Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 17 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Bhandara Crime: भंडारा हादरला! मद्यपी मुलाने दिव्यांग वडिलांवर फावड्याने केले सपासप वार; आरोपी अटकेत

भंडारा जिल्ह्यातील खरबी येथे दारूच्या नशेत असलेल्या 27 वर्षीय मुलाने घरगुती वादातून आपल्या 65 वर्षीय दिव्यांग वडिलांवर फावड्याने हल्ला करून त्यांची हत्या केली. वाद सोडवण्यासाठी आलेल्या 15 वर्षीय नातेवाईकालाही त्याने जखमी केले. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: May 31, 2026 | 09:42 AM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Follow Us:
  • घरगुती वादातून मद्यपी मुलाने दिव्यांग वडिलांची फावड्याने हत्या केली.
  • मध्यस्थी करण्यासाठी आलेल्या 15 वर्षीय नातेवाईकावरही हल्ला; तो गंभीर जखमी.
  • मोहाडी पोलिसांनी आरोपी गणेश उर्फ सोनु बावणे याला अटक केली.
भंडारा: भंडारा जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. घरगुती वादातून एका मद्यपी मुलाने आपल्याच दिव्यांग वडिलांवर फावड्याने सपासपवार करत हत्या केल्याचे समोर आले आहे. ही थरारक घटना भंडारा जिल्ह्यातील तुमसर तालुक्यातील खरबी येथे घडली. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे.

काय घडलं नेमकं?

तुकडु बावणे (वय 65) असे मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. तुकडू बावणे हे दिव्यांग होते. त्यांचा २७ वर्षीय मुलगा गणेश उर्फ सोनू बावणे याला दारूचे व्यसन होते. घटनेच्या दिवशी आरोपी मुलगा गणेश आणि वडिलांमध्ये कोणत्यातरी कारणावरून जोरदार वाद झाला. दारूच्या नशेत धुंद असलेल्या गणेशचा राग अनावर झाला आणि त्याने घरात असलेल्या फावड्याने आपल्या दिव्यांग वडिलांवर थेट हल्ला चढवला. या जीवघेण्या हल्ल्यात ते गंभीर जखमी झाले आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला.

Mumbai Crime: लिव्ह-इनमध्ये ठेवून शारीरिक शोषण, दोनदा गर्भपात, धर्मांतरासाठी दबाव; तरुणीच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल

या वादात मध्यस्थी करणाऱ्या १५ वर्षीय नातेवाईक आर्यन बावणे हा मध्यस्थी करण्यासाठी धावला. मात्र नशेत त्याने आर्यनवरही फावड्याने हल्ला केला. या हल्ल्यात आर्यन गंभीर जखमी झाला आहे. त्याला तातडीने उपचारासाठी तुमसर येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, सध्या त्याच्यावर उपचार सुरू आहेत.

आरोपी ताब्यात

पोलिसांना या घटनेची माहिती मिळताच मोहाडी पोलिसांनी तातडीने आरोपी मुलगा गणेश उर्फ सोनु बावणे (वय 27) याला अटक केली. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कौटुंबिक वादातून आणि दारूच्या व्यसनापायी पोटच्या मुलानं वडिलांचा जीव घेतल्याने खरबी गावासह संपूर्ण भंडारा जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.

संतापजनक! अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून अश्लील व्हिडिओ केले व्हायरल; आरोपी नात्यातील

भंडारा जिल्ह्यातून एक अत्यंत संताप जनक बातमी आणि नात्याला काळिमा फासणारी घटना समोर आली आहे. एका सोळा वर्षे अल्पवयीन मुलीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून तिच्यावर बळजबरीने अत्याचार करण्यात आल्याचे समोर आले आहे. एवढेच नाही तर नराधम आरोपी याने तिचे अश्लील व्हिडिओ बनवून ते पिढी तिच्या कुटुंबीयाच्या मोबाईलवर वायरल केल्याचे देखील केले आहे. विशेष म्हणजे आरोपी हा तिच्या नात्यातीलच असल्याचे समोर आले आहे. या घटनेने खळबळ उडाली असून संताप व्यक्त केला जात आहे. या घटनेने पुन्हा एकदा महिलेच्या आणि मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

Pavai Crime: पित्याचा क्रूर चेहरा! ४ वर्षीय चिमुकला दुधासाठी रडला आणि जन्मदात्या पित्याने भिंतीवर आपटला

💡

Frequently Asked Questions

  • Que: मृत व्यक्तीचे नाव काय होते?

    Ans: मृत व्यक्तीचे नाव तुकडु बावणे (वय 65) असे होते.

  • Que: हत्येचे कारण काय होते?

    Ans: घरगुती वाद आणि आरोपीच्या दारूच्या व्यसनामुळे हा प्रकार घडल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे.

  • Que: या घटनेत आणखी कोण जखमी झाला?

    Ans: वाद मिटवण्यासाठी आलेला 15 वर्षीय आर्यन बावणे याच्यावरही फावड्याने हल्ला करण्यात आला असून तो जखमी झाला आहे.

Web Title: Bhandara crime bhandara hadarla madhyapi mulane disabled elder fawdyane banana sapsap vaar accused atket

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 31, 2026 | 09:42 AM

Topics:  

  • Bhandara
  • Bhandara crime
  • crime

संबंधित बातम्या

Bhandara News: शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! २२ ऑक्टोबरपासून देशभरात ‘खेत बचाओ अभियान, केंद्र सरकारची नवी मोहीम
1

Bhandara News: शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! २२ ऑक्टोबरपासून देशभरात ‘खेत बचाओ अभियान, केंद्र सरकारची नवी मोहीम

Malegaon rape case: आधी बलात्कार, नंतर डोकं ठेचून…; मालेगाव अत्याचार-हत्याप्रकरणी मोठी अपडेट समोर, आरोपीला सुनावली फाशीची शिक्षा
2

Malegaon rape case: आधी बलात्कार, नंतर डोकं ठेचून…; मालेगाव अत्याचार-हत्याप्रकरणी मोठी अपडेट समोर, आरोपीला सुनावली फाशीची शिक्षा

Illegal Liquor Transport: परराज्यातील अवैध मद्य वाहतुकीवर राज्य उत्पादन शुल्क विभागाचा दणका! एकास अटक, १.३० लाखांचा मुद्देमाल जप्त
3

Illegal Liquor Transport: परराज्यातील अवैध मद्य वाहतुकीवर राज्य उत्पादन शुल्क विभागाचा दणका! एकास अटक, १.३० लाखांचा मुद्देमाल जप्त

पत्नीला वाचवण्याच्या प्रयत्नात पतीचाही जीव गेला; पवनीतील हृदयद्रावक घटना
4

पत्नीला वाचवण्याच्या प्रयत्नात पतीचाही जीव गेला; पवनीतील हृदयद्रावक घटना

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.