हृदयद्रावक ! कारने दुचाकीला दिलेल्या जोरदार धडकेत 10 महिन्यांच्या बाळाचा मृत्यू; आई गंभीर (संग्रहित फोटो : अपघात)
गंगाखेड : गंगाखेड ते परळी राष्ट्रीय महामार्गावर असलेल्या करम टावर निळा पाटी परिसरात रिक्षा पलटी होऊन अपघात झाला. ही घटना बुधवारी (दि.२९) दुपारी तीन वाजेदरम्यान घडली. या अपघातात एका जागीच मृत्यू झाला तर इतर सात प्रवाशी जखमी झाले.
हेदेखील वाचा : ‘लाडकी बहीण’नंतर आता राज्यातील तब्बल 5 लाख महिलांना सरकारकडून मिळणार ‘हे’ गिफ्ट; आदिती तटकरेंची माहिती
विश्वनाथ शिवाजी राठोड (वय ५०, रा. व्यंकटीतांडा आवलगाव ता. सोनपेठ) असे मृत्यू झालेल्या प्रवाशाचे नाव आहे. तर जखमींवर गंगाखेडच्या उपजिल्हा रूग्णालयात उपचार सुरू आहेत. परळी येथून रिक्षातून प्रवाशी गंगाखेडला येत असताना रिक्षाचालकाचे रिक्षावरील नियंत्रण सुटले. त्यानंतर रिक्षा पलटी झाली. या रिक्षाने तीन पलट्या घेऊन रस्त्याच्या बाजूला पडली. पलटी होऊन झालेल्या अपघातात रिक्षातील विश्वनाथ शिवाजी राठोड हा एक प्रवाशी जागीच ठार झाला.
तर तानेश नब्बी सय्यद (वय २०, रा. बनवाडी ता. सोनपेठ), मिराबाई सुभाष मिसाळ (वय ४३, रा. निळा, ता. सोनपेठ), रंजना मारोती पांचाळ (वय ३६, रा. पुणे), कृष्णा निवृती आवचार (वय ३१, रा. निळा, ता. सोनपेठ), सुभाष कचरू मिसाळ (वय ५२ रा. निळा ता. सोनपेठ), मारोती संभाजी पांचाळ (वय ४३, रा. बनवस), कमळ दशरथ पांचाळ (वय ७३, रा. निळा, ता. सोनपेठ) हे जखमी झाले आहेत.
जखमींवर तातडीने उपचार सुरु
जखमींवर वैद्यकीय अधिकारी डॉ. गणेश वडजे, परिचारिका प्रज्ञा जोंगदड, संगीता लटपटे, कमल ठाकूर, आरोग्य कर्मचारी देविदास बडे, शेख रशिद शाहा यांनी उपचार केले. घटनास्थळावरून जखमींना नागेश सेवाळ, डिंगाबर कदम, बाबा साळवे यांनी रूग्णवाहिकेने गंगाखेड उपजिल्हा रूग्णालयात उपचारासाठी दाखल केले. अॅटो पलटी झाल्यानंतर चालक तेथून पसार झाला.
प्लेटखाली दबून तरुणांचा मृत्यू
दुसऱ्या घटनेत, तामिळनाडू राज्यात कापडी चादरी विक्री करून मध्यप्रदेशातील आपल्या गावाकडे ट्रकमधून जाणाऱ्या चार तरूणांचा ट्रकमधील अवजड लोखंडी प्लेटखाली दबून जागीच मृत्यू झाला. ही घटना सोमवारी रात्री उशिरा छत्रपती संभाजीनगर मालेगाव महामार्गावरील हॉटेल बळीराजाजवळ घडली.
हेदेखील वाचा : Shambhuraj Desai: “पाल देवस्थानाला पर्यटन स्थळ घोषित करण्यासंदर्भात…”; शंभुराज देसाईंचे प्रशासनाला निर्देश