नागपूरमधील दंगलखोरांवर कठोर कारवाई करुन योग्य शिक्षा देणे गरजेचे आहे (फोटो - सोशल मीडिया)
नागपूर: नागपूरच्या महाल परिसरात सोमवारी (17 मार्च) हिंसाचार भडकला होता. दगडफेक आणि जाळपोळीच्या घटनांमुळे शहरात तणावाचे वातावरण निर्माण झाले. पोलिसांनी कारवाई करत अनेकांना ताब्यात घेतले. या घटनेच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पोलीस आयुक्त आणि अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत आज नागपूरमध्ये भेट देऊन कायदा-सुव्यवस्थेचा आढावा घेतला. या बैठकीनंतर देवेंद्र फडणवीस यांनीदेखील दंगलखोरांना इशारा दिला आहे. नागपूरमध्ये उसळलेल्या दंगलीप्रकरणी कठोर भूमिका घेतली आहे. त्यांनी स्पष्ट शब्दांत दंगलखोरांविरोधात कडक कारवाईचा इशारा दिला असून, कोणालाही सोडले जाणार नाही, असे त्यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. आवश्यक ठिकाणी बुलडोझर वापरण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला.
नागपुरात आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले, नागपुरात दंगलखोरांनी ज्या प्रकारे हिंसाचार भडकावला, ते पाहता एक उच्च स्तरीय आढवा बैठक घेण्यात आली. एकूण घटनाक्रम आणि त्यानंतर केलेली कारवाई, याचा आढावा घेण्यात आला. औरंगजेबाची प्रतिकात्मक कबर जाळण्यात आली. पण कबर जाळत अशताना कुराणची आयत असलेली चादर जाळण्यात आली, अशी अफवा पसरवण्यात आली. त्यानंतर संध्याकाळी मोठ्या प्रमाणात जमाव जमवण्यात आला. त्या दंगलखोरांनी जाळपोळ केली, दगडफेक केली.लोकांवर हल्ले केले. पण पोलिसांनी चार-पाच तासतचं दंगल नियंत्रणात आणली.
Devendra Fadnavis Press: दंगलीनंतर पंतप्रधान मोदी नागपूरला येणार का? CM फडणवीस म्हणाले,
या घटनेचे जेवढे सीसीटिव्ही फुटेज, खासगी लोकांनी पुरवलेले व्हिडीओज, पत्रकारांकडून मिळालेले चित्रीकरण मिळाले आहे. या चित्रीकरणात जे दंगेखोर दिसत आहेत. त्यांच्या अटकेची कारवाई सुरू झाली आहे. १०४ जणांची आतापर्यंत ओळख पटवण्यात आली आहे. त्यातील १२ लोकांना अटक कऱण्यात आली आहे. तर इतर जण अल्पवयीन असल्यामुळे त्यांच्यावर कायदेशीर कारवाई कऱण्यात आली आहे.
देवेंद्र फडणवीस म्हणाले, ‘यापेक्षाही जास्त लोकांना अटक करण्यात येणार आहे. जोजो दंगा करताना दिसत आहे. त्या प्रत्येकावर कारवाई होणार आहे. यासोबतच सोशल मीडियाच्या माध्यमातून या घटनेला हवा दिलीत्या सर्वांनाही सह आरोपी बनवल जाणार आहे. त्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून हा दंगा भडकवला आहे, त्यांच्यावरही कारवाई होणार आहे. अशा जवळपास ६८ पोस्ट ओळखण्यात आल्या आहेत.
ज्यांनी ज्यांनी गाड्या फोडल्या, जाळपोळ केली आहे, सार्वजनित मालमत्तेचे नुकसान झाले आहे. त्या सर्वांना येत्या तीन-चार दिवसात नुकसान भरपाई दिली जाईल. तसेच, नागपुरातील निर्बंधामध्ये शिथिलता आणण्यातत येईल. आता जे काही नुकसान झाले आहे ते दंगेखोरांकडून वसूल करण्यात येईल. नुकसानीची सर्व किंमत काढली जाईल आणि ते दंगेखोरांकडून वसू ल केलं जाईल. त्यांनी ते पैसे भरले नाही तर त्यांची संपत्तीही विकली जाईल, असा कठोर भूमिका देवेंद्र फडणवीस यांनी घेतली आहे. दंगेखोरांची दंगाई पोलीस सहन करणार नाहीत.असंही त्यांनी म्हटलं आहे.