संग्रहित फोटो
पोलिसांच्या माहितीनुसार, तक्रारदार तरुण ट्रकचालक आहे. तो कात्रजमधील खोपडेनगर भागात राहायला आहे. ३० नोव्हेंबर रोजी तो किराणा माल दुकानातून साहित्य घेऊन घरी निघाला होता. सायंकाळी पावणेसातच्या सुमारास तिघांनी त्याला अडवले. ‘आमची माहिती पोलिसांना का दिली?’, अशी विचारणा करुन आरोपींनी त्याला शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. आरोपींनी त्याच्यावर शस्त्राने वार केले. तरुणाने घरासमोर ट्रक लावला होता. आरोपींनी घरासमोर लावलेल्या ट्रकची काच फोडून दहशत माजविली. सहायक फौजदार भोसले तपास करत आहेत.
याप्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आरोपींनी खोपडेनगर भागात दहशत माजवून एका दाम्पत्याला मारहाण केल्याची घटना ३० नोव्हेंबर रोजी घडली होती. आरोपींकडून दाम्पत्याला मारहाण सुरू असताना मध्यस्थी करण्यासाठी त्यांची मुलगी आली. तेव्हा आरोपींनी मुलीला मारहाण केल्याची घटना घडली. याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात आरोपींविरुद्ध आणखी एक गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहायक पोलीस निरीक्षक शेंडे तपास करत आहेत.
उत्तमनगरमध्ये सराफी दुकान लुटण्याचा प्रयत्न
पुण्यातील उत्तमनगरमधील एनडीए रस्त्यावर शस्त्रधारी टोळक्याने ऐन वर्दळीच्या वेळी सराफी दुकानात घुसून लुटमार करण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. सतत रहदारी असलेल्या रस्त्यावर रात्री आठच्या सुमारास ही घटना घडल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. दुकान मालकाने शस्त्रधाऱ्यांना विरोध करत आरडाओरडा केल्याने तिघे पसार झाले. याप्रकरणी उत्तमनगर पोलिस ठाण्यात २८ वर्षीय तरुण व्यावसायिकाने तक्रार दिली आहे. त्यानूसार, तीन अनोळखी चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शनिवारी रात्री आठच्या सुमारास ही घटना घडली आहे.






