संग्रहित फोटो
या घटनेने माणगाव (ता. हातकणंगले) परिसरात संतापाची लाट उसळली असून, ग्रामस्थांनी कँडल मार्च काढून कठोर कारवाईची मागणी केली आहे. स्वरा ही इयत्ता नववीमध्ये शिकत होती. नवरात्रोत्सवानिमित्त ती दररोज चंद्रप्रभू मंदिरात आरतीसाठी जात असे. शनिवारी रात्रीही ती नेहमीप्रमाणे मंदिरात गेली होती. आरती संपल्यानंतर घरी परतत असताना मंदिराशेजारील अरुंद गल्लीत संशयित आरोपीने तिला एकटीला गाठून धारदार शस्त्राने वार केल्याची प्राथमिक माहिती आहे. या हल्ल्यात स्वरा गंभीर जखमी होऊन रक्ताच्या थारोळ्यात कोसळली. घटनेची माहिती मिळताच सामाजिक कार्यकर्त्यांनी पोलिसांना कळविले.
चार पथकांकडून शोध, अखेर कर्नाटकात जाळ्यात
घटनेनंतर संशयित आरोपी फरार झाला होता. त्याच्या शोधासाठी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची तीन आणि हातकणंगले पोलिसांचे एक अशी चार पथके तैनात करण्यात आली होती. महाराष्ट्रातील विविध ठिकाणांसह कर्नाटकातही शोधमोहीम राबविण्यात आली. अखेर ४८ तासांनंतर सदलगा पोलिस ठाण्याच्या हद्दीत आरोपीचा शोध लागला. सदलगा पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन चौकशी सुरू केली असून, त्याला महाराष्ट्र पोलिसांच्या ताब्यात देण्याची प्रक्रिया अपेक्षित आहे.
खुनामागचे कारण काय? तपासाकडे लक्ष
स्वराची हत्या नेमकी कोणत्या कारणातून झाली, याबाबत अद्याप स्पष्ट माहिती समोर आलेली नाही. आरोपीने हा हल्ला का केला, त्यामागे वैयक्तिक कारण होते की अन्य काही कारण, याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे. त्यामुळे आरोपीच्या चौकशीतून हत्येमागील गूढ उकलण्याची शक्यता आहे. पोलिस तपासातूनच या प्रश्नांची उत्तरे मिळणार आहेत. स्वराच्या मृत्यूनंतर माणगावमध्ये शोककळा पसरली आहे. घटनेच्या निषेधार्थ अत्यावश्यक सेवा वगळता गावातील व्यवहार बंद ठेवण्यात आले. सायंकाळी ग्रामस्थांनी कँडल मार्च काढून स्वराला श्रद्धांजली अर्पण केली. या प्रकरणात विशेष सरकारी वकील म्हणून उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करावी, अशी मागणीही ग्रामस्थांनी केली आहे. दरम्यान, कोल्हापूर येथील सीपीआर रुग्णालयात स्वराच्या मृतदेहाचे विच्छेदन करण्यात आले. गळ्यावरील खोल जखम आणि इतर गंभीर जखमांमुळे अतिरक्तस्राव होऊन तिचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती पोलिसांनी दिली.
Ans: स्वरा उपाध्ये हिच्या हत्या प्रकरणातील संशयित अरुण लगम्मावर याला घटनेनंतर तब्बल ४८ तासांनी महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवरील सदलगा पोलिस ठाण्याच्या हद्दीतून ताब्यात घेण्यात आले.
Ans: नवरात्रोत्सवानिमित्त चंद्रप्रभू मंदिरात आरती करून घरी परतत असताना मंदिराशेजारील अरुंद गल्लीत स्वरावर धारदार शस्त्राने वार करण्यात आले. या हल्ल्यात तिचा मृत्यू झाला.
Ans: स्वराची हत्या नेमकी कोणत्या कारणातून करण्यात आली, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. संशयिताच्या चौकशीतून हत्येमागील कारण समोर येण्याची अपेक्षा आहे. या घटनेनंतर माणगाव परिसरातील ग्रामस्थांनी कँडल मार्च काढून कठोर कारवाईची मागणी केली आहे.






