Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 17 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Chandrapur Crime: व्हॉट्सॲपवर ब्लॉक केल्याचा राग; ‘सरप्राइज गिफ्ट’च्या बहाण्याने प्रेयसीचा गळा चिरून खून

चंद्रपूर जिल्ह्यात व्हॉट्सॲपवर ब्लॉक केल्याच्या रागातून एका प्रियकराने आपल्या प्रेयसीची निर्घृण हत्या केली. 'सरप्राइज गिफ्ट' देण्याचे आमिष दाखवत त्याने तिच्या डोळ्यांवर पट्टी बांधली आणि धारदार चाकूने गळा चिरून खून केला. पोलिसांनी तांत्रिक तपासाच्या मदतीने आरोपीला तेलंगणातून अटक केली.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Jun 01, 2026 | 03:06 PM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Follow Us:
  • व्हॉट्सॲपवर ब्लॉक केल्याने आणि दुसऱ्या प्रेमसंबंधाच्या संशयातून आरोपी संतप्त होता.
  • ‘सरप्राइज गिफ्ट’च्या बहाण्याने डोळ्यांवर पट्टी बांधून प्रेयसीची हत्या करण्यात आली.
  • तांत्रिक तपास आणि CDRच्या मदतीने पोलिसांनी आरोपीला तेलंगणातून अटक केली.
चंद्रपूर: चंद्रपूर येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. व्हॉट्सॲपवर ब्लॉक केल्याच्या रागातून एका नराधम प्रियकराने आपल्या प्रेयसीची अत्यंत निर्घृणपणे हत्या केली आहे. सरप्राईज गिफ्ट देण्याच्या बहाण्याने प्रेयसीच्या डोळ्यांवर पट्टी बांधली आणि धारधार चाकूने तिचा गळा चिरून हत्या केली. स्थानिक गुन्हे शाखा (LCB) आणि राजुरा पोलिसांनी तेलंगणातून शिताफीने आरोपीला अटक केली आहे. या घटनेने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

काय नेमकं प्रकरण?

आरोपीचे नाव राजेश व्यंकटी अट्टेला (वय 35, रा. रेपनापल्ले, चेन्नूर, तेलंगणा) असे या अटकेतील आरोपीचे नाव आहे. तर शीतल रणधीर कुंभारे असे हत्या झालेल्या तरुणीचे नाव आहे. शीतल आणि राजेश यांचे 2009 पासून प्रेमसंबंध होते. तरुणीचे २०१४ मध्ये लग्न झाले मात्र त्यांचे प्रेमसंबंध सुरु होते. मात्र काही दिवसांपासून त्यांच्यात दुरावा निर्माण झाला होता. शीतलने राजेशला व्हॉट्सॲपवर ब्लॉक केले होते. तिला दुसऱ्या कोणाशी तरी प्रेमसंबंध असल्याचे संशय राजेशला होता, ज्यामुळे तो प्रचंड संतापला होता.

Crime News: छ. संभाजीनगर हादरलं! पोलीस ठाण्याशेजारील मैदानावर १८ वर्षीय तरुणाची चाकूने भोसकून हत्या; जुन्या वादातून रक्तरंजित थरार

कशी केली हत्या

काही दिवसांपूर्वी शीतलने राजेशला पुन्हा अनब्लॉक केले होते. शीतलची आई आणि भाऊ देवदर्शनाला गेल्यामुळे ती आपली लहान मुलगी आणि राजेशसोबत घरी एकटी होती, याचा फायदा घेत 28 मेच्या मध्यरात्री राजेश गुपचूप तिच्या घरी पोहोचला. राजेशने शीतलला तिच्यासाठी नवीन मोबाईल आणि बांगड्यांचे ‘सरप्राइज गिफ्ट’ आणल्याचे सांगून तिला काहीतरी भेटवस्तू मिळणार असल्याची खात्री दिली. अतिशय विश्वासाने शीतलने आपल्या डोळ्यांवर पट्टी बांधू दिली. काटा प्रमाणे त्याने धारदार चाकूने तिचा गळा चिरला. या जीवघेण्या हल्लयात शीतलचा घटनास्थळी मृत्यू झाला. त्यानंतर तिथून तो फरार झाला.

