बार्शीत लाखोंचे ड्रग्स जप्त (फोटो- istockphoto)
बार्शी: बार्शी शहर पोलिसांनी मोठी कारवाई करत गुरुवारी दि. १७ रोजी रात्री साडे अकरा वाजता सुमारे १४ लाख रुपयाच्या ड्रग्जच्या मुद्देमालासह एक पिस्तूल आणि तिघांना अटक केली आहे. शहरात देखील ड्रग्ज सापडल्याने बार्शी शहर पोलीस दल सतर्क झाले आहे. याबाबत संशयितांना बार्शी पोलिसांनी अटक केली असून त्यांच्या ताब्यातून सुमारे १४ लाख रुपयाचा ऐवजही पोलिसांनी जप्त केला आहे.
गुरुवार दि. १७ एप्रिल रोजी रात्री साडेअकराच्या सुमारास परंडा रोड येथील एका हॉटेल समोर एका वाहनात मोठ्या प्रमाणात ड्रग असल्याची माहिती मिळताच पोलिसांनी या ठिकाणी सापळा रचत एक चार चाकी वाहनासह तिघांना ताब्यात घेतले आहे. या तिघांकडून मोठ्या प्रमाणात ड्रग्ज आणि पिस्तूलसह दोन जिवंत काडतूसे ताब्यात घेतले आहेत. याबाबत पोलीस उपनिरीक्षक उमाकांत कुंजीर यांनी गुन्हा दाखल केला आहे. बार्शी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
हसन दहलूज (वय ३७), रा. पल्ला गल्ली परांडा, मेहबूब मोहम्मद शेख (वय १९) (रा. बावची, ता. परंडा) आणि सरफराज उर्फ गोल्डी असलम शेख (वय ३२ वर्षे रा. काझी गल्ली, बार्शी) या तिघांना पोलिसांनी अटक केली आहे. पोलीस उपनिरीक्षक उमाकांत कुंजीर व त्यांच्या पथकाने ही कारवाई केली असून याप्रकरणी एन. डी. पी. एस. कायद्यानुसार शस्त्र कायदा, आणि महाराष्ट्र पोलीस कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. काही दिवसापूर्वी तुळजापूर येथे मोठ्या प्रमाणात ड्रग्ज मिळून आले होते. याबाबत बार्शीच्या घटनेशी संबंध आहे की काय याबाबत पोलीस अधिक्षक अतुल कुलकर्णी, उपाधीक्षक जालिंदर नालकुल यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक बालाजी कुकडे तपास करीत आहेत. पुण्यात मध्यवर्ती भागात ड्रग्स जप्त पुण्याच्या मध्यभागातून एका सराईताला पकडून पुणे पोलिसांनी नंतरच्या तपासातून एक आंतरराष्ट्रीय ड्रग्ज रॅकेट उघड केलेले असताना आता नाना पेठेतून मॅफेड्रॉन (एमडी) हा अमली पदार्थ विकण्यास आलेल्या दोघांना गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने पकडले. छापेमारीत त्यांच्याकडून तब्बल ११ लाख ४० हजारांचे एमडीसह इतर असा १३ लाख ४२ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
Pune Crime: पुणे पोलिसांची धडक कारवाई; मध्यवर्ती भागातून 11 लाखांचे मॅफेड्रॉन जप्त
अदीब बशीर शेख (२९, रा. नाना पेठ), यासीर हशीर सय्यद (३०, रा. कोंढवा) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. शहरात ड्रग्ज सप्लायरचे जाळे मोठ्याप्रमाणात वाढले आहे. या सप्लायरवर पुणे पोलिसांची नजर असली तरी ग्राहकांपर्यंत ड्रग्ज पोहच होत असल्याचेही दिसून आलेले आहे. यापार्श्वभूमीवर अंमली पदार्थ विरोधी पथकाचे पोलीस निरीक्षक सुदर्शन गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पथक हद्दीत गस्त व पेट्रोलिंग करत होते. त्यादरम्यान नाना पेठ भागात दोघेजण थांबले असून त्यांच्याकडे एमडी असल्याची माहिती पथकाला मिळाली.
यानूसार, पथकाने परिसरात सापळा रचला. तसेच, संशयित दोघे दिसताच पथकाने शेख, आणि सय्यद या दोघांना ताब्यात घेतले. त्यांची झडती घेतली असता एमडी आढळून आले. दोघांवर समर्थ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक सुदर्शन गायकवाड, सहायक निरीक्षक नितीनकुमार नाईक, अंमलदार आझाद पाटील, मयूर सुर्यवंशी, साहिल शेख यांच्यासह पथकाने ही कामगिरी केली.