Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 18 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

स्वतःचे सलून दुकान सुरु केल्याचा राग अनावर; तिघांनी केला तरुणाचा खून

बिबवेवाडी परिसरात कटींग दुकानात काम केल्‍यानंतर गावाला जातो अस म्हणून स्वतःचे सलूनचे दुकान सुरू करणाऱ्या तरूणाचा तिघांनी मिळून खून केल्‍याचा प्रकार समोर आला आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Feb 21, 2026 | 01:15 PM
स्वतःचे सलून दुकान सुरु केल्याचा राग अनावर; तिघांनी केला तरुणाचा खून

स्वतःचे सलून दुकान सुरु केल्याचा राग अनावर; तिघांनी केला तरुणाचा खून

Follow Us
Follow Us:
  • स्वतःचे सलून दुकान सुरु केल्याचा राग अनावर
  • तिघांनी केला तरुणाचा खून
  • पोलिसांनी आरोपींना ठोकल्या बेड्या
पुणे : राज्यासह देशभरात गुन्हेगारी वाढली आहे. दररोज वेगवेगळ्या भागातून खून, खुनाचा प्रयत्न, लुटमार यासारख्या घटना घडत आहेत. वाढत्या गुन्हेगारी घटनांमुळे नागरिकांमध्ये भिती पसरत आहे. अशातच आता पुण्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. बिबवेवाडी परिसरात कटींग दुकानात काम केल्‍यानंतर गावाला जातो अस म्हणून स्वतःचे सलूनचे दुकान सुरू करणाऱ्या तरूणाचा तिघांनी मिळून खून केल्‍याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी खून करणाऱ्या तिघांना पोलिसांनी बेड्या ठोकल्‍या आहेत.

 

मोहमद्द शमी (वय २५, अप्पर जुना बसस्‍टॉप, बिबवेवाडी मुळ रा. प्रयागराज, उत्‍तरप्रदेश) असे खून झालेल्‍या तरूणाचे नाव आहे. याबाबत मोहम्‍मद सलमान फिरोज कुरेशी (वय १८, रा. साई स्मार्ट, तिरूपती भेळ शेजारी, जुना बसस्‍टॉप, बिबवेवाडी) याने बिबवेववाडी पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. या प्रकरणी खुन करणारे आरोपी सौरभ चोरगे, अनिकेत सराटे, रोहित बालशंकर या तिघांना अटक करण्यात आली आहे. हा प्रकार गुरूवारी सायंकाळी घडला आहे.

तक्रारदार मोहम्‍मद कुरेशी मोहम्‍मद शमीचा भाऊ आहे. दोघेही मुळचे प्रयागराज येथील आहेत. आरोपी सौरभ चोरगे याच्‍या कटींगच्या सलूनमध्ये मोहम्‍मद शमी गेल्‍या दोन वर्षापासून कामाला होता. काही दिवसांपूर्वी शमीने मालकाला गावाला जातो असे सांगितले. परंतु गावाला न जाता त्‍याने स्वतःचे कटींग सलूनचे दुकान सुरू केले. मात्र शमी हा चोरगेकडील ग्राहक स्वतःच्‍या दुकानात बोलवू लागला. याची खबर चोरगेला लागली. याचाच राग मनात धरून तो मित्रांसह शमी याला जाब विचारण्यासाठी त्‍याच्‍याकडे गेला. तेथे त्‍यांच्‍यात वाद झाले. यावेळी तिघांनी शमीला लाथा बुक्‍क्‍यांनी जोरदार मारहाण केली. यातच शमीचा मृत्‍यू झाला. याप्रकरणी बिबवेवाडी पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्‍हा दाखल करण्यात आला असून, तिघांनाही याप्रकरणी अटक करण्यात आली आहे.

हे सुद्धा वाचा : पुण्यात ज्येष्ठ नागरिकाला लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण; कारण काय तर…

ज्येष्ठ नागरिकाला लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण

स्वारगेट येथील महर्षीनगरमध्ये सोसायटीच्या अवारात बुलेटचा कर्णकर्कश हॉर्न वाजविल्याबाबत विचारणा केल्याने ज्येष्ठ नागरिकाला बॅट तसेच लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी बुलेट चालकासह साथीदारांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत ७३ वर्षीय ज्येष्ठ नागरिकाने स्वारगेट पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यांनुसार, बुलेट चालकासह साथीदारांवर गु्न्हा दाखल करण्यात आला.

Web Title: A young man was murdered in pune for starting his own salon shop

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 21, 2026 | 01:14 PM

Topics:  

  • crime news
  • Pune Crime
  • Pune Police Action

संबंधित बातम्या

भंगार चोरण्यासाठी निघाले अन् बंगल्यातील सोन्यावर मारला डल्ला! तळवडेतील चोरीप्रकरणी तिघांना अटक
1

भंगार चोरण्यासाठी निघाले अन् बंगल्यातील सोन्यावर मारला डल्ला! तळवडेतील चोरीप्रकरणी तिघांना अटक

हिंजवडीत एमडी ड्रग्जचा मोठा साठा जप्त; राजस्थानच्या तरुणासह दोघांना ठोकल्या बेड्या
2

हिंजवडीत एमडी ड्रग्जचा मोठा साठा जप्त; राजस्थानच्या तरुणासह दोघांना ठोकल्या बेड्या

किरकोळ वादातून रक्तरंजित थरार! २१ वर्षीय तरुणाचा खून; वाघोलीतील घटनेनं खळबळ
3

किरकोळ वादातून रक्तरंजित थरार! २१ वर्षीय तरुणाचा खून; वाघोलीतील घटनेनं खळबळ

अर्धापूरमधील शेतशिवारात रक्तरंजित थरार! २५ वर्षीय शेतकऱ्याची धारदार शस्त्राने हत्या
4

अर्धापूरमधील शेतशिवारात रक्तरंजित थरार! २५ वर्षीय शेतकऱ्याची धारदार शस्त्राने हत्या

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.