अलिबाग : पेण आणि खालापूर तालुक्यात (Pen And Khalapur Taluka) मोटार सायकल (Motor Bike) चोरणाऱ्या (Theft) बंटी बबलीला (Bunty Bubli) रायगडच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने (Crime Investigation Department of Raigad) अटक (Arrest) केली आहे दोन लाख तेरा हजार किमतीच्या आठ मोटरसायकल पोलिसांनी हस्तगत केल्या आहेत.
विक्रम राम कालेकर, वय. 36, रा. यशवंत नगर,खराडी, पुणे मूळ रा.लाडवली,ता.पनवेल, जि. रायगड आणि अनुराधा विवेक दंडवते, वय.31, रा. रा. यशवंतनगर, खराडी, पुणे, मूळ रा.75/4, पर्वती पायथा, स्वारगेट ,पुणे अशी आरोपींची नावे आहेत.
विक्रम हा विक्रम हा पुणे येथे सॅमसंग या नामांकित कंपनीमध्ये नोकरीला आहे त्याला दरमहा चाळीस हजार रुपये पगार आहे तसेच अनुराधा हे देखील एका खाजगी कंपनीत कामाला आहे. डोक्यावर कर्ज झाल्याने गाड्या चोरण्याचे पाऊल उचलल्याचे विक्रमने पोलिसांना सांगितले.
[read_also content=”महाराष्ट्र भूषण सोहळ्यानंतरच्या दुर्दैवी घटनेची वस्तुस्थिती तपासण्यासाठी एक सदस्यीय समिती; एक महिन्यात देणार अहवाल https://www.navarashtra.com/maharashtra/a-one-member-committee-to-investigate-the-facts-of-the-unfortunate-incident-after-the-maharashtra-bhushan-ceremony-report-to-be-given-in-one-month-nrvb-387922.html”]
कंपनीतून सुट्टीच्या दिवशी गर्लफ्रेंडला अनुराधाला घेऊन येऊन पेण आणि रसायनी या पोलीस स्टेशन हद्दीमधून मोटरसायकल चोरीचे गुन्हे करायचा. महिला सोबत असेल तर पोलीस चेकिंग करत नाहीत असा समज करून तो गर्लफ्रेंडला घेऊन मोटरसायकल चोऱ्या करायचा. ज्या परिसरात चोरी करायची आहे त्या परिसरात फिरून ज्या मोटरसायकलला चावी आहे अशी मोटरसायकल चोरी करत होता.
[read_also content=”आजचे राशीभविष्य : 20 April 2023, कसा जाईल आजचा दिवस; वाचा सविस्तर https://www.navarashtra.com/web-stories/today-daily-horoscope-20-april-2023-rashibhavishya-in-marathi-nrvb/”]
रसायनी पोलीस ठाण्यात वाहन चोरीचे गुन्हे दाखल झाले होते त्याचा तपास करताना मिळालेल्या फुटीच्या आधारे या बंटी बबलीचा पोलिसांनी शोध घेतला आरोपी हा पुणे येथे राहत असल्याचे लक्षात आल्यावर त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले त्यांच्याकडे दाखल गुन्ह्याचे बाबत विचारपूस केली असता त्याने त्याची महिला साथीदार हिच्या मदतीने सदर गुन्हा केल्याची कबुली दिली.अधिकच्या चौकशी मध्ये सदर आरोपीने 10 मोटर सायकल चोरीचे गुन्हे केल्याची कबुली दिलेली आहे. पेण तालुक्यात तीन रसायनी तालुक्यात पाच आणि नवी मुंबई मध्ये दोन गुन्हे केल्याचे समोर आले आहे.