Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 2 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

बारामतीत भोंदू मौलानावर विनयभंग आणि जादूटोणा विरोधी कायद्यांतर्गत गुन्हा! महिलांची फसवणूक करून आरोपी काश्मीरला फरार

बारामतीत अंधश्रद्धा, काळी विद्या आणि तांत्रिक उपायांच्या नावाखाली महिलांची आर्थिक फसवणूक व विनयभंग करणाऱ्या भोंदू मौलाना अब्दुल हलीम शेखविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी सध्या काश्मीरमध्ये फरार असून पोलीस शोध घेत आहेत.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: May 28, 2026 | 06:05 PM
बारामतीत भोंदू मौलानावर विनयभंग आणि जादूटोणा विरोधी कायद्यांतर्गत गुन्हा!

बारामतीत भोंदू मौलानावर विनयभंग आणि जादूटोणा विरोधी कायद्यांतर्गत गुन्हा!

Follow Us
Follow Us:

 

  • बारामतीत भोंदू मौलानावर विनयभंग आणि जादूटोणा विरोधी कायद्यांतर्गत गुन्हा!
  • महिलांची फसवणूक करून आरोपी काश्मीरला फरार
बारामती: प्रतिनिधी: अंधश्रद्धा, खोटे धार्मिक व तांत्रिक उपाय, काळी विद्या दूर करण्याचे आमिष, आर्थिक फसवणूक, महिलेशी गैरवर्तन, विनयभंगाचा प्रयत्न व धमकी दिल्याप्रकरणी मौलाना अब्दुल हलीम शेख व त्याच्या सहकाऱ्यांविरुद्ध गंभीर स्वरूपाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सदर बाबत बारामती शहर पोलीस स्टेशन येथे भारतीय न्याय संहिता कलम ३१६, ३१८(४), ३५१(२), ७४, ७५, ३(५) तसेच महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष, अनिष्ट व अघोरी प्रथा व काळी जादू प्रतिबंध व निर्मूलन अधिनियम २०१३ चे कलम ३ व ४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.

फिर्यादी महिलेने दिलेल्या माहितीनुसार आरोपी अब्दुल हलीम शेख हा स्वतःस मौलाना, धार्मिक व तांत्रिक उपाय करणारा, काळी विद्या दूर करणारा तसेच लोकांच्या घरगुती, कौटुंबिक, आर्थिक व व्यावसायिक अडचणी दूर करणारा असल्याचे सांगून नागरिकांचा विश्वास संपादन करत होता. आरोपी हा “दरबार” भरवून तथाकथित धार्मिक व तांत्रिक उपायांच्या नावाखाली लोकांमध्ये भीती निर्माण करून आर्थिक लाभ घेत असल्याचे तपासात समोर येत आहे.

फिर्यादी महिलेकडून आरोपी व त्याच्या संबंधित व्यक्तींनी विविध वेळेस रोख रक्कम, चेक तसेच ऑनलाईन व्यवहाराद्वारे मोठ्या प्रमाणात रक्कम घेतल्याचे निष्पन्न झाले असून त्याबाबतचे फोन पे/युपीआय व्यवहार, व्हॉट्स ॲप चॅट, मोबाईल कॉल तपशील तसेच इतर इलेक्ट्रॉनिक पुरावे बारामती शहर पोलिसांकडे उपलब्ध झाले आहेत.

तसेच आरोपीने तथाकथित तांत्रिक उपाय करण्याच्या कारणावरून फिर्यादी महिलेस रात्री-अपरात्री बोलावून तिच्याशी गैरवर्तन करून विनयभंग करण्याचा प्रयत्न केल्याचे फिर्यादीमध्ये नमूद करण्यात आले आहे. आरोपीने “काळी विद्या करेन”, “वाईट परिणाम होतील”, “तुझ्या कुटुंबाला त्रास होईल” अशा प्रकारच्या धमक्या देऊन महिलेमध्ये भीती निर्माण केल्याचे देखील समोर आले आहे.

Sangli Crime: ‘तुला मुलगा होत नाही’ म्हणत टोमणे, मारहाण आणि छळ, तब्ब्ल ११ वर्ष विवाहितेने केलं सहन; तामिळनाडूत संशयास्पद मृत्यू

सदर गुन्ह्याचा तपास पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल्ल, अपर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार, उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. सुदर्शन राठोड तसेच प्रभारी पोलीस निरीक्षक श्रीशैल चिवडशेट्टी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार ज्ञानेश्वर जाधव करीत आहेत.

