Photo Credit- Team navrashtra
अमरावती: महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर अमरावतीतून धक्कादायक बातमी समोर आली आहे. अमरावतीतील दर्यापूर येथील खल्लार गावात माजी खासदार नवनीत राणा यांच्या सभेत मोठा राडा झाला आहे. निवडणुकीच्या प्रचारसभेदरम्यान, काहीजणांनी थेट खुर्च्या भिरकावत मोठी तोडफोड केली. या गोंधळात हल्लेखोरांनी आपल्या रही खुर्च्या फेकल्याचा आरोर नवनीत राणा यांनी केला आहे. या घटनेचा व्हिडीओही सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
युवा स्वाभिमान पक्षाचे उमेदवार रमेश बुंदिले यांच्या प्रचारार्थ जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते. त्यांच्या समर्थनार्थ नवनीत राणा यांनी प्रचारसभा आयोजित केली होती. पण सभा सुरू असतानाच समोर बसलेल्या काही जणांनीच खुर्च्या फेकण्यास सुरूवात केली. यामुळे सबेत मोठा गदारोळ झाला. या गोंधळानंतर नवनीत राणांनी खल्लार पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. या बैठकीत नवनीत राणांनी सुरक्षा व्यवस्थेवरही प्रश्न उपस्थित केले.
त्याचबरोबर याप्रकरणी पोलिसांनी 45 जणांवर गुन्हा दाखल केला आहे. चार जणांना ताब्यात घेतले आहे. हा गोंधळ घालणाऱ्यांचा पोलिस शोध घेत आहेत. महाराष्ट्रात 20 नोव्हेंबरला एकाच टप्प्यात 288 जागांवर मतदान होणार असून 23 नोव्हेंबरला निकाल जाहीर होणार आहेत.
800 वर्षे जुनं असं एक गाव जिथे एकही रस्ता नाही! कसा होतो लोकांचा प्रवास?
याबाबत नवनीत राणा म्हणाल्या, मला पाहिल्यानंतर त्या लोकांनी माझ्याशी गैरवर्तन केले. माझ्या पोलिस सुरक्षा रक्षकांनाही मारहाण करण्यात आली. त्यांनी मला मारहाण केली, माझ्यावर खुर्च्या फेकल्या. माझ्या जातीबाबत त्यांनी मला शिवीगाळ केली. माझ्यावर थुंकण्याचा प्रयत्न केला. आरोपींना अटक न झाल्यास अमरावती जिल्ह्यातील समस्त हिंदू समाज या ठिकाणी जमा होईल, असा इशाराही नवनीत राणांनी दिला आहे.
एफआयआर नोंदवल्यानंतर अमरावती ग्रामीण गुन्हे शाखेचे निरीक्षक किरण वानखडे म्हणाले, “माजी खासदार नवनीत राणा काल दर्यापूर विधानसभा मतदारसंघातील भाजप उमेदवार रमेश बुंदिले यांच्या प्रचारासाठी खल्लार गावात आल्या होत्या. रॅलीदरम्यान दोन गटात वाद झाला. नवनीत राणा यांच्या तक्रारीवरून आम्ही गुन्हा दाखल केला आहे. परिस्थिती आता नियंत्रणात आहे. गावात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. नागरिकांनी कोणत्याही प्रकारच्या अफवांवर विश्वास ठेवू नये अशी आमची विनंती आहे. “पुढील तपास सुरू आहे.”
महाराष्ट्र विधानसभा निवडणुका जसजशा जवळ येत आहेत, तसतसे निवडणुकीचे वातावरण तापत आहे. दरम्यान, पोलिसांनी कारवाईचा वेग वाढवला आहे. या घटनेच्या व्हिडिओच्या आधारे अमरावती पोलीस चोरट्यांचा शोध घेत आहेत. महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुका राज्यभर एकाच टप्प्यात होणार आहेत. महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक 20 नोव्हेंबरला होणार असून, 23 नोव्हेंबरला मतमोजणी होणार आहे.
निकालानंतर वेगवेगळे सरप्राईजेस मिळतील, अजून 8-10 दिवस थांबा; राज ठाकरेंना नेमकं म्हणायचयं
Amravati, Maharashtra: Chaos erupted at a rally addressed by former MP Navneet Rana in Khallar village, Daryapur. Miscreants disrupted the event, vandalized chairs, and caused tension. Police enforced strict security measures pic.twitter.com/1B5NlPDBdJ — IANS (@ians_india) November 16, 2024