उन्नाव : उत्तर प्रदेशमध्ये (Up Crime News) रोज काही ना काही गुन्हे घडत आहे. इथल्या गुन्हेगारांना कशाचाही भिती नसल्याच दिसत आहे. उन्नावमधील एका गावात काल सामूहिक बलात्कार पीडितेच्या घरावर आरोपींनीच हल्ला केल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. या हल्ल्यात पिडिता जखमी झाली असुन तिच्या चार महिन्यांचे बाळही या आगीत होरपळले आहे. एकूण 7 जणांनी आधी घरात घुसून मुलगी आणि तिच्या आईला मारहाण केली, त्यानंतर घराच्या छताला लायटर लावून आग लावली. गंभीररित्या भाजले होते. असा आरोप मुलीच्या आईचा केला आहे.
[read_also content=”पत्ता चुकल्याने गेला भलत्याचं घरी, Doorbell वाजवल्याने मिळाली एवढी भीषण शिक्षा, आता देतोय जीवन-मरणाशी झुंज https://www.navarashtra.com/world/a-man-shot-a-child-in-america-as-was-ringing-his-doorbell-nrps-386668.html”]न
आजतक ने दिलेल्या वृत्तानुसार, आग लावुन आरोपींनी पळ काढला त्यांनतर, शेजारी राहणाऱ्या लोकांनी अग्निशमन विभागाला फोन केला, त्यानंतर आगीवर नियंत्रण मिळवता आले, मात्र या घटनेत ते चार महिन्याचं बाळ जवळपास 50 टक्के भाजले होते. सध्या मुलावर उन्नाव जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याबाबत रुग्णालय प्रशासनाशी बोलणे होऊ शकले नाही. दुसरीकडे सर्कल ऑफिसर संतोष कुमार सिंह म्हणाले की, हो, जाळपोळ आणि मारामारी झाली आहे, पण हे प्रकरण कौटुंबिक वैमनस्यातूनही असू शकते, तपास सुरू आहे.
बलात्काराच्या आरोपींनी केलेल्या खुनी हल्ल्याबाबत सीओ यांनी माहिती दिली की, एक आरोपी तुरुंगात आहे, तर दुसरा कोलकाता येथे राहत आहे. एक आरोपी फरार असून तो गावातच आहे. त्याला त्याच्या कुटुंबीयांसह ताब्यात घेऊन चौकशी सुरू करण्यात आली आहे. मुलावर उपचार केले जात आहेत. येथे आठवडाभरापूर्वी पीडितेच्या वडिलांवरही जीवघेणा हल्ला झाला होता. गंभीर जखमी वडिलांवरही याच जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.