त्यावर रात्री आठच्या सुमारास ही घटना घडल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. दुकान मालकाने शस्त्रधाऱ्यांना विरोध करत आरडाओरडा केल्याने तिघे पसार झाले. याप्रकरणी उत्तमनगर पोलिस ठाण्यात २८ वर्षीय तरुण व्यावसायिकाने तक्रार दिली आहे. त्यानूसार, तीन अनोळखी चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शनिवारी रात्री आठच्या सुमारास ही घटना घडली आहे.

Web Title: A shocking incident of murder of a minor boy has taken place in pune

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 08, 2025 | 12:58 PM

Topics:  

  • crime news
  • Murder Case
  • Pune Crime
  • Pune Police Action

संबंधित बातम्या

15 लाखांची रोकड घेऊन निघालेल्या तरुणाचा पाठलाग, नागरिक जमा झाले अन्…; पुण्यातील थरारक घटना
1

15 लाखांची रोकड घेऊन निघालेल्या तरुणाचा पाठलाग, नागरिक जमा झाले अन्…; पुण्यातील थरारक घटना

ट्रकचे चाक अंगावरुन गेल्याने 3 वर्षीय चिमुकल्याचा जागीच मृत्यू, वडील जखमी; नवले पुलाजवळील घटना
2

ट्रकचे चाक अंगावरुन गेल्याने 3 वर्षीय चिमुकल्याचा जागीच मृत्यू, वडील जखमी; नवले पुलाजवळील घटना

Crime News: जंगलातील विहिरीत आढळला कुजलेला मृतदेह
3

Crime News: जंगलातील विहिरीत आढळला कुजलेला मृतदेह

लोणी काळभोरमध्ये गुटख्याचा काळाबाजार उघड; पोलिसांनी दोघांना ठोकल्या बेड्या
4

लोणी काळभोरमध्ये गुटख्याचा काळाबाजार उघड; पोलिसांनी दोघांना ठोकल्या बेड्या

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.