Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 2 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

राज्यात लाचखोरीचे सत्र सुरूच;भंडारा व परभणीत पोलिसांसह उच्च अधिकाऱ्यांना लाच घेताना अटक; एसीबीची कारवाई

पोलिसांपासून ते प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांपर्यंत अनेकजण एसीबीच्या जाळ्यात सापडले आहेत. आता भंडारा आणि परभणीमध्ये लाच घेतांना सह पोलीस निरीक्षक आणि २ पोलीस कर्मचाऱ्यांवर एसीबीने कारवाई केली आहे.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Jun 18, 2025 | 07:43 AM
crime (फोटो सौजन्य : social media)

crime (फोटो सौजन्य : social media)

Follow Us
Follow Us:

राज्यभरात भ्रष्टाचाराविरोधात लाचलुचपत प्रतिबंधक विभाग (ACB) धडक कारवाया करत असून, एकामागून एक धक्कादायक प्रकरणे समोर येत आहेत. पोलिसांपासून ते प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांपर्यंत अनेकजण एसीबीच्या जाळ्यात सापडले आहेत. आता भंडारा आणि परभणीमध्ये लाच घेतांना सह पोलीस निरीक्षक आणि २ पोलीस कर्मचाऱ्यांवर एसीबीने कारवाई केली आहे.

दागिने घ्यायचे म्हणून आल्या अन् सोन्याची अंगठी घेऊन…

पोलिस नायकाला लाच घेतांना रंगेहात अटक
भंडाऱ्यात पवनी पोलीस ठाण्याचे पोलिस नायक अजित वाहने (वय 37) यांनी तडीपारी अथवा अन्य प्रतिबंधात्मक कारवाई न करण्यासाठी एका फिर्यादीकडून 10 हजार रुपयांची लाच मागितल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. संबंधित नागरिकाने थेट लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे (ACB) तक्रार केली होती. एसीबीने दोन दिवस पडताळणी केल्यानंतर सापळा रचून अजित वाहने यांना पंचासमक्ष लाच स्वीकारण्याची तयारी दर्शवतांना रंगेहात पकडलं. त्यांच्याविरुद्ध पवनी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे.

परभणीत पोलिस ठाण्यातच लाचखोरी
परभणी जिल्ह्यातील पालम पोलिस ठाण्यात आणखी एक गंभीर प्रकार समोर आला आहे. एका प्रकरणात तक्रारदाराकडून 10 हजार रुपयांची लाच घेताना पालम पोलिस स्टेशनचे सहपोलीस निरीक्षक व दोन पोलिस कर्मचाऱ्यांना अटक करण्यात आली आहे. ही कारवाई परभणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केली. या प्रकरणातही सापळा रचून आरोपींना रंगेहात पकडण्यात आलं असून, तिघांवरही गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

लाच घेतांना उपजिल्हाधिकाऱ्यास अटक

काही दिवसांपूर्वी छत्रपती संभाजीनगरमध्ये एक खळबळजनक प्रकार उघडकीस आला. उपजिल्हाधिकाऱ्यांनी शेतजमिनीच्या प्रकरणात तब्बल 41 लाखांची लाच मागितली होती. त्यापैकी 23 लाख रुपये आधीच स्वीकारले गेले होते, आणि उर्वरित 18 लाखांसाठी तक्रारदाराकडून आग्रह होत होता. तक्रारदाराने अखेर एसीबीकडे धाव घेतली.सापळा रचून उपजिल्हाधिकारी विनोद खिरोळकर यांना 5 लाखांची लाच घेताना रंगेहात पकडण्यात आले. यामुळे प्रशासनात खळबळ उडाली होती.

महापालिकेचे उपायुक्त 7 लाखांच्या लाचप्रकरणी अडचणीत

सांगली महापालिकेच्या उपायुक्त वैभव साबळे यांनी एका 24 मजली इमारतीच्या परवान्यासाठी थेट 10 लाखांची लाच मागितली. तडजोडीनंतर 7 लाख रुपये देण्यावर करार झाला. यावर तक्रारदाराने एसीबीकडे तक्रार दिली.सापळ्यानंतर उपायुक्त वैभव साबळे यांनी 7 लाखांची लाच मागितल्याचे स्पष्ट झाल्याने, विश्रामबाग पोलीस ठाण्यात त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

मोठी बातमी! २० वर्षीय मुलीवर १० जणांनी केला आळीपाळीने बलात्कार; अटक झालेल्यामधे ४ अल्पवयीन

Web Title: Bribery season continues in the state police and high officials arrested while taking bribe in bhandara and parbhani acb takes action

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 18, 2025 | 07:35 AM

Topics:  

  • ACB
  • Bhandara
  • crime
  • Parbhani

संबंधित बातम्या

Vasai News: वसईत अघोरी कृत्याचा संशय! निर्जनस्थळी पूजेचे साहित्य अन् सुकलेल्या पानावर व्यक्तीचे नाव, स्थानिकांमध्ये भीती
1

Vasai News: वसईत अघोरी कृत्याचा संशय! निर्जनस्थळी पूजेचे साहित्य अन् सुकलेल्या पानावर व्यक्तीचे नाव, स्थानिकांमध्ये भीती

Kalyan Crime: कुख्यात ड्रग्स तस्कर अमजद पठाणच्या मुलाची कल्याणमध्ये दहशत? विद्यार्थ्यावर तलवारीने जीवघेणा हल्ला
2

Kalyan Crime: कुख्यात ड्रग्स तस्कर अमजद पठाणच्या मुलाची कल्याणमध्ये दहशत? विद्यार्थ्यावर तलवारीने जीवघेणा हल्ला

परभणीच्या विकासाची चिंता करू नका, महायुती सरकार पाठीशी’; एकनाथ शिंदेंचा संजय जाधवांना शब्द
3

परभणीच्या विकासाची चिंता करू नका, महायुती सरकार पाठीशी’; एकनाथ शिंदेंचा संजय जाधवांना शब्द

Navi Mumbai Crime: पहाटे मिनी सी-शोअरमध्ये रक्तरंजित थरार, 19 वर्षीय तरुणाची निर्घृण हत्या; डोक्यात कोयत्याने वार
4

Navi Mumbai Crime: पहाटे मिनी सी-शोअरमध्ये रक्तरंजित थरार, 19 वर्षीय तरुणाची निर्घृण हत्या; डोक्यात कोयत्याने वार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.