नवी दिल्ली : श्रद्धा वालकर ह्त्या प्रकरणी (Shradhha walkar murder case)रोज नवे नवे खुलासे होत आहेत. रोज येणरी नवी माहिती तितकीच धक्कादायक आहे. श्रद्धाचा मारेकरी आफताबविरुद्ध (aftab poonawala) पुरावे गोळा करण्यासाठी दिल्ली पोलीस या प्रकरणाचा कठोर तपास करत आहेत. त्यामुळे आज आरोपी आफताबची नार्को टेस्ट करण्यात येणार आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ही चाचणी दिल्लीतील आंबेडकर रुग्णालयात होणार आहे. यासाठी दिल्ली पोलिसांनी 50 प्रश्नांची यादी तयार केली आहे.
[read_also content=”लाल सुटकेसमधील तरुणीच्या मृतदेहाची ओळख पटली; वडिलांनीच केली हत्या https://www.navarashtra.com/crime/body-of-young-woman-in-red-suitcase-identified-so-the-father-did-the-killing-nrgm-346865.html”]
नार्को टेस्ट दरम्यान, फॉरेन्सिक सायन्स लॅबोरेटरी (एफएसएल) टीम देखील घटनास्थळी उपस्थित राहणार आहे. दिल्लीतील एका तलावात आपण श्रद्धाचे डोके फेकल्याची आफताबने यापूर्वी दिल्ली पोलिसांसमोर कबुली दिली होती. आता या माहितीनंतर दिल्ली पोलिसांनी रविवारी संध्याकाळी छतरपूर जिल्ह्यातील मैदान गढी येथे पोहोचत श्रद्धाचं डोकं शोधण्याच काम सुरू केलं आहे. यासाठी पोलिसांनी स्थानिकांच्या मदतीने तलावाच्या रिकामे करण्याचे काम सुरू केलं आहे. याशिवाय पोहणाऱ्यांची मदत घेतली जाणार आहे.
[read_also content=”मुंबईतून साडेचारशे परदेशी नागरिकांची हकालपट्टी; बेकायदा वास्तव्यामुळे कारवाई https://www.navarashtra.com/maharashtra/expulsion-of-450-foreign-nationals-from-mumbai-so-proceedings-for-illegal-residence-nrgm-346812.html”]
नुकतचं तपासा दरम्यान पोलिसांना श्रद्धा आणि तिच्या मित्र मैत्रिणी तसेच सहकाऱ्यांसोबतची व्हॉट्सअॅप मिळाली होती. या चॅटवरून आफताब तिला नेहमी मारहाण करत असल्याच समोर आलं होतं. तर आता आणखी एक खळबळजनक बाब समोर आली. तसेच आफताब पूनावालाचे कुटुंबीयसुद्धा मुलगी श्रद्धा वालकरच्या खून प्रकरणामध्ये सहभागी होते असा आरोप श्रद्धाच्या वडीलांनी केला आहे. आफताबला सर्वांसमोर फाशी देण्यात यावी अशी मागणीही श्रद्धाच्या वडीलांनी केली आहे. त्या अनुशंगानेही तपास करण्यात येत आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 18 मे रोजी श्रद्धा आणि आफताबमध्ये लग्न करण्यावरून भांडण झाले होते. त्यानंतर आफताबने श्रद्धाचा गळा दाबून खून केला होता. त्यानंतर पुढचे तीन महिने तो हळूहळू मृतदेहाचे तुकडे जंगलात नेऊन टाकत राहिला. आधी त्याने तिचा मृतदेह बाथरूममध्ये टाकला नंतर त्याची विल्हेवाट लावण्यासाठी इंटरनेटवर माहिती मिळवण्याठी सर्चिंग केलं. दुसऱ्या दिवशी त्याने इलेक्ट्रिक आरी आणली आणि शरीराचे अनेक तुकडे केले. श्रद्धाचे आणि तिचे रक्ताने माखलेले कपडे कचरा उचलणाऱ्या व्हॅनमध्ये टाकण्यात आले. आफताबने श्रद्धाचे अनेक अंग लपवून कपाटात, स्वयंपाकघरात आणि फ्रीजमध्ये ठेवले होते. यानंतर त्यांनी पुरावे पुसण्यासाठी इंटरनेटवर सर्च केले. या दरम्यान, अमेरिकन वेबसिरीज डेक्स्टरही सर्च केल्याचं समोर आलं आहे. अशी माहिती दिल्ली पोलिसांनी दिली आहे. आणि डेक्स्टर या वेब सिरीजवरुन प्रेरणा घेत त्याने हा खून केल्याची माहिती आहे.