Photo Credit- Social Media Drunk youths riot in Pune – obscene behavior in public places
पुणे: पुण्यातील शास्त्रीनगर चौकात (पुणे नगर रोड) एका मद्यधुंद तरुण आणि त्याच्या मित्राने भरधाव गाडी चालवत महिलांसमोर अश्लील वर्तन केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. विशेष म्हणजे ही घटना जागतिक महिला दिनाच्या दिवशीच घडल्याने ती अधिक गंभीर मानली जात आहे.
शनिवारी सकाळी एका मद्यधुंद तरुणाला शास्त्रीनगर चौकात रस्त्यावर लघुशंका करताना नागरिकांनी अडवलं. मात्र, त्याने गाडीमध्ये बसून अडवणाऱ्या व्यक्तीला उद्देशून अश्लील हावभाव केले. त्यानंतर, गाडी भरधाव वेगात चालवत बेदरकारपणे पुढे गेला. दारू पिऊन गाडी चालवत असताना या तरुणाने आणि त्याच्या मित्राने महिलांसमोरही अश्लील वर्तन केल्याने नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.
व्यापाऱ्याच्या अपहरणाचा ‘तो’ बनावच, स्वत:हून पोलीस ठाण्यात हजर; नेमकं काय घडलं?
चालक आणि त्याचा मित्र बीएमडब्ल्यू गाडीतून वाघोलीच्या दिशेने भरधाव वेगाने पसार झाले. दारूच्या नशेत असलेल्या या तरुणांकडून मोठा अपघात घडण्याची शक्यता होती, त्यामुळे शहरातील नागरिक अधिकच संतप्त झाले आहेत.
या घटनेनंतर शहरातील महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. सार्वजनिक ठिकाणी अशा प्रकारच्या वर्तनाला वचक बसवण्यासाठी कठोर कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे.
यवतमाळच्या पुसदमध्ये उधारीचे पैसे मागणाऱ्याला जबर मारहाण
या प्रकारानंतर पोलिसांनी तातडीने संबंधित आरोपींचा शोध घेऊन कठोर कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.
हे गंभीर गुन्हे असून, पोलिसांनी त्वरीत तपास करून आरोपींना अटक करावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.