उत्तराखंडच्या चमोलीत मोठी दुर्घटना; बांधकाम सुरू असलेल्या बोगद्यात दोन ट्रेनमध्ये जोरदार धडक, 60 जण जखमी
चमोली : उत्तराखंडच्या चामोली येथे मंगळवारी (दि.३०) रात्री उशिरा एक मोठा अपघात झाला. THDC च्या बांधकाम सुरू असलेल्या विष्णुगड-पिपलकोटी जलविद्युत प्रकल्पात दोन लोको ट्रेनची टक्कर झाली. या अपघातात सुमारे ६० लोक जखमी झाले. जलविद्युत प्रकल्पाच्या १३ किलोमीटर लांबीच्या बोगद्यात १०० हून अधिक अधिकारी, कर्मचारी आणि कामगार काम करत होते. या अपघातानंतर जखमींना तातडीने रुग्णालयात नेण्यात आले. ही घटना रात्री साडेनऊच्या सुमारास घडली.
चमोली जिल्ह्यातील अलकनंदा नदीवर ४४४ मेगावॅट क्षमतेचा जलविद्युत प्रकल्प बांधला जात असल्याचे सांगण्यात आले आहे. या बोगद्यात काम सुरू होते. बोगद्यात बोरिंग मशीनचा वापर करून उत्खननही केले जात होते. कामाला गती देण्यासाठी बोगद्यात जड यंत्रसामग्री तैनात करण्यात आली होती. यापैकी दोन मशीन (लोको ट्रेन) आपटल्या. अपघातावेळी १०० हून अधिक अधिकारी, कर्मचारी आणि कामगार बोगद्यात होते. सुमारे ६० जण जखमी झाल्याचे वृत्त आहे. अपघातामुळे बोगद्यातील बांधकामाचे कामही थांबवण्यात आले.
मिळालेल्या माहितीनुसार, कामगारांना घेऊन जाणाऱ्या दोन लोको गाड्या बोगद्याच्या आत एकमेकांना धडकल्या. अपघाताची माहिती मिळताच जिल्हाधिकारी गौरव कुमार आणि पोलिस अधीक्षक सुरजीत सिंह पनवार यांनी जिल्हा रुग्णालय गोपेश्वर येथे पोहोचून तेथे दाखल असलेल्या जखमींची विचारपूस केली आणि डॉक्टरांना चांगले उपचार देण्याच्या सूचना दिल्या.
दुर्घटनेत 60 जण जखमी झाल्याची शक्यता
चमोली येथे झालेल्या दुर्घटनेत, सुमारे ६० जण जखमी झाले आहेत. यापैकी ४२ जखमींवर गोपेश्वर जिल्हा रुग्णालय आणि १७ जखमी कामगारांवर विवेकानंद रुग्णालय पिपलकोटी येथे उपचार सुरू आहेत. इतरांची प्रकृती सामान्य आहे. सध्या सर्व जखमींची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात येत आहे.
दुर्घटनेत अनेकजण जखमी, दोघे गंभीर
या अपघातात १०० जण जखमी झाले. ट्रॉलीत ११० अभियंते, कर्मचारी आणि कामगार होते. ते काम संपवून परतत होते. ४२ जखमींना गोपेश्वर येथील जिल्हा रुग्णालयात आणि १७ जणांना पिपलकोटी येथील विवेकानंद रुग्णालयात दाखल करण्यात आले. इतरांना प्राथमिक उपचारानंतर घरी सोडण्यात आले. दोन जखमींची प्रकृती चिंताजनक आहे. जखमींपैकी बहुतेक जण बिहार, ओडिशा आणि झारखंडचे रहिवासी आहेत. माल वाहून नेणाऱ्या ट्रॉलीचे ब्रेक निकामी होणे हे अपघाताचे प्राथमिक कारण असल्याचे मानले जात आहे.
हेदेखील वाचा : Uttarakhand Bus Accident: अल्मोडा येथे भीषण रस्ता अपघात; प्रवासी बस खोल दरीत कोसळली, 7 जणांचा मृत्यू तर अनेक जखमी






