(फोटो सौजन्य: istock)
भारतच नव्हे तर जगभरातून मोठ्या संख्येने पर्यटक थायलँडला भेट देतात. भारतासह जवळपास 93 देशांच्या नागरिकांना थायलँडमध्ये व्हिसाशिवाय पर्यटनाची संधी उपलब्ध आहे. आता या सोयीबरोबरच थायलँड सरकार पर्यटकांसाठी आणखी एक मोठं पाऊल उचलण्याच्या तयारीत आहे – मोफत देशांतर्गत विमान प्रवास योजना.
थायलँडचे पर्यटन व क्रीडा मंत्री सोरावोंग थिएनथोंग यांनी आंतरराष्ट्रीय पर्यटकांसाठी मोफत देशांतर्गत विमानसेवेसाठी 700 मिलियन थाई बाट इतक्या निधीचा प्रस्ताव सादर केला आहे. या उपक्रमाचा उद्देश म्हणजे फक्त राजधानी व मुख्य पर्यटन शहरांपुरते न थांबता, पर्यटकांना देशातील इतर भागांमध्येही आकर्षित करणे.
ही योजना ऑगस्ट ते डिसेंबर 2025 दरम्यान राबवली जाणार आहे. यात सहभागी होणाऱ्या विमान कंपन्यांच्या तिकिटांवर सरकारकडून अनुदान दिले जाईल. एकमार्गी प्रवासासाठी 1,750 Baht तर दोन्ही बाजूंच्या प्रवासासाठी 3,500 Baht इतक्या दराचे तिकीट सबसिडीवर उपलब्ध होईल. यामुळे देशाच्या पर्यटन क्षेत्रात मोठी वाढ होईल व अर्थव्यवस्थेलाही चालना मिळेल.
ही योजना सुरुवातीला 6 विमान कंपन्यांसोबत सुरू केली जाणार आहे –
या उपक्रमामुळे “अमेजिंग थायलंड ग्रँड टुरिझम अँड स्पोर्ट्स इयर” मोहिमेलाही मोठा फायदा होणार आहे.
थायलंडमधील पाहण्यासारखी टॉप 10 पर्यटनस्थळे
या योजनेमुळे थायलँडला भेट देणाऱ्या आंतरराष्ट्रीय पर्यटकांना अधिक सोयीस्कर प्रवासाचा अनुभव मिळणार असून पर्यटन क्षेत्राची लोकप्रियता आणखी वाढणार आहे.
थायलंडमध्ये तुम्ही देशांतर्गत विमान प्रवास करू शकता का?
थायलंड तुम्हाला देशाच्या बहुतेक भागांशी जोडण्यासाठी अनेक देशांतर्गत विमान कंपन्या चालवते.
थायलंडमध्ये कोणत्या एअरलाईन्स देशांतर्गत उड्डाण करतात?
थाई एअरवेज, थाई एअरएशिया, बँकॉक एअरवेज, थाई लायन एअर, थाई व्हिएतजेट एअर, नोक एअर.