Photo Credit- Social Media
बीड जिल्हा पोलीस दल विविध कारणांमुळे गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चेत आहे. आता आणखी एक धक्कादायक प्रकार समोर आला असून, पोलीस अधीक्षकांच्या निवासस्थानाच्या परिसरातच एका पोलीस कर्मचाऱ्याला गांजा ओढताना पकडल्याची खळबळजनक माहिती समोर आली आहे. या गंभीर प्रकाराची दखल घेत पोलीस अधीक्षक नवनीत कॉवत यांनी संबंधित कर्मचाऱ्यावर तातडीने कारवाई करत थेट निलंबनाची शिक्षा केली आहे. पोलीस दलाच्या शिस्तीला आणि प्रतिमेला धक्का पोचवणाऱ्या या प्रकारामुळे जिल्हाभरात खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहिती नुसार, पोलीस अधीक्षकांच्या निवासस्थानाच्या डागडुजीचे काम सुरू आहे. याची पाहणी करण्यासाठी काल नवनीत काँवत त्यांच्या कुटुबियांसोबत निवासस्थानी गेले होते.त्यावेळी पोलिस कर्मचारी बाळू गहीनाथ बहिरवाळ घराच्या आतमध्ये गांजा ओढत होते. नवनीत काँवत यांनी घराची बेल वाजवली पण बाळू बहिरवाळ यांनी गेट उघडले नाही. काही वेळानंतर त्यांनी गेट उघडले. नवनीत काँवत यांनी घरात प्रवेश केला. पण त्यावेळी त्यांना गांजाचा वास आला.
पुणे हादरलं! दोन अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार; सावत्र भावानेच केलं अश्लील कृत्य
पोलीस अधिक्षकांच्या घरातच असा गांजाचा वास आल्यामुळे नवनीत काँवत यांनी संबंधित पोलीस कर्मचाऱ्याची जिल्हा रुग्णालयात तपासणी केली. तपासणी अहवालात कर्मचाऱ्याने गांजा पिल्याचे निष्पन्न झाले. त्याची दखल घेत काँवत यांनी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात एनडीपीएस ॲक्ट नुसार गुन्हा दाखल केला. त्याचवेळी बाळी बहिरवाळ यांचे निलंबनही करण्यात आले.