बेहिशेबी संपत्तीप्रकरणी एसीबीची कारवाई (फोटो- istockphoto)
पुणे: बेहिशेबी मालमत्ता पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पिंपरी-चिंचवड महापालिकेचे तत्कालीन लेखाअधिकारी किशोर शिंगे व त्यांच्या पत्नीवर गुन्हा दाखल केला आहे. त्यांची एसीबीकडून चौकशी करण्यात आली होती. त्यात ज्ञात उत्पन्नापेक्षा ५६ लाख४० हजार २६४ रुपयांची बेहिशेबी मालमत्ता जमा केल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी किशोर बाबुराव शिंगे, त्यांची पत्नी भाग्यश्री किशोर शिंगे यांच्याविरुद्ध वाकड पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अतिरिक्त पाेलीस अधीक्षक माधुरी भोसले यांनी तक्रार दिली आहे.
शिंगे हे पिंपरी चिंचवड महापालिकेत लेखाधिकारी म्हणून नोकरीस होते. सध्या ते सेवानिवृत्त आहेत. त्यांची लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून चौकशी सुरू होती. त्यांनी सेवा कालावधीत मिळवलेल्या उत्पन्नापेक्षा जास्
२४ हजारांची लाच घेताना मंडल अधिकाऱ्याला अटक
मृत्युपत्राची दप्तरी नोंद करून सातबारा देण्यासाठी २४ हजाराची लाच घेताना पेठ (ता. वाळवा) येथील मंडल अधिकारी मल्हारी शंकर कारंडे (वय ४९), महादेववाडीच्या तलाठी सोनाली कृष्णाजी पाटील, (वय ३५), कोतवाल हणमंत यशवंत गोसावी या तिघांना अटक केली आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ही कारवाई केली.
महादेववाडी परिसरातील तक्रारदार यांच्या आजोबानी तक्रारदार यांचे वडील व्यसनी असल्याने त्यांची मौजे महादेववाडी (ता. वाळवा) येथील वडिलोपार्जित जमीन त्यांच्या आईच्या नावाने केली होती. त्यासाठी २००४ मध्ये मृत्युपत्र करून ठेवले होते. २००९ मध्ये तक्रारदार यांचे आजोबा मृत झाले होते. तक्रारदार यांनी सुमारे आठ ते नऊ महिन्यापूर्वी तलाठी सोनाली पाटील यांच्याकडे मृत्युपत्राची नोंद होण्यासाठी आईच्या नावाचा अर्ज दिला होता.
हॉटेलमध्ये लावला सापळा
महादेववाडी तलाठी कार्यालय येथे केलेल्या पडताळणीत तिघांनी पंचासमक्ष सुरुवातीला २५ हजार रूपये लाचेची मागणी करून तडजोडी अंती २४ हजार रुपये लाचेची मागणी केल्याचे स्पष्ट झाले. त्यानुसार पथकाने सापळा रचला. तेव्हा तलाठी सोनाली पाटील यांनी इस्लामपूर तहसील कार्यालयासमोरील हॉटेल आण्णा बुट्टेमध्ये तक्रारदार यांच्याकडून २४ हजार रुपये लाच स्वीकारली असता त्यांना रंगेहाथ पकडण्यात आले.