Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 13 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

कौटुंबिक वादातून पत्नीचा गळा आवळून खून, मुलावरही चाकूने वार; खेड शहरातील घटनेनं खळबळ

राजगुरुनगर शहरातील वाडा रोड परिसरातील संगम गार्डन येथे कौटुंबिक वादातून पतीने पत्नीचा गळा आवळून खून केल्याची धक्कादायक घटना रविवारी (दि. ३०) सकाळी घडली आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Aug 31, 2026 | 08:13 PM
कौटुंबिक वादातून पत्नीचा गळा आवळून खून, मुलावरही चाकूने वार; खेड शहरातील घटनेनं खळबळ

कौटुंबिक वादातून पत्नीचा गळा आवळून खून, मुलावरही चाकूने वार; खेड शहरातील घटनेनं खळबळ

Follow Us
Follow Us:

चांडोली : राजगुरुनगर शहरातील वाडा रोड परिसरातील संगम गार्डन येथे कौटुंबिक वादातून पतीने पत्नीचा गळा आवळून खून केल्याची धक्कादायक घटना रविवारी (दि. ३०) सकाळी घडली आहे. आईला वाचवण्यासाठी धावून आलेल्या १७ वर्षीय मुलावरही आरोपीने ओढणीने गळा आवळण्याचा प्रयत्न करून चाकूने वार केल्याचे समोर आले आहे. या घटनेमुळे खेड शहरात खळबळ उडाली आहे.  दीपा महेंद्र दौंडकर (वय ४०) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. तर महेंद्र शिवाजी दौंडकर (वय ४५) असे आरोपी पतीचे नाव आहे. या प्रकरणी मृत महिलेच्या १७ वर्षीय मुलाने खेड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी सकाळी साडेसात ते साडेअकरा वाजण्याच्या दरम्यान संगम गार्डन, वाडा रोड येथील राहत्या घरी हा प्रकार घडला आहे. पत्नी आपल्याशी बोलत नसल्याच्या कारणावरून महेंद्र दौंडकर यांचा तिच्याशी वाद झाला. या वादातून त्यांनी पत्नी दीपा यांचा गळा आवळून खून केला.

खेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

दरम्यान, मुलगा आईला उठवण्यासाठी बेडरूममध्ये गेला असता आरोपीने त्याचाही ओढणीने गळा दाबण्याचा प्रयत्न केला. त्याने आरडाओरड करत घराबाहेर पळण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी आरोपीने त्याला चाकूने भोसकून ठार करण्याची धमकी दिली. तसेच त्याच्या उजव्या हाताच्या अंगठ्यावर चाकूने वार केल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. या प्रकरणी खेड पोलीस ठाण्यात सोमवारी (दि. ३१) सकाळी आरोपीविरुद्ध खून, खुनाचा प्रयत्न आणि धमकी दिल्याचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पुढील तपास खेड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुभाष चव्हाण करीत आहेत.

हे सुद्धा वाचा : वराळेत जुन्या भांडणाच्या रागातून तरुणावर हल्ला, कोयत्याने सपासप वार करुन संपवलं; आठ जणांवर गुन्हा दाखल

मारहाण करून बापाने मुलाला संपवलं

दारूच्या आहारी गेलेला मुलगा दररोज वाद घालत असल्याच्या रागातून वडिलांनी मुलाचा गळा आवळून तसेच मारहाण करून खून केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. वारजे माळवाडी परिसरात ही घटना घडली असून, याप्रकरणी वडिल तसेच आईला पोलिसांनी अटक केली आहे.  महेश भागवत गायकवाड (वय ३०) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी भाऊ गणेश भागवत गायकवाड (वय ३४) यांनी पोलिसांकडे तक्रार दिली आहे. त्यानुसार भागवत सूर्यभान गायकवाड (वय ६४), पार्वती भागवत गायकवाड (वय ६०) आणि आणखी एका व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वडिल भागवत व आई पार्वती यांना अटक केली आहे.

Web Title: An incident in which a husband murdered his wife has occurred in khed city

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 31, 2026 | 08:13 PM

Topics:  

  • Arrested News
  • crime news
  • Murder Case

संबंधित बातम्या

Nashik Crime : नाशिकच्या त्र्यंबक नाका परिसरात तरुणावर जीवघेणा हल्ला, दोन संशयित ताब्यात
1

Nashik Crime : नाशिकच्या त्र्यंबक नाका परिसरात तरुणावर जीवघेणा हल्ला, दोन संशयित ताब्यात

Jalgaon News: घरफोड्यांचा खेळ अखेर संपला! मध्य प्रदेशातील संशयितांना अमळनेर पोलिसांनी पकडलं
2

Jalgaon News: घरफोड्यांचा खेळ अखेर संपला! मध्य प्रदेशातील संशयितांना अमळनेर पोलिसांनी पकडलं

IIT भरती परीक्षेत कॉपी करण्यासाठी हायटेक जुगाड; गोवा विमानतळावर दोन ‘मुन्नाभाई’ अटकेत
3

IIT भरती परीक्षेत कॉपी करण्यासाठी हायटेक जुगाड; गोवा विमानतळावर दोन ‘मुन्नाभाई’ अटकेत

पुण्यात घरफोडी करणाऱ्या जोडप्यासह तिघांना अटक; सीसीटीव्हीच्या मदतीने लावला गुन्ह्याचा छडा
4

पुण्यात घरफोडी करणाऱ्या जोडप्यासह तिघांना अटक; सीसीटीव्हीच्या मदतीने लावला गुन्ह्याचा छडा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.