Photo Credit- Social Media बब्बर खालसा दहशतवादी संघटनेच्या दहशतवाद्याला महाराष्ट्र ATS कडून अटक
महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकाकडून (ATS) धक्कादायक माहिती समोर आली आहे. दहशतवादी संघटना बब्बर खालसा चा दहशतवादी क्रेन ऑपरेटरचे काम करताना सापडल्याची माहिती समोर आली आहे. तो मुंबईतील वर्सोवा-घाटकोपर मेट्रोतही त्याने काम केल्याची माहिती समोर आली आहे. इतकेच नव्हे तर या दहशतवाद्याने लखनऊ आणि दिल्ली मेट्रोतही क्रेन ऑपरेटरचे काम केल्याची माहिती आहे. त्यामुळे देशविरोधी संघटना अवैध बांगलादेशींशी हातमिळवणी करू शकतात, अशी भितीही या पथकाकडून व्यक्त करण्यात आली आहे. देशातील आणि देशाबाहेरच्या भारतविरोधी संघटनांची बांगलादेशीवर नजर आहे. तसेच सरकारी आणि संरक्षणविषयक कंपन्यांना सतर्क राहण्याचे आदेश देण्यात आले असून हॅनी ट्रॅपमध्ये न अडकण्याचा सल्लाही संरक्षण कंपन्यांना सूचना देण्याता आल्या आहेत. यासोबत सर्व कर्मचाऱ्यांची पार्श्वभूमीही तपासण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
पंजाब दहशतवादी कट प्रकरणी बब्बर खालसा इंटरनॅशनल (BKI) शी संबंधित कथित दहशतवादी जतिंदर सिंग उर्फ ज्योती याला NIA ने मुंबईतील मानखुर्ड येथील मेट्रो बांधकाम साइटवरून 8 दिवसांपूर्वी अटक करण्यात आली. आश्चर्याची बाब म्हणजे मुंबई मेट्रोच्या साइटवर काम करण्यापूर्वी त्याने दिल्ली आणि लखनऊ येथील मेट्रो साइटवर क्रेन ऑपरेटर म्हणून काम केले होते.
मविआला अचानक यायला लागला महायुतीचा पुळका; नेत्यांकडून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे तोंडभरुन कौतुक
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, कळंबोलीतील गिल एंटरप्रायझेसच्या मालकाच्या माध्यमातून ही माहिती समोर आली. या प्रकल्पाचा भाग असलेल्या व्यक्तीने जतिंदरच्या कामाचा अनुभव तपासून, त्याने यापूर्वी दिल्ली, लखनऊ आणि घाटकोपर ते वर्सोवा मेट्रो प्रकल्पावर काम केल्याचे उघड केले. त्याने आवश्यक ओळखपत्रे आणि क्रेन ऑपरेटर म्हणून काम केले असल्याचे अनुभवपत्रही सादर केले होते. त्याच्या वागणुकीबद्दल कोणतीही तक्रार नव्हती आणि साइटवरील कोणालाही त्याच्याबद्दल काही संशयास्पद लक्षात आले नाही. तो नेहमीच आपल्या कामाबाबत गंभीर आणि आपल्या कामावर लक्ष केंद्रित करत होता.
एनआयएच्या कारवाईनंतर अहलुवालिया कॉन्ट्रॅक्ट्स (इंडिया) लिमिटेडसोबतचा करार रद्द करण्यात आला आहे. अमरजीत सिंग यांनी पुढे दावा केला की, कळंबोलीत ज्याने ओळख करून दिली, तो आरोपीचा काका असल्याचा आरोप करत होता. आरोपी जतिंदर सिंगला 27 हजार रुपये पगार मिळत होता.
सांगोल्यात लघुशंकेच्या कारणावरून दोन गटात हाणामारी; परस्परविरोधी 13 जणांवर गुन्हा दाखल
मुंबई पोलिसांनी जतिंदर सिंगच्या प्रोफाइलची चौकशी सुरू केली आहे. अमरजीत सिंग यांच्या माहितीनुसार, जतिंदरने 2016 मध्ये दिल्ली मेट्रो आणि लखनऊ मेट्रोमध्ये क्रेन ऑपरेटर म्हणून काम केले होते, तसेच 2008 मध्ये मुंबई मेट्रो प्रकल्पातही काम केले होते. मुंबई पोलिसांच्या तपासात आतापर्यंत त्याच्याशी संबंधित कोणताही गुन्हेगारी इतिहास सापडलेला नाही. तपास यंत्रणा या प्रकरणी त्याच्यासोबत असलेल्या व्यक्तींची आणि मेट्रो कारशेडमध्ये त्याच्याशी राहत असलेल्या लोकांची चौकशी करत आहेत.
NIA ने 23 डिसेंबर रोजी जतिंदर सिंगला बब्बर खालसा इंटरनॅशनल (BKI) शी संबंधित पंजाब दहशतवादी कट प्रकरणात अटक केली. NIA च्या माहितीनुसार, जतिंदर सिंग खलिस्तानी दहशतवादी लखबीर सिंग उर्फ लंडा आणि गँगस्टर बचित्तर सिंग उर्फ पवित्रा बटाला यांचा जवळचा सहकारी आहे. बलजीत सिंग उर्फ राणा भाई या प्रकरणातील दुसऱ्या आरोपीला शस्त्र पुरवण्यात जतिंदरचा सहभाग होता आणि तो जुलैपासून फरार होता.