२९ मे च्या सकाळी शीतलचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात आढळून आला. पोलिसांना या घटनेची माहिती देण्यात आली. पोलिसांनी या घटनेच्या तपासाला सुरुवात केली. अत्यंत शिताफीने पोलिसांनी या प्रकरणाचा छडा लावला. तांत्रिक पुराव्यांच्या आधारे राजेशवर संशय बळावल्याने पोलिसांच्या पथकाने तेलंगणा येथे जाऊन त्याला अटक केली, त्याने आपला गुन्हा कबूल केला आहे. आरोपीला पोलिसांनी अटक केली असून त्याच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे/ या घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली आहे.

Chhattisgarh Crime: 70 वर्षीय वडिलांची काठीने ठेचून निर्घृण हत्या, घरात लपवला मृतदेह; छत्तीसगढ येथील घटना

💡

Frequently Asked Questions

  • Que: हत्येमागील मुख्य कारण काय होते?

    Ans: प्रेयसीने व्हॉट्सॲपवर ब्लॉक केल्याचा राग आणि तिचे दुसऱ्या व्यक्तीसोबत संबंध असल्याचा संशय हे प्राथमिक कारण होते.

  • Que: आरोपीने हत्या कशी केली?

    Ans: 'सरप्राइज गिफ्ट' देण्याचे आमिष दाखवून त्याने प्रेयसीच्या डोळ्यांवर पट्टी बांधली आणि धारदार चाकूने तिचा गळा चिरला.

  • Que: आरोपीला कसे पकडण्यात आले?

    Ans: कॉल डिटेल रेकॉर्ड (CDR) आणि तांत्रिक तपासाच्या आधारे पोलिसांनी आरोपीचा माग काढून त्याला तेलंगणातून अटक केली.

Web Title: Chandrapur crime vengeance for being blocked on whatsapp girlfriend murdered by slitting her throat under the pretext of a surprise gift

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 01, 2026 | 03:06 PM

Topics:  

  • Chandrapur
  • Chandrapur Crime
  • crime

संबंधित बातम्या

Chandrapur News: तीन वर्षांपासून पाइपलाइन तयार, तरी शेतकऱ्यांच्या शेतात पाणी नाही; धानपिकांचे नुकसान होण्याची भीती
1

Chandrapur News: तीन वर्षांपासून पाइपलाइन तयार, तरी शेतकऱ्यांच्या शेतात पाणी नाही; धानपिकांचे नुकसान होण्याची भीती

Chandrapur News: महाराष्ट्रात पहिलाच प्रयोग! धूळ-कचऱ्यापासून होणार महामार्गाची सुटका, स्वच्छतेसाठी होणार आधुनिक यंत्राचा वापर
2

Chandrapur News: महाराष्ट्रात पहिलाच प्रयोग! धूळ-कचऱ्यापासून होणार महामार्गाची सुटका, स्वच्छतेसाठी होणार आधुनिक यंत्राचा वापर

Malegaon rape case: आधी बलात्कार, नंतर डोकं ठेचून…; मालेगाव अत्याचार-हत्याप्रकरणी मोठी अपडेट समोर, आरोपीला सुनावली फाशीची शिक्षा
3

Malegaon rape case: आधी बलात्कार, नंतर डोकं ठेचून…; मालेगाव अत्याचार-हत्याप्रकरणी मोठी अपडेट समोर, आरोपीला सुनावली फाशीची शिक्षा

Chandrapur News: मोबाईल-इंटरनेटचा अभाव, तरी व्हिडिओ दाखवण्याची सक्ती; चंद्रपुरात मुख्याध्यापकांना नोटिसा बजावल्याने संघटना नाराज
4

Chandrapur News: मोबाईल-इंटरनेटचा अभाव, तरी व्हिडिओ दाखवण्याची सक्ती; चंद्रपुरात मुख्याध्यापकांना नोटिसा बजावल्याने संघटना नाराज

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.