Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 15 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

जुन्या किरकोळ कारणावरून तरुणाचा खून, आईने आरडाओरड केली पण…; नांदेड जिल्ह्यातील घटनेनं खळबळ

भाग्यनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत जुन्या किरकोळ कारणावरून झालेल्या वादाचे पर्यवसान तरुणाच्या खुनात झाले आहे. आकाश दवणे याच्यावर बुधवारी रात्री उशिरा बुद्ध विहाराजवळ काही जणांनी हल्ला केला.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Aug 29, 2026 | 11:41 AM
जुन्या किरकोळ कारणावरून तरुणाचा खून, आईने आरडाओरड केली पण...; नांदेड जिल्ह्यातील घटनेनं खळबळ

जुन्या किरकोळ कारणावरून तरुणाचा खून, आईने आरडाओरड केली पण...; नांदेड जिल्ह्यातील घटनेनं खळबळ

Follow Us
Follow Us:
  • जुन्या किरकोळ कारणावरून तरुणाचा खून
  • आई अन् भावालाही मारहाण
  • नांदेड जिल्ह्यातील घटनेनं खळबळ
नांदेड : राज्यासह देशभरात गुन्हेगारी वाढली असून, अशातच आता एक मोठी बातमी समोर आली आहे. भाग्यनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत जुन्या किरकोळ कारणावरून झालेल्या वादाचे पर्यवसान तरुणाच्या खुनात झाले आहे. आकाश दवणे याच्यावर बुधवारी रात्री उशिरा बुद्ध विहाराजवळ काही जणांनी हल्ला केला. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या आकाशचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, हल्ला सोडविण्यासाठी गेलेल्या त्याच्या आई व भावालाही मारहाणीत दुखापत झाली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आकाश दवणे हा रात्री घराकडे जात असताना जुन्या किरकोळ कारणावरून त्याला शिवीगाळ करण्यात आली. घरी आल्यानंतर त्याने हा प्रकार आई व भावाला सांगितला. त्यानंतर पुन्हा सावते यांचा फोन आल्याचे सांगण्यात येते. यावेळी आकाशने आपण येथे थांबलो असल्याचे सांगितल्यानंतर त्याला बुद्ध विहाराजवळ थांबण्यास सांगण्यात आले. यानंतर आकाश हा बुद्ध विहाराजवळ गेला. त्याच्या मागोमाग आईही तेथे पोहोचली. त्यावेळी काही जणांनी आकाशवर हल्ला केल्याचे तक्रारीत नमूद आहे.

हे सुद्धा वाचा : पुण्यात अनैतिक संबंधाचा थरार! भरचौकात तरुणावर चाकूने सपासप वार, बायको-मुलासमोरच मृत्यू

हल्ल्यात मयताची आई व भाऊही झाला जखमी

मुलावर हल्ला होत असल्याचे पाहून आईने आरडाओरड केली. मात्र, तोपर्यंत आकाश रक्तबंबाळ होऊन खाली कोसळला. हल्ल्यात त्याची आई व भाऊ यांनाही दुखापत झाली. या प्रकरणी आकाशच्या आईच्या फिर्यादीवरून भाग्यनगर पोलीस ठाण्यात एकूण आठ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामध्ये नितीन सावते, कुणाल सावते, सिद्धाथ सावते, रोहित सावते, गंगाबाई सावते, संघमित्र नितीन सावते, प्रतीक मुनी आणि साहिल दूधमल यांचा समावेश आहे. यातील चौघांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून, उर्वरित संशयितांचा शोध सुरू आहे. घटनेचा पुढील तपास भाग्यनगर पोलीस करीत आहेत.

हे सुद्धा वाचा : भाजप नगरसेविकेच्या नणंदेची आत्महत्या, पतीसह चौघांवर गुन्हा दाखल; धक्कादायक कारणही समोर

मारहाण करून बापाने मुलाला संपवलं

दारूच्या आहारी गेलेला मुलगा दररोज वाद घालत असल्याच्या रागातून वडिलांनी मुलाचा गळा आवळून तसेच मारहाण करून खून केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. वारजे माळवाडी परिसरात ही घटना घडली असून, याप्रकरणी वडिल तसेच आईला पोलिसांनी अटक केली आहे.  महेश भागवत गायकवाड (वय ३०) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी भाऊ गणेश भागवत गायकवाड (वय ३४) यांनी पोलिसांकडे तक्रार दिली आहे. त्यानुसार भागवत सूर्यभान गायकवाड (वय ६४), पार्वती भागवत गायकवाड (वय ६०) आणि आणखी एका व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वडिल भागवत व आई पार्वती यांना अटक केली आहे.

Web Title: An incident involving the murder of a young man has occurred in nanded district

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 29, 2026 | 11:41 AM

Topics:  

  • Arrested News
  • crime news
  • Murder Case

संबंधित बातम्या

जुन्नर तालुक्यात मध्यरात्री टोळक्याचा धुमाकूळ, वाहनांची तोडफोड; महिलेलाही मारहाण
1

जुन्नर तालुक्यात मध्यरात्री टोळक्याचा धुमाकूळ, वाहनांची तोडफोड; महिलेलाही मारहाण

प्रशिक्षणार्थी PSI पतीकडून विवाहितेचा छळ, पिस्तूल दाखवून धमकावल्याचा आरोप; नेमकं प्रकरण काय?
2

प्रशिक्षणार्थी PSI पतीकडून विवाहितेचा छळ, पिस्तूल दाखवून धमकावल्याचा आरोप; नेमकं प्रकरण काय?

पोलिसावर अधिकाऱ्यावर तलवार अन् दगडाने जीवघेणा हल्ला; फरार मुख्य आरोपी अखेर पोलिसांच्या जाळ्यात
3

पोलिसावर अधिकाऱ्यावर तलवार अन् दगडाने जीवघेणा हल्ला; फरार मुख्य आरोपी अखेर पोलिसांच्या जाळ्यात

केज तालुक्यात खळबळ! प्रियकराच्या मुलानेच केली महिलेची हत्या; मृतदेह पुरला अन्…
4

केज तालुक्यात खळबळ! प्रियकराच्या मुलानेच केली महिलेची हत्या; मृतदेह पुरला अन्…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.