काय घडलं नेमकं?
दीपक भास्कर वाव्हळे (वय 26) हा देखील पोलीस होण्यासाठी भरती प्रक्रियेत सहभागी झाला. त्याचा पोलीस भरतीसाठीचा पहिलाच प्रयत्न होता. त्याचा बुधवारी दुपारी सुमारे 12.55 वाजता दीपकने प्रचंड जिद्द, आत्मविश्वास आणि मेहनतीच्या जोरावर 1600 मीटर धावण्याची चाचणी यशस्वीपणे पूर्ण केली. तो या स्पर्धेत प्रथम क्रमांकावर आला होता. मात्र काही वेळातच त्याच्यावर काळाने घात केला.
हृदयविकाराचा तीव्र झटका आला आणि…
धावण्याची चाचणी पूर्ण केल्यानंतर काही वेळातच दीपकला हृदयविकाराचा तीव्र झटका आला. उपस्थितांनी तातडीने त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले, मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. या घटनेमुळे पोलीस भरतीच्या मैदानावर एकच गोंधळ उडाला आणि उमेदवारांसह उपस्थितांचे डोळे पाणावले.
पुण्यात रिक्षा चालवून उदरनिर्वाह
दीपक हा बीड जिल्ह्यातील परळी तालुक्यातील मांडखेल येथील रहिवासी होता. तो आपल्या कुटुंबाती सर्वात मोठा मुलगा होता. तो पुण्यात राहून रिक्षा चालवून उदरनिर्वाह करत होता. तो दोन महिन्यापासून गावी येऊन नियमित सराव करत होता. दिपकचे वडील ऊसतोडणी ट्रॅक्टर मजूर म्हणून काम करतात तर आई शेतमजुरी करून कुटुंब चालवते. एकुलत्या लेकाच्या अकाली मृत्यूने आई-वडिलांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून, मांडखेल परिसरात शोककळा पसरली आहे.
Ans: बीड जिल्ह्यात सुरू असलेल्या पोलीस भरती मैदानावर.
Ans: दीपक भास्कर वाव्हळे (वय 26), परळी तालुक्यातील मांडखेलचा रहिवासी.
Ans: 1600 मीटर धाव जिंकल्यानंतर काही वेळातच त्याला हृदयविकाराचा झटका आला.






