Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 2 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

आरोपी दिसताच फुगेवाडीकरांचा संताप अनावर! सीआयडीच्या ताफ्यासमोर गोंधळ, दगडफेकीचाही प्रयत्न

फुगेवाडीतील विषारी दारूकांड प्रकरणातील आरोपींना तपास आणि पंचनाम्यासाठी सीआयडीच्या पथकाने घटनास्थळी आणल्यानंतर परिसरात काही काळ तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Jun 02, 2026 | 11:34 AM
आरोपी दिसताच फुगेवाडीकरांचा संताप अनावर! सीआयडीच्या ताफ्यासमोर गोंधळ, दगडफेकीचाही प्रयत्न

आरोपी दिसताच फुगेवाडीकरांचा संताप अनावर! सीआयडीच्या ताफ्यासमोर गोंधळ, दगडफेकीचाही प्रयत्न

Follow Us
Follow Us:

पिंपरी : फुगेवाडीतील विषारी दारूकांडामुळे संतप्त झालेल्या नागरिकांचा रोष सोमवारी सायंकाळी उशिरा पुन्हा एकदा उफाळून आला. या प्रकरणातील आरोपींना तपास आणि पंचनाम्यासाठी सीआयडीच्या पथकाने घटनास्थळी आणल्यानंतर परिसरात काही काळ तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले. तपासाची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर आरोपींना परत नेत असताना नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला. काहींनी आरोपींकडे धाव घेण्याचाही प्रयत्न केल्याने एकच गोंधळ उडाला होता.

 

सीआयडीचे पथक सोमवारी सायंकाळी आरोपींना घेऊन फुगेवाडीत दाखल झाले होते. घटनास्थळी पंचनामा आणि तपासाची प्रक्रिया सुरू असताना परिसरात मोठ्या प्रमाणात नागरिकांची गर्दी झाली होती. मात्र तपास सुरू असताना कोणताही अनुचित प्रकार घडला नव्हता.

तपासाची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर आरोपींना पुन्हा वाहनाकडे नेण्यात येत असताना नागरिकांचा संताप अचानक उसळला. दारूकांडात मृत्यूमुखी पडलेल्या आणि बाधित झालेल्या नागरिकांच्या कुटुंबीयांमध्ये प्रचंड रोष असल्याचे यावेळी दिसून आले. काही नागरिकांनी आरोपींना जाब विचारण्याचा प्रयत्न केला, तर काहींनी थेट त्यांच्याकडे धाव घेतली.

यावेळी एका ज्येष्ठ महिलेने आरोपीपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत संताप व्यक्त केला. परिस्थिती बिघडण्याची चिन्हे दिसताच सीआयडी आणि पोलीस बंदोबस्तावरील कर्मचाऱ्यांनी तातडीने हस्तक्षेप केला. त्यांनी आरोपींभोवती सुरक्षा कवच निर्माण करून परिस्थिती नियंत्रणात आणली.

दरम्यान, काही तरुणांनी हातात दगड घेऊन आरोपींच्या दिशेने जाण्याचा प्रयत्न केल्याचीही चर्चा परिसरात होती. जमावाचा रोष वाढत असल्याचे लक्षात येताच पोलीसांनी आरोपींना तत्काळ वाहनात बसवून तेथून हलवले. पोलिसांच्या सतर्कतेमुळे कोणताही अनुचित प्रकार घडला नाही.

हे सुद्धा वाचा : स्वतःचा मृत्यू दाखवण्यासाठी तरुणाचा खून; विम्याच्या पैशांसाठी रचला थरारक कट, पोलिसांचा मोठा खुलासा

या संपूर्ण घटनेचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. आरोपींना पाहताच नागरिकांनी व्यक्त केलेला संताप आणि निर्माण झालेला तणाव या व्हिडिओंमध्ये दिसून येत आहे. विषारी दारूकांडानंतर फुगेवाडी परिसरात अद्यापही संतापाची लाट कायम असल्याचे या घटनेवरून स्पष्ट झाले आहे. पोलीस प्रशासन परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून असून परिसरात आवश्यक ती खबरदारी घेण्यात येत आहे.

Web Title: A tense atmosphere arose after the cid team brought the accused in the phugewadi case to the scene

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 02, 2026 | 11:34 AM

Topics:  

  • crime news
  • pune news
  • Pune Police Action

संबंधित बातम्या

रस्त्यालगत वाहने पार्किंग करणाऱ्यांना माळेगाव वाहतूक पोलिसांचा दणका; धडक कारवाई सुरु
1

रस्त्यालगत वाहने पार्किंग करणाऱ्यांना माळेगाव वाहतूक पोलिसांचा दणका; धडक कारवाई सुरु

बाह्यवळण मार्गावर कारचालकाला लुटले; वाद घालण्याचा बहाणा करून दीड लाखांचा ऐवज लंपास
2

बाह्यवळण मार्गावर कारचालकाला लुटले; वाद घालण्याचा बहाणा करून दीड लाखांचा ऐवज लंपास

मतदार यादीत दुरुस्तीच्या बतावणीने ज्येष्ठाची फसवणूक; तब्बल लाखो रुपयांना घातला गंडा
3

मतदार यादीत दुरुस्तीच्या बतावणीने ज्येष्ठाची फसवणूक; तब्बल लाखो रुपयांना घातला गंडा

मावळमध्ये खळबळ! पोलीस भरती प्रशिक्षणासाठी आलेल्या तरुणीवर अत्याचार; घरी नेले अन्…
4

मावळमध्ये खळबळ! पोलीस भरती प्रशिक्षणासाठी आलेल्या तरुणीवर अत्याचार; घरी नेले अन्…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.