File Photo : Crime
दापोली : गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारी घटनांमध्ये वाढ होताना दिसत आहे. किरकोळ कारणावरून खून, खुनाचा प्रयत्न यांसारख्या घटना घडत आहेत. त्यानंतर आता अनैतिक संबंधांत अडसर ठरणाऱ्या महिलेने आपल्या प्रियकराच्या मदतीने पतीची हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी पत्नी नेहा निलेश बाक्कर व तिचा प्रियकर मंगेश चिंचघरकर यांना दापोली पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
हेदेखील वाचा : Devendra Fadnavis On Saif Ali Khan: सैफ अली खान हल्ला प्रकरण; CM फडणवीस म्हणाले, “मुंबईत राहणे…”
दापोली गिम्हवणे गावात निलेश बाक्कर यांचा सलूनचा व्यवसाय होता. मात्र, ते सोमवारी बेपत्ता झाल्याने निलेश यांच्या भावाने आपला भाऊ बेपत्ता झाल्याची फिर्याद दापोली पोलीस स्थानकात दिली होती. त्यानंतर पत्नी नेहा हिनेही पती बेपत्ता झाल्याची तक्रार दिली होती. चौकशीअंती तिच्या सांगण्यात तफावत आढळून आली. पोलिसांनी नेहा बाक्कर ज्या हॉटेलमध्ये कामाला होती त्या हॉटेलचे सीसीटीव्ही फुटेज तपासले असता ते दोघेजण हॉटेलमधून बाहेर पडत असल्याचे दिसून आले.
एका बियर शॉपीवर नेहाने बियर घेतल्याचे सुद्धा सीसीटीव्हीमध्ये दिसून आले. आपल्याच नवऱ्याला प्रियकराच्या मदतीने दारू पाजून खून केला असल्याचे तपासात समोर आले. संशयित आरोपी म्हणून ताब्यात घेतलेला मंगेश चिंचघरकर हा बस चालक आहे. मंडणगड डेपोची बस दापोलीला वस्तीला घेऊन आला असता त्याला पोलिसांनी पकडले. त्याच्यावर गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली असून या दोघांनी गुन्ह्याची कबुली दिली आहे.
पती बेपत्ता झाल्याची तक्रार
मृतदेह पालगड पाटील वाडीतून दापोली रुग्णालयात एक वाजता उत्तरीय तपासणीसाठी आणण्यात आला आहे. आपला पती बेपत्ता झाल्याची तक्रार दापोली पोलीस स्थानकात दाखल करून आपण जणू काही केलेच नाही, असं भासवणाऱ्या पत्नीनेच पतीचा प्रियकराच्या साथीने गळा आवळून अत्यंत निर्घृण पद्धतीने खून केला आणि मृतदेह विहिरीत टाकून दिल्याचा धक्कादायक व संतापजनक प्रकार दापोली तालुक्यात घडल्याने मोठी खळबळ उडाली आहे.
अवघ्या 48 तासांत लावला खुनाचा छडा
पती बेपत्ता झाल्याची तक्रार देणाऱ्या पत्नीवरच दापोली पोलिसांचा संशय होता. त्या दिशेने तपास करून अवघ्या 48 तासातच दापोली पोलिसांना या हत्या प्रकरणाचा छडा लावण्यात यश आले.
आठवड्यापूर्वीच हत्येचा कट रचल्याचे समोर
केशकर्तनालयाचा व्यवसाय करणाऱ्या निलेश दत्ताराम बागकर याचा कट रचून खून आता स्पष्ट प्रियकर मंगेश चिचघरकर या दोघांनाही अटक करण्यात आली आहे. मृत निलेश याची पत्नी नेहा बागकर हीचे अनेकदा काही घरगुती कारणावरून वाद सुरू होते. आपल्या पत्नीचे बाहेर काही सुरू असल्याचा संशय निलेश व काही नातेवाईकांना होता. मात्र, आपल्या वाटेत अडथळे असलेल्या पती निलेश याला संपवण्याचा कट पत्नीनेच आपल्या प्रियकराच्या मदतीने आठवड्यापूर्वीच रचला होता, अशी माहिती तपासात समोर आली.
हेदेखील वाचा : Breaking News: सैफ अली खानच्या हल्लेखोराची ओळख पटली, पोलिसांनी सांगितले, ‘आरोपी चोरीच्या उद्देशाने आला पण…’