फोटो सौजन्य: Freepik
पिढ्यानपिढ्या सात भाऊ आणि एका बहिणीची कथा तुम्ही तुमच्या आई-वडिलांकडून किंवा पूर्वजांकडून ऐकली असेल. पण, नुकतीच गाझियाबादमध्ये 7 बहिणींसह एका भावाची ही कहाणी एकूण तुमचे हृदय तुटून जाईल. गेल्या काही दिवसांपासून या परिसरात ही प्रेमकथा चर्चेत आहे. गाझियाबादच्या अस्तौली गावातील 20 वर्षांचा कमल दानकौर पिपळका गावातील एका मुलीच्या प्रेमात पडला होता.
मुलीने सुद्धा त्याच्या प्रेमाला होकार दिला होता. याच कारणावरून मुलीच्या घरच्यांचा या नात्याला विरोध होता. गेल्या मंगळवारी कमलला त्याच्या प्रेयसीने आपल्या घरी बोलावले. पुढे नियतीने कमलच्या वाट्याला काय वाढून ठेवले होते हे जर कमलला आधीच माहीत असते तर कमल तिला भेटायला गेला नसता. पण ठरल्याप्रमाणे कमल त्याच्या मित्रासह लगेचच मैत्रिणीला भेटायला गेला. कमल पिपळका गावात पोहोचताच त्याच्या मैत्रिणीच्या कुटुंबीयांनी त्याच्यावर हल्ला केला. विशेष म्हणजे हल्ल्यादरम्यान ती मुलगी तेथून गायब झाली होती.
कमल आणि त्याचा मित्र जेव्हा त्याच्या प्रेयसीच्या घरी पोहचले तेव्हा तिच्या घरच्यांनी त्यांना बेदम मारहाण केली. या घटने नंतर गावातील कोणाच्या तरी माहितीवरून कुटुंबीयांना माहिती देण्यात आली. यानंतर कुटुंबीयांनी दोघांनाही कोतवाली पोलिस स्टेशनात आणले. त्यानंतर पोलिसांनी दोन्ही जखमींना रुग्णालयात दाखल केले. डॉक्टरांनी सर्व प्रयत्न करूनही कमलला वाचवता आले नाही. तर, कमलचा मित्र अजूनही जीवन आणि मृत्यू यांच्यात संघर्ष करत आहे. या घटनेनंतर कमलच्या सातही बहिणींची रडून रडून स्थिती वाईट झाली आहे.
गावकऱ्यांचे म्हणणे आहे की, त्यांनी सायंकाळी पाच वाजता कमलला कोतवालीत आणले होते. नंतर अनेक हॉस्पिटलमध्ये वारंवार भेट दिल्यामुळे त्यांचे प्राण वाचू शकले नाहीत. दरम्यान, गाझियाबाद पोलिसांनी कमालचा चुलत भाऊ तहरीरविरुद्ध एफआयआर नोंदवला आहे. यामध्ये 6 जणांची नावे असून, 6 अनोळखी लोकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी पोलिसांनी तीन आरोपीना अटक करून तुरुंगात पाठवले आहे.
गाझियाबाद पोलीस कमलच्या प्रेयसीचे कॉल हिस्ट्री तपासत आहेत की, कमल निमंत्रण न देता गावी पोहोचला की प्रेयसीने त्याला फोन करून कॉल केला?. पोलीस कमल आणि त्याच्या मित्राच्या कॉल डिटेल्सचीही चौकशी करत आहेत. दुसरीकडे, कमलच्या कुटुंबीयांचे म्हणणे आहे की, ही घटना सुनियोजित पद्धतीने घडवून आणली गेली, ज्यामध्ये गावातील अनेक मुलेही सहभागी होती.