भरधाव ट्रकने स्कुटीला चिरडले, तिघांचा मृत्यू; संभाजीनगर- गंगापूर रोडवरील धक्कादायक घटना
कशी केली चोरी?
मिळालेल्या माहितीनुसार, फैसल खान हे प्लॉटिंग व्यवसाय करतात. व्यवहारातून आलेली मोठी रोकड बँकेत भरण्यासाठी ते आपल्या नातेवाईकांसोबत फॉर्च्युनर गाडीतून आले होते. त्यांच्याकडे एकूण 30 लाख रुपये होते. यापैकी 10 लाख रुपये त्यांनी बँकेत भरले. मात्र उर्वरित 20 लाख रुपये गाडीतच ठेवले होते.(Chhatrapati Sambhajinagar Crime)
दरम्यान, फैसल खान आणि त्यांचे नातेवाईक बँकेत आरटीजीएस फॉर्म भरण्यासाठी गेले असताना चोरट्यांनी त्यांच्या गाडीवर पाळत ठेवली. गाडीत कोणी नसल्याची खात्री होताच दोन चोरटे स्पोर्ट्स बाईकवरून आले आणि त्यांनी फॉर्च्युनरची काच फोडून 20 लाख रुपयांची रोकड चोरून नेली. गाडीची काच फुटताच सुरक्षा यंत्रणेअंतर्गत असलेला सायरन वाजू लागला. सायरनचा आवाज ऐकून बँकेतील एका महिला कर्मचाऱ्याने बाहेर येत कोणाची गाडी आहे, असा आवाज दिला. त्यानंतर फैसल खान तातडीने बाहेर आले. मात्र, तोपर्यंत चोरटे रोकड घेऊन पसार झाले होते.
या घटनेमुळे फैसल खान यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. चोरट्यांना गाडीत मोठी रोकड असल्याची माहिती कशी मिळाली? त्यांनी आधीपासूनच पाळत ठेवली होती का? याचाही तपास पोलीस करत आहेत. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात येत असून, स्पोर्ट्स बाईकवरून आलेल्या दोन संशयितांचा शोध सुरू आहे. या घटनेमुळे छत्रपती संभाजीनगरमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. (Chhatrapati Sambhajinagar Crime)






