दिल्ली : ‘चारित्र्यावरील संशय हा चारित्र्याची हत्या करण्यासारखेच आहे. आपल्या जोडीदारावर चारित्र्यहीन आरोप करणे ही गंभीर बाब आहे. दोघांच्या नात्यातील विवाहबाह्य संबंधाचे आरोप गंभीर असतात. ते गांभिर्यानेच घेतले पाहिजेत. विवाह हे नाते पवित्र आहे. निरोगी समाजासाठी त्याची शुद्धता राखणे अत्यंत महत्वाचे आहे, असे मत दिल्ली हायकोर्टाने व्यक्त केले. एका पतीने पत्नीच्या क्रूरतेविरोधात घटस्फोटासाठी याचिका दाखल केली होती. या याचिकेवर सुनावणी करताना न्या. विपीन सांघी आणि दिनेशकुमार शर्मा यांनी महत्त्वाचे निरीक्षण नोंदविले(Allegations of extramarital affair serious: Delhi High Court).
पतीवर किंवा सासऱ्यांवर बिनबुडाचे आरोप करणे म्हणजे त्यांच्या चारित्र्याची हत्या आहे. यातूनच पतीवरील क्रूरता दिसून येते. विवाहबाह्य संबंधाचे आरोप करणे म्हणजे चारित्र्य, दर्जा, प्रतिष्ठा आणि आरोग्य यांच्यावर गंभीर आघात आहेत. यामुळे जो काही मानसिक त्रास आणि यातना होतात, ते क्रूरच असतात असे दिल्ली हायकोर्टने म्हंटले आहे.
एका पतीने पत्नीच्या क्रूरतेवरून कौटुंबिक न्यायालयात घटस्फोटासाठी अर्ज केला होता. संबंधित पत्नी ही पतीच्या चारित्र्यावर सतत संशय घेत होती. यामुळे न्यायालयाने त्यांना घटस्फोटही दिला होता. त्या विरोधात महिलेने दिल्ली न्यायालयात याचिका दाखल केली होती. ही याचिका न्यायालयाने फेटाळून लावली.
या प्रकरणात संबंधित महिला ही समाजशास्त्र विषयाची प्राध्यापिका आहे, तर तिचा पती हा एका कंपनीत सहाय्यक व्यवस्थापक आहे. 2014 मध्ये पती-पत्नीमधील संबंध बिघडले होते. 2017 मध्ये पत्नीच्या क्रूरतेवरून पतीने न्यायालयात घटस्फोटासाठी अर्ज केला होता. तो 2009 मध्ये न्यायालयाने मंजूर केला होता.
याचिका दाखल करणाऱ्या महिलेने आपल्या पतीवर गंभीर आरोप केले; परंतु, सुनावणीवेळी यातील एकही आरोप सिद्ध करता आला नाही. सासऱ्याविरोधी जे गंभीर आरोप करण्यात आले होते, तेही सिद्ध करता आले नाहीत. विवाह हे पवित्र नाते आहे. त्याला शुद्ध ठेवण्याची गरजचे आहे. अशाप्रकारे चारित्र्यावर खोटे आरोप करणे ही एक प्रकारची क्रूरताच आहे. त्यामुळे कौटुंबिक न्यायालयाच्या निर्णयात हस्तक्षेप करण्याचे कारण आम्हाला दिसत नाही, असे निरीक्षणही न्यायालयाने नोंदविले.
[read_also content=”घरात-दुकानात, वाहनांना ‘लिंबू-मिरची’च का बांधतात? अध्यात्म आणि विज्ञान काय सांगते? https://www.navarashtra.com/religion/religion/nimbu-mirchi-totka-nrvk-257586.html”]
[read_also content=”येथे लग्नानंतर नविन नवरा-नवरीच्या प्रायव्हेट पार्टची पूजा करतात; पूजेच्या नावावर होतात वधू-वरावर अत्याचार https://www.navarashtra.com/viral/here-after-the-wedding-the-newlyweds-worship-the-private-part-of-the-bride-the-bride-and-groom-are-tortured-in-the-name-of-worship-256616.html”]
[read_also content=”रशिया-युक्रेननंतर आता जपानमध्ये घडला गूड प्रकार; 1000 वर्षांपासून दगडात कैद असलेला राक्षस आला बाहेर https://www.navarashtra.com/latest-news/japans-killing-stone-cracked-nrvk-251491.html”]
[read_also content=”एकदम भयानक डिश! नाव ऐकून पण अंगावर काटा येईल; विंचू आणि सापाचे सूप https://www.navarashtra.com/viral/scorpion-and-snake-soup-famous-in-china-nrvk-241966.html”]
[read_also content=”भारतात सर्वात प्रथम ‘या’ गावावर पडतात पहिली सूर्यकिरणे! पहाटे 3 वाजता डोंगरावर सूर्य उगवतो; दुपारी चार वाजताच पडतो अंधार https://www.navarashtra.com/travel/travel/dong-valley-the-land-of-indias-first-sunlight-nrvk-248724.html”]
[read_also content=”हिंदू धर्मीय 33 कोटी देवतांना मानतात; पण हिंदूंना सर्वाधिक आवडणारा देव कोणता? कोणत्या देवावर आहे जास्त श्रद्धा? https://www.navarashtra.com/latest-news/hindus-worship-33-crore-deities-but-what-is-the-favorite-deity-of-hindus-which-god-do-you-have-more-faith-in-248711.html”]
[read_also content=”घरातील एक वास्तू दोष संपूर्ण कुटुंबाला बर्बाद करु शकतो; शेकडो वास्तू दोषांवर एकच जालीम उपाय https://www.navarashtra.com/latest-news/an-architectural-defect-in-a-home-can-ruin-an-entire-family-a-single-solution-to-hundreds-of-architectural-defects-nrvk-247553.html”]