दरम्यान आरोपीस गुन्हा दाखल होणार असल्याची माहिती मिळाल्यानंतर आरोपी हा गुन्हा दाखल होण्यापूर्वीच काश्मीर येथे पळून गेल्याची माहिती सूत्रांकडून प्राप्त झाली असून त्याचा सर्वतोपरी तांत्रिक तपास सुरू आहे. आरोपीचा मोबाईल लोकेशन, कॉल डिटेल्स, आर्थिक व्यवहार तसेच इतर इलेक्ट्रॉनिक पुराव्यांच्या आधारे बारामती शहर पोलीसांकडून सखोल तपास करण्यात येत आहे.तसेच आरोपीस अटक केल्यानंतर त्याने इतर कोणत्या महिलांसोबत अशाच प्रकारे अंधश्रद्धा, तांत्रिक उपाय, आर्थिक फसवणूक, धमकी किंवा गैरवर्तन केले आहे काय याबाबत देखील बारामती शहर पोलीसांकडून सखोल तपास करण्यात येणार आहे.

बारामती शहर पोलीस स्टेशन हद्दीमध्ये अन्य कोणत्याही महिला किंवा नागरिकांची अशाच प्रकारे अंधश्रद्धा, काळी विद्या, तांत्रिक उपाय, धार्मिक भीती, संकट निवारण, आर्थिक फसवणूक किंवा मानसिक छळ करून फसवणूक झाली असल्यास त्यांनी बारामती शहर पोलीस स्टेशन येथे प्रत्यक्ष हजर राहून माहिती द्यावी, असे आवाहन बारामती शहर पोलीसांकडून करण्यात येत आहे. संबंधित नागरिकांनी दिलेली माहिती पूर्णपणे गोपनीय ठेवण्यात येईल, याची खात्री देखील पोलीस प्रशासनाकडून देण्यात येत आहे.

“सध्याच्या डिजिटल युगात सोशल मीडिया, ऑनलाईन व्यवहार आणि धार्मिक उपायांच्या नावाखाली फसवणूक करण्याचे प्रकार वाढत आहेत. नागरिकांनी अशा कोणत्याही भोंदूगिरी, अंधश्रद्धा किंवा खोट्या आश्वासनांना बळी पडू नये.” — श्रीशैल चिवडशेट्टी (प्रभारी पोलीस निरीक्षक, बारामती शहर पोलीस स्टेशन)

Pune Crime: त्याने वापर करून सोडलं’…, मेसेजनंतर आयटी तरुणीची मुठा नदीत उडी मारून आत्महत्या

Web Title: Case registered against fraudulent maulana in baramati under outraging modesty and anti superstition laws

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 28, 2026 | 06:05 PM

Topics:  

  • baramati
  • Baramati Crime
  • crime news

संबंधित बातम्या

जन्मदात्या आईला मुलाने केली बेदम मारहाण; हातातील कड्याने मारल्याने पडले टाके
1

जन्मदात्या आईला मुलाने केली बेदम मारहाण; हातातील कड्याने मारल्याने पडले टाके

बाह्यवळण मार्गावर कारचालकाला लुटले; वाद घालण्याचा बहाणा करून दीड लाखांचा ऐवज लंपास
2

बाह्यवळण मार्गावर कारचालकाला लुटले; वाद घालण्याचा बहाणा करून दीड लाखांचा ऐवज लंपास

मतदार यादीत दुरुस्तीच्या बतावणीने ज्येष्ठाची फसवणूक; तब्बल लाखो रुपयांना घातला गंडा
3

मतदार यादीत दुरुस्तीच्या बतावणीने ज्येष्ठाची फसवणूक; तब्बल लाखो रुपयांना घातला गंडा

मावळमध्ये खळबळ! पोलीस भरती प्रशिक्षणासाठी आलेल्या तरुणीवर अत्याचार; घरी नेले अन्…
4

मावळमध्ये खळबळ! पोलीस भरती प्रशिक्षणासाठी आलेल्या तरुणीवर अत्याचार; घरी नेले अन्…